सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
ब्रीदवाक्य | यः क्रियावान् स पण्डितः |
---|---|
Type | शासकीय शैक्षणिक आस्थापना |
स्थापना | १० फेब्रुवारी १९४९ |
विद्यार्थी | १,७०,००० |
संकेतस्थळ | www.unipune.ac.in |
महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण | |||
स्थान | पुणे, पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
वारसा अभिधान |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील पुणे मधील एक विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
- ४६ शैक्षणिक विभाग आहेत.
- ४७४ महाविद्यालये आणि
- सुमारे सहा लाख विद्यार्थी संख्या आहे.
इतिहास
[संपादन]पुणे विद्यापीठाची स्थापना पुणे विघापीठ अधिनियमच्या अधीन केली गेली, ज्याला १० फेब्रूवरी १९४८ला मुंबई विधान-मंडल ने पारित केले. त्याच वर्षी, डा एम॰ आर॰ जयकर यांनी विघापीठचे प्रथम उपकुलपतिचे पदभार ग्रहण केले. श्री बी॰ जी॰ खैर, जे मुंबई सरकार (विधान-मंडल)चे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होते, त्यांच्या प्रत्यनातुन विघापीठला को मोठा भूखण्ड मिळवून देण्यासाठी मदत केली. प्रारंभिक १९५० मध्ये, विद्यापीठाला ४११ एकड़ (१.७ किमी²) भूमि आवंटित केली गेली.
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठच्या अखत्यारित गेले. इ.स. १९९० मध्ये धुळे व जळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
कुलगुरू
[संपादन]- बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर (इ.स. १९४८ ते १९५६)
- रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (१९५६ ते १९५९)
- प्राचार्य दत्तात्रेय गोपाळ कर्वे (१९५९ ते १९६१)
- महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (१९६१ ते १९६४)
- न.वि. गाडगीळ (१९६४ ते १९६६)
- डॉ. धनंजयराव गाडगीळ (१९६६ ते १९६७)
- ह.वि. पाटसकर (१९६७ ते १९७०)
- डॉ. बा.पां आपटे (१९७० ते १९७२)
- प्राचार्य डॉ. ग.स. महाजनी (१९७२ ते १९७५)
- प्राचार्य देवदत्त दाभोळकर (१९७५ ते १९७८)
- डॉ. राम ताकवले (१९७८ ते १९८४)
- डॉ. वि.ग. भिडे (१९८४ ते १९८९)
- डॉ. श्रीधर चंद्रशेखर गुप्ते (१९८९ ते १९९५)
- डॉ. वसंत गोवारीकर (१९९५ ते १९९८)
- डॉ. अरुण निगवेकर (१९९८ ते २०००)
- डॉ. अशोक कोळस्कर (२००१ ते २००६)
- डॉ. नरेंद्र जाधव (२००६ ते २००९)
- डॉ. रघुनाथ शेवगावकर (२०१० ते २०११)
- डॉ. वासुदेव गाडे (२०१२ ते २०१७)
- डॉ. नितीन करमाळकर (१८ मे २०१७ ते १७ मे २०२२)
- डॉ. कारभारी काळे (१७ मे २०२२ ते ०७ जून २०२३)
- डॉ. सुरेश गोसावी (०७ जून २०२३ पासून)
नामविस्तार
[संपादन]इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी पुणे विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.[१]
अध्यासने
[संपादन]सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.
- संत नामदेव अध्यासन केंद्र
विभाग आणि संशोधन केंद्रे
[संपादन]सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण ४६ विभाग आहेत, ज्यांमध्ये कला, विज्ञान, विधी, भाषां, मानव्यशास्त्रे, आणि अनेक आधुनिक ज्ञानशाखांच्या अध्यापनाचे आणि संदर्भातील संशोधनाचे काम केले जाते.
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फ़ुले स्त्री अभ्यास केंद्र
- मराठी विभाग
- हिंदी विभाग
- इंग्रजी विभाग
- इतिहास विभाग
- राज्यशास्त्र विभाग
- भूगोल विभाग
- अध्यापनशास्त्र आणि विस्तार विभाग
- अर्थशास्त्र विभाग
- संरक्षण शास्त्र आणि सामरिक शास्त्र
- पाली भाषा विभाग
- प्रगत संस्कृत अध्यापन केंद्र
- ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग
ग्रंथालय
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर". आयबीएन लोकमत. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ
- पत्ता: गणेशखिंड रस्ता, पुणे-४११००७, महाराष्ट्र, भारत.