Jump to content

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
विद्यापीठ
स्थापना1989 संपादन
संलग्नताविद्यापीठ अनुदान आयोग संपादन
याचे नावाने नामकरणयशवंतराव चव्हाण संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमहाराष्ट्र संपादन
भौगोलिक गुणक२०°१′१४″N ७३°४१′२८″E संपादन
सदस्यताe-ShodhSindhu, International Council for Open and Distance Education संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.ycis.ac.in/ संपादन
Map

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक संवैधानिक/विधीग्राह्य विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे.[] हे विद्यापीठ १ जुलै १९८८ रोजी सुरू झाले.[] विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू डॉ.राम ताकवले यांनी आपल्या कल्‍पक दृष्‍टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्‍यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत, लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्‍त करून घेण्‍यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्‍य देणारे अभ्‍यासक्रम तयार केले. त्यामुळेच अशा प्रकारच्या शिक्षणाच्‍या संधी या विद्यापीठामुळे उपलब्‍ध झाल्या.

देशातील या ५व्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे, असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाचे गीत कवी कुसुमाग्रज यांनी लिहिले.

विद्यापीठातली अध्यासने

[संपादन]
  1. कुसुमाग्रज अध्यासन : या अध्यासनातर्फे दरवर्षी कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, श्रमसेवा पुरस्कार, कथालेखन पुरस्कार आणि ज्ञानदीप पुरस्कार, आदी देण्यात येतात. २०१६ साली छिदवाडा येथील साहित्यिक डॉ. विष्णू खरे यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांना श्रमसेवा पुरस्कार तर, नाशिकच्या हेमलता बिडकर यांना ज्ञानदीप पुरस्कार प्रदान झाला. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या दोनही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
  • वेश्या व्यवसायातील महिलांसाठी काम करणाऱ्या पुणे येथील उषाताई वाघ यांना २०१४ सालचा श्रमसेवा पुरस्कार प्रदान झाला.
  • धुळ्याच्या समाजसेविका नजूबाई गावित यांनाही श्रमसेवा पुरस्कार मिळाला आहे.
  • कन्‍नड साहित्यिक डॉ. एच.एस. शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार (२०१७)
  • लातूरच्या मेनका धुमाळे यांना बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार (२०१७)

विद्यापीठाचे गौरव

[संपादन]

कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग ही संस्था जगभरातील ५३ कॉमनवेल्थ देशांच्या सरकारांनी १९८७ साली स्थापित केली. कॅनडाने या संस्थेचे यजमानपद स्वीकारले. शाश्वत व प्रगत विकासासाठी मुक्त व दूर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचे नवे स्रोत निर्माण करणे व जगभरातील वंचीतांपर्यंत आधुनिक ज्ञानाचे भांडार पोचविणे हे उद्दिष्ट ठेवून ह्या संस्थेने अनेक माध्यमातून मुक्तशिक्षण संस्थांना मदतीचा हात दिला आहे. त्यातून मुक्त शिक्षण पद्धतीचा दर्जा, क्षमता आणि तंत्रज्ञानाचा वापर यांचा विकास करण्याचे कौशल्य संस्थांमध्ये निर्माण झाले. परिणामी मुक्त व दूरशिक्षणाची चळवळ सक्षमपणे उभी राहिली.

अश्या ह्या संस्थेने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला अवार्ड ऑफ इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन आणि कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी स्कॉटलंड मधील एडिनबर्ग येथे एका भव्य समारंभात हा पुरस्कार स्वीकारला (सप्टेंबर २०१९). ह्या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या समितीने एकमुखाने प्रशंसा करताना या विद्यापीठाने अत्यंत अल्पावधीत तंत्रज्ञानाचा वापर करून लक्षावधी विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोचल्याचे पाहून आपण प्रभावित झाल्याचे नमूद केले आहे.

नाशिकच्या मुक्त विद्यापीठास सन्मानपूर्वक दिलेल्या मानपत्रात कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगने पुढील मुद्द्यांचा उल्लेख करून प्रशंसा केली आहे :-

  • तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
  • विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून प्रमाणपत्र वितरणापर्यंत संगणकीय तंत्राचा वापर
  • शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुशल व कार्यक्षम मनुष्यबळ विकासित करणे
  • २००२मध्ये प्रथम मिळालेल्या याच पुरस्कारपासून आजतागायत राखलेले प्रामाणिक प्रयत्न

कुलगुरुंची यादी

[संपादन]
  1. राम ताकवले
  2. राजन वेळूकर
  3. डॉ.दिलीप म्हैसेकर
  4. ई. वायुनंदन
  5. कॅप्टन माधुरी कानिटकर
  6. संजीव सोनावणे

माजी विद्यार्थी

[संपादन]
  1. एकनाथ शिंदे - विद्यमान उप-मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
  2. बसवराज पाटील - विधानसभा सदस्य १३वे
  3. गोविंदप्रसाद भुतडा - संशोधक, विकास संशोधक
  4. सुधांशू पवार - संशोधक, स्वीडन येथे
  5. दत्ता पाटील - नाटक, कथा, पटकथा लेखक
  6. चंद्रकांत खांडवी - डी.सी.पी, महाराष्ट्र
  7. पंडित खांडवे - संचालक, ऍग्री सर्च इंडिया
  8. आरजे शुभम - रेडिओ जॉकी विजेता
  9. ललिता बाबर - रि.ओ.२०१६ ऑलिम्पिक पात्र खेळाडू
  10. कविता राऊत - कांस्य पदक विजेती, २०१० कॉमनवेल्थ गेम
  11. प्रांजल कुलकर्णी - ए.बी.पी माझा, पत्रकार
  12. संजय बेलसरे - सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य
  13. कौस्तुभ दिवेगावकर - आय.ए.एस, झारखंड
  14. डॉ. रवींद्र सिंघल - आय.पी.एस, महाराष्ट्र
  15. उमेश खांडबहाले - आय.पी.एस, पश्चिम बंगाल
  16. डॉ. संजीव सोनवणे - कुलगुरू, मुक्त विद्यापीठ
  17. डॉ.दिनेश भोंडे - माजी निबंधक, मुक्त विद्यापीठ

दीक्षांत सोहळ्याचा इतिहास

[संपादन]
अ. क्र. कार्यक्रमाचे नावे कार्यक्रमाची तारीख पाहुणे/अतिथी शेरा
३१वा दीक्षांत समारंभ ४ फेब्रुवारी २०२६ डॉ. निर्मलजीत सिंग कलसी (आय.ए.एस) -
३०वा दीक्षांत समारंभ २४ फेब्रुवारी २०२५ श्री. सी. पी. राधाकृष्णन -
२९वा दीक्षांत समारंभ २० डिसेंबर २०२३ श्री. रघुनाथ काशिनाथ शेवगावकर -
२८वा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारी २०२३ डॉ. इंद्र गणी -

महत्वाचे मुद्दे आणि तथ्य

[संपादन]

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) मार्कशीट आणि प्रमाणपत्रे सुरक्षित करण्यासाठी प्रगत ब्लॉकचेन तंत्रज्ञान लागू केले आहे, ज्यामुळे कागदपत्रांची सत्यता आणि पडताळणी वाढली आहे. हे पाऊल डिजिटल सुरक्षेसाठी त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते, अधिकृत शैक्षणिक नोंदींसाठी ब्लॉकचेन वापरणाऱ्या भारतातील शीर्ष संस्थांमध्ये त्यांना स्थान देते. २०२३ च्या अखेरीस ब्लॉकचेन तंत्रज्ञान लागू केले गेले आणि यासाठी YCMOU भारतातील पहिले विद्यापीठ बनले.[]

कुलगुरू म्हणतात, "विद्यापीठ ऑनलाइन अभ्यासक्रमांची संख्या १०० पेक्षा जास्त करण्याची योजना आखत होते आणि २०३० पर्यंत ३ लाख कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे." ३१ व्या दीक्षांत समारंभाच्या दिवशी.[]

भौतिकशास्त्रवाला (PW) ने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा (YCMOU) सोबत भागीदारी केली आहे जेणेकरून MBA, MCA, MA इंग्रजी आणि BCA यासह UGC/AICTE-अनुरूप ऑनलाइन पदवी कार्यक्रम उपलब्ध होतील. स्वयं-वेगवान शिक्षण, थेट वर्ग आणि मूल्यांकन एकत्रित करणाऱ्या चार-चतुर्थांश MOOC मॉडेलद्वारे उच्च शिक्षणाची उपलब्धता वाढवणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. YCMOU शैक्षणिक मान्यता आणि पदवी प्रदान करण्याचे व्यवस्थापन करते, तर PW तंत्रज्ञान, सामग्री आणि विद्यार्थी समर्थन प्रदान करते. हा उपक्रम NEP 2020 शी जुळणारे लवचिक, डिजिटली समावेशक मार्ग तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "University". www.ugc.ac.in. 2023-02-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2026-02-27 रोजी पाहिले.
  2. "History of Yashwantrao Chavan Maharashtra Open University". ycmou.ac.in. 2026-02-27 रोजी पाहिले.
  3. "YCMOU issues block-chain-based QR code certificates". 2023-12-26. ISSN 0971-8257.
  4. "Over 1L students get degrees during YCMOU convocation". 2026-02-05. ISSN 0971-8257.
  5. Bureau, The Hindu (2025-07-12). "PhysicsWallah partners with YCMOU to launch online UGC-compliant degree programs" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.

बाह्य दुवे

[संपादन]