वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या परभणी शहरातील कृषी विद्यापीठ आहे.

१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणीत करण्यात आली.[५] २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलले आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे करण्यात आले. मराठवाड्याचे आठही जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. कृषी, शेतीशी संबंधित शास्त्रे आणि मानव्यविद्येचे शिक्षण देणे हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कृषी विषयांचे संशोधनही येथे होते.


साचा:Template for discussion/dated