तुळजाभवानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Shivaji-bahvani.jpg

धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टान्त देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे.

देवी तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वार

तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते.

हेसुद्धा पहा[संपादन]

देवीची साडेतीन शक्तिपीठे :

तुळजाभवानीवरील मराठी पुस्तके[संपादन]

  • तुळजापूरची भवानी माता (बालसाहत्य, नंदिनी तांबोळी, ऋचा जोशी)
  • श्री तुळजाभवानी (रा.चिं. ढेरे)
  • महाराष्ट्राची चार दैवतें -महालक्ष्नी, खंडोबा, भवानी, विठोबा (डॉ. ग. ह. खरे)

बाहेरील दुवे[संपादन]