राष्ट्रीय महामार्ग ६५ (भारत)
Jump to navigation
Jump to search
![]() | |
---|---|
लांबी | ८५१.६६ किमी |
सुरुवात | पुणे |
मुख्य शहरे | पुणे - सोलापूर - हैदराबाद - विजयवाडा |
शेवट | मच्छलीपट्टणम |
राज्ये |
महाराष्ट्र: ३४९.२० किमी कर्नाटक: ७५.६१ किमी तेलंगणा: २७६.८० किमी आंध्र प्रदेश: १५०.०५ किमी |
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ६५[१] हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पुणे आणि मच्छलीपट्टणम ह्या शहरांना जोडतो. हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून जातो. हा राष्ट्रीय महामार्ग ८५१.६६ किमी अंतराचा आहे.
पुणे, इंदापूर, सोलापूर, उमरगा, हुमनाबाद, झहीराबाद, हैदराबाद, विजयवाडा व मच्छलीपट्टणम ही या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाची शहरे आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील महत्वाची शहरे व गावे[संपादन]
पुण्यापासून मच्छलीपट्टणमकडे प्रवास करताना अनुक्रमे खालील ठिकाणे लागतात. राज्यातील या राष्ट्रीय महामार्गाची लांबी कंसात दर्शविली आहे[१][२].
महाराष्ट्र (३४९.२० किमी)
- पुणे
- हडपसर (पुणे शहराचे उपनगर)
- लोनी कळभोर
- यवत
- भिगवण
- इंदापूर
- टेंभुर्णी
- वरवडे
- मोडनिंब
- मोहोळ
- सोलापूर
- नळदुर्ग
- येणेगूर
- उमरगा
कर्नाटक (७५.६१ किमी)
- हुमनाबाद
- मान्नेखेल्ली
तेलंगणा (२७६.८० किमी)
- झहीराबाद
- संगारेड्डी
- हैदराबाद
- सूर्यापेट
- कोदाद
आंध्र प्रदेश (१५०.०५ किमी)
- नंदीगाम
- विजयवाडा
- वुय्यूरु
- पामर्रु
- मच्छलीपट्टणम
संदर्भ[संपादन]