अकलूज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  ?अकलूज
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

१७° ५२′ ४८″ N, ७५° ०१′ १२″ E

गुणक: 17°53′N 75°01′E / 17.88°N 75.01°E / 17.88; 75.01
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सोलापूर
तालुका/के माळशिरस
लोकसंख्या त्रुटि: "80,000(2009)" अयोग्य अंक आहे (=)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३१०१
• +०२१८५
• MH- ४५

गुणक: 17°53′N 75°01′E / 17.88°N 75.01°E / 17.88; 75.01

अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव नीरा नदीकाठी वसलेले आहे.

इतिहास[संपादन]

अकलूज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले आहे.मोगल काळामध्ये हे गाव अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये १३व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. असे म्हटले जाते की १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास होते.अकलूज हे रत्नाई कृषी महाविद्यालयासाठी प्रसिद्ध आहे.

येथून यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर ७ कि.मी. दूर महाळूंग या गावी आहे.या ठिकाणी एकदिवसीय पर्यटनासाठी सयाजीराजे पार्क या नावाचे ठिकाण आहे. आता या अकलूज मध्ये घोड्यांचा बाजार हा सुरु करण्यात आला आहे तो पूर्वी पंढरपूर मध्ये कार्तिकी यात्रेच्या वेळी भरत होता .या बाजारामध्ये जातिवंत घोडे राज्यापर राज्यातून विक्रीसाठी येतात. अकलुज मधे शंकरराव मोहिते महाविद्यालय ,इंजिनिअरिंग महाविद्यालय,फार्मसि महाविद्यालय,..इ. महाविद्यालये आहेत.

अकलूज पासून 3 ते 4 कि.मी अंतरावर शंकरनगर येते शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना आहे.अकलूज मध्ये तसेच माळशिरस तालुक्यामध्ये अकलुज शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिसून येते.

पर्यटन स्थळ[संपादन]

इवलेसे|शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख होण्यासाठी शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगाचे दगडी कोरीव काम करून उभारले आहेत. इवलेसे काही वर्षापूर्वी भुईकोट किल्ला असलेले गाव अशी गावाची ओळख होती तेव्हा सुद्धा अकलूज मध्ये भुईकोट किल्ला पाहण्यासाठी बाहेरून पर्यटकांची संख्या प्रमाण जास्त होते. सध्या आज याच किल्ल्याचे सुशोभीकरण करून शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख होण्यासाठी काही शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगाचे दगडी कोरीव काम करून उभारले आहेत. जणू आपण प्रत्यक्षात शिवाजी महाराज याचे कार्य पाहतो असा भास होतो. शिवसृष्टी असे नाव देण्यात आले आहे यामुळे हे अतिशय सुरेख कोरीव काम पाहणाऱ्या पर्यटकांची प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.अकलूज पासून 7 कि. मी अंतरावर आनंदी गणेश नगर आहे. या ठिकाणी महादेव व गणेश मंदिर आहेत. या परिसरामध्ये फळ बागा असल्या मुळे मंदिराची सुंदरता असून मन प्रसन्न करणारे वातावरण आहे. अकलूज पासून 3 कि. मी वर शंकरनगर या ठिकाणी शिवपर्वती पर्यटन स्थळ आहे.. येथे महादेव शंकर याचे मंदिर आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा म्हणजे येथे महाशिवरात्री या दिवशी उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होत असताना दिसून येतो.

अकलूज पासून जवळ असलेली पर्यटन स्थळे :-

सयाजीराजे पार्क प्रवेशद्वार

वेळापूर हे आळंदी-पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी मार्गावर वसलेले एक ऐतिहासिक गांव आहे. या गावापासून श्री क्षेत्र पंढरपूर हे केवळ ३२ कि.मी., श्री क्षेत्र सिद्धरामेश्‍वर (सोलापूर) १०० कि.मी., श्री क्षेत्र तुळजापूर १५० कि.मी., श्री क्षेत्र अक्कलकोट १५० कि.मी., शिखर शिंगणापूर (मोठा महादेव) ५० कि.मी., श्री क्षेत्र गोंदवले ६० कि.मी., निरा-भिमा या पवित्र नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर २५ कि.मी., जैन धर्मियांचे क्षेत्र दहिगांव हे ५० कि.मी. अंतरावर आहे तर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झालेले अकलूज हे १० कि.मी. अंतरावर आहे. अकलूजमध्ये श्री अकलाई, आनंदी गणेश, शिवपार्वती मंदिर, श्रीराम मंदिर, श्री साईबाबा मंदिर, यांच्यासह शिवसृष्टी, सयाजीराजे वॉटर पार्क, शिवामृत गार्डन, विद्युत कारंजे अशी पर्यटन स्थळे ही आहेत.

मनोरंजन[संपादन]

अकलूज तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व सामान्यांना चित्रपट पाहता यावेत या साठी श्रीराम चित्रपट गृह आणि महात्मा चित्रपट गृह आहेत. अकलूज हे गाव लावणी साठी खूप लोकप्रिय आहे. लावणी या कलेला अकलूज आणि माळशिरस तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. मनोरंजनाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत जनजागृती करण्यासाठी माळशिरस तालुक्यासाठी प्रताप क्रिडा मंडळ हे प्रत्येक वर्षी PKM स्पर्धा आयोजित करण्यात येते. या मध्ये माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागात विभाजन करून स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होणारे माळशिरस तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये असतात. या मध्ये वयोगटा नुसार स्पर्धेचे वर्गीकरण केलेले असते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक नृत्य, लोक नृत्य,व प्रासंगिक नृत्य आहे.

इवलेसे|शिवमंदिर,आनंदी गणेश

शिक्षण संस्था[संपादन]

1. शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज

2. शिवरत्न संस्था, अकलूज

3. श्रीराम शिक्षण संस्था, पाणीव

4. सहकार महर्षी श्ंकरराव मोहिते -पाटील संस्था

क्रिडा संकुल[संपादन]

विजय सिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल

अकलूज मधील संस्कृती[संपादन]

अकलूज मधील संस्कृती पाहायची असेल तर अस खास अशी काहीही नाही. पण अकलूज मधील बोलण्याची पद्धत किंवा आपण त्याला बोलण्यातील आवाजातील चढ उतार जरासा वेगळा आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोकांचे वास्तव असल्यामुळे संस्कृती संमिश्र असल्याचे दिसून येते.

अकलूज मधील मंदिरे[संपादन]

1. अकलाई देवी मंदिर ( अकलाई नगर)

2. हनुमान मंदिर ( जुन्या ग्रामपंचायत जवळ)

3. महादेव मंदिर ( विजय चौक)

4. गणपती मंदिर ( मंडई)

5. शिवपार्वती ( शंकरनगर)

6. साई मंदिर (संग्राम नगर)

7. इस्कॉन टेंम्पल (इंदापूर रोड)

8. शनी मंदिर (काझी गल्ली)

9. श्री. महावीर जैन मंदिर (जुन्या ग्रामपंचायत जवळ)

10. मस्जिद (बागवान गल्ली)