महाराष्ट्रातील विद्यापीठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ.स. १८५७ पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ इ.स. १९२३ मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ इ.स. १९४८ आणि मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९५६ मध्ये स्थापन झाले.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन राज्य कृषि मंत्रालयामार्फत होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, दंतवैद्यक, रुग्ण शुश्रूषा विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. रायगड जिल्ह्यात लोणेरे येथे डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, तसेच नागपूर येथे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.

या व्यतिरिक्त, मराठी भाषा विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.

अभिमत विद्यापीठे[संपादन]

राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.

महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.

खासगी / स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे[संपादन]

महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.

बनावट (बोगस) विद्यापीठे[संपादन]

महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत.

नॅक मानांकने[संपादन]

राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) मूल्यांकन पद्धती[संपादन]

विद्यापीठांची यादी[संपादन]

विद्यापीठाचे अधिकृत नाव विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव मुख्यालयाचे ठिकाण विद्यापीठाचा प्रकार
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती विद्यापीठ अमरावती राज्य विद्यापीठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ छ्त्रपती संभाजीनगर राज्य विद्यापीठ
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक राज्य विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यापीठ कोल्हापूर राज्य विद्यापीठ
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली राज्य विद्यापीठ
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राज्य विद्यापीठ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर विद्यापीठ नागपूर राज्य विद्यापीठ
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई राज्य विद्यापीठ
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ एस.आर.टी.एम. विद्यापीठ नांदेड राज्य विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठ पुणे राज्य विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ मुंबई राज्य विद्यापीठ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ सोलापूर राज्य विद्यापीठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ बाटु लोणेरे राज्य विद्यापीठ
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली कृषी विद्यापीठ दापोली कृषी विद्यापीठ
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कृषी विद्यापीठ परभणी कृषी विद्यापीठ
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विद्यापीठ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विद्यापीठ अकोला कृषी विद्यापीठ
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक राज्य विद्यापीठ
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर राज्य विद्यापीठ
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर राज्य विद्यापीठ
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई राज्य विद्यापीठ
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वाय.सी.एम.ओ.यु. नाशिक राज्य मुक्त विद्यापीठ
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा केंद्रीय विद्यापीठ
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर अभिमत विद्यापीठ
अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी मुंबई खाजगी विद्यापीठ
कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था कराड अभिमत विद्यापीठ
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था पुणे अभिमत विद्यापीठ
टाटा सामाजिक विज्ञान संस्था टी.आय.एस.एस. / टीस मुंबई अभिमत विद्यापीठ
टाटा मूलभूत संशोधन संस्था टी.आय.एफ.आर. मुंबई अभिमत विद्यापीठ
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ टि.म.वि. पुणे अभिमत विद्यापीठ
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था डी.आय.ए.टी. / डायेट पुणे अभिमत विद्यापीठ
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे अभिमत विद्यापीठ
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था डेक्कन कॉलेज पुणे अभिमत विद्यापीठ
संदीप युनिव्हर्सिटी नाशिक खाजगी विद्यापीठ
सिंबायोसिस इंटरनॅशनल पुणे अभिमत विद्यापीठ
भारती विद्यापीठ पुणे अभिमत विद्यापीठ
होमी भाभा राष्ट्रीय संस्था मुंबई अभिमत विद्यापीठ
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था आय.आय.पी.एस. मुंबई अभिमत विद्यापीठ
प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था लोणी, जि. अहमदनगर अभिमत विद्यापीठ
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ शेडुंग खाजगी विद्यापीठ
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे खाजगी विद्यापीठ
फ्लेम विद्यापीठ पुणे खाजगी विद्यापीठ
स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ पुणे खाजगी विद्यापीठ
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ पुणे खाजगी विद्यापीठ
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ  पुणे खाजगी विद्यापीठ
एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे खाजगी विद्यापीठ
विश्वकर्मा विद्यापीठ पुणे खाजगी विद्यापीठ
संजय घोडावत विद्यापीठ हातकणंगले खाजगी विद्यापीठ
केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था मुंबई अभिमत विद्यापीठ
डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कसबा बावडा, जि. कोल्हापूर अभिमत विद्यापीठ
इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई अभिमत विद्यापीठ
रासायनिक तंत्रज्ञान संस्था आय.सी.टी. मुंबई अभिमत विद्यापीठ
एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था नवी मुंबई अभिमत विद्यापीठ
नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था मुंबई अभिमत विद्यापीठ
पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबई अभिमत विद्यापीठ
पुरंदर विद्यापीठ सासवड बनावट विद्यापीठ
आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ कोरेगाव (सातारा) बनावट विद्यापीठ

राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था[संपादन]

वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.

  1. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई
  2. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर
  3. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे
  4. राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई
  5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे

बंद करण्यात आलेली विद्यापीठे[संपादन]

इतर विद्यापीठे[संपादन]

श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.

विनोद विद्यापीठ, पुणे

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]