"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १९०: | ओळ १९०: | ||
* '''नागपुरी''' - <br /> |
* '''नागपुरी''' - <br /> |
||
पूर्व विदर्भातील [[नागपूर]], [[वर्धा]], [[चंद्रपूर]] चा काही भाग आणि गडचिरोली चा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील [[शिवनी]], [[छिंदवाडा]], [[बालाघाट]] व [[रायपूर]] या भागातही ही बोली प्रचलित आहे. वर्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर [[हिंदी]] शब्दांचाही प्रभाव आढळतो. |
पूर्व विदर्भातील [[नागपूर]], [[वर्धा]], [[चंद्रपूर]] चा काही भाग आणि गडचिरोली चा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील [[शिवनी]], [[छिंदवाडा]], [[बालाघाट]] व [[रायपूर]] या भागातही ही बोली प्रचलित आहे. वर्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर [[हिंदी]] शब्दांचाही प्रभाव आढळतो. |
||
* [[नारायणपेठी बोली]] -<br /> |
* [[नारायणपेठी बोली]] - <br /> |
||
महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीबाषा बोलतात. |
|||
* '''बेळगावी''' - <br /> |
* '''बेळगावी''' - <br /> |
||
[[बेळगाव]] या महाराष्ट्राच्या सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, [[कोकणी]] अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख [[पु.ल. देशपांडे]] यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. [[प्रकाश संत]] लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. जसे ''काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला..''. या भाषेत गा हा प्रत्यय लावला जातो जसे 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?) |
[[बेळगाव]] या महाराष्ट्राच्या सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, [[कोकणी]] अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख [[पु.ल. देशपांडे]] यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. [[प्रकाश संत]] लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. जसे ''काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला..''. या भाषेत गा हा प्रत्यय लावला जातो जसे 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?) |
२१:००, १ मार्च २०१५ ची आवृत्ती
marāṭhī | |
---|---|
मराठी | |
स्थानिक वापर | भारत, मॉरिशस व इस्रायल |
प्रदेश | महाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात- गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू |
लोकसंख्या |
७,००,००,००० (प्रथमभाषा) २,००,००,००० (द्वितीयभाषा) |
क्रम | १५ |
बोलीभाषा | कोकणी, अहिराणी, माणदेशी, मालवणी, वर्हाडी |
भाषाकुळ | |
लिपी | देवनागरी, मोडी लिपी (प्राचीन) |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
भारत राज्यभाषा- महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | mr |
ISO ६३९-२ | mar |
ISO ६३९-३ | mar |
मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणार्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.[१] मराठी बोलणार्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. याउलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांच्यावर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही विद्वान मानतात. मराठी भाषा ही इसवी सनाच्या आधीही होती असे सिद्ध करण्याचा प्रयत्न प्रा. हरी नरके करीत आहेत.
मराठीभाषी प्रदेश
मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.[२] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.[३]
भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदावाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तमिळनाडू), वगैरे. देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषकांची वस्ती आहे.
राजभाषा
भारताच्या राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणार्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. असे असले तरी राज्यकारभार आणि पत्रव्यवहार लोकांच्या सोयीसाठी इंग्रजीतून केला जातो.४२वा अहवाल- जुलै २००३-०४ pp. para 11.3</ref>, दादरा व नगर हवेली[४] या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)[५], महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)[६], उस्मानिया विद्यापीठ (आंध्र प्रदेश), गुलबर्गा विद्यापीठ[७], देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)[८] व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)[९] येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.
मराठी पुस्तके
मराठीत आजवर एक लाख पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांतली हजारभर तरी जागतिक साहित्यांत स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात, व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, आणि छोटीमोठी अडीचशे साहित्य संमेलने भरतात. नामवंत्खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपरेयंत आहे.सरकारी संस्था ’बालभारती’दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. भारतातील सर्वाधिक खपाचे मासिक ’लोकराज्य’ हे, आणि देशातले सर्वाधिक खपाचे चौथ्या क्रमांकाचे वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे, असे म्हणतात. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.
शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत, चरित्र कोश, तत्त्वज्ञानकोश, वाङ्मय कोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, ज्ञानकोश, असे शेकडो प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो, असे म्हटले जाते.
पुरस्कार
- विंदा करंदीकर, कुसुमाग्रज आणि वि.स. खांडेकर अशी तीन मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
- ’ज्ञानपीठ’च्या बरोबर समजला जाणारा ’मूर्तिदेवी प्रस्कार’ शिवाजी सावंत यांना ’मृत्युंजय’ या कादंबरीसाठी मिळाला आहे.
- महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना ’सरस्वती सन्मान’ मिळाले आहेत.
- विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना ’कालिदास सन्मान’ मिळाले आहेत.
- महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके यांच्या नावाने ’अखिल भारतीय कला सन्मान’ दिला जातो.
- ’भारतीय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आजवर बालगंधर्व, ...... इत्यादींना मिळाले आहेत.
- सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपति सुवर्णकमळ आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई’ला मिळाले होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, पां.वा. काणे, भीमसेन जोशी, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर, विनोबा भावे, सी.एन.आर. राव, आणि लता मंगेशकर]] हे आजवरचे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीय.
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. इ.स. ११८८ मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण http://santeknath.org/vagmayavishayi.html आदि ग्रंथांची भर घातली.
शिवाजी राजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६०[१०] मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३०साचा:Fact पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.राजा केसिदेवराय याचे कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख आहे.कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. ती समजूत आता मागे पडली असून तो मान अक्षी शिलालेखाला मिळाला आहे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख कुलाबा गाझेटिएर 1883 मध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे.
मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री -
वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा -
न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतु : ९३४ प्रधा-
वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-
लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ
कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु
मीची वआण । लुनया कचली ज -।
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोदला असून त्या शिळेच्या माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे खोदकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. अर्थ :--जगी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीच्या बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. लुनया हे लेख कोरणार्याचे नाव आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।':
कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. त्याची स्थिती बर्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाचा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला.
मराठी भाषेत कालानुक्रमे झालेले बदल
मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५००शे वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले जाते. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
आद्यकाल
हा काल इ.स. १२०० पूर्व, म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या लिखाणाच्याही पूर्वीचा काल होय. या काळात विवेकसिंधु या साहित्याव्यतिरिक्त नाव घेण्यासारखी कोणतीही साहित्यकृती पाहण्यास शिल्लक राहू शकली नाही. या काळातील मराठी शब्दांचे तसेच काही वाक्यांचे उल्लेख ताम्रपटात तसेच शिलालेखात आढळतात.
यादवकाल
हा काल इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळाता वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याचे दालन वैविध्यानी समृद्ध केले. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. सांकेतिक लिपी ची सुरुवातही याच काळात झाली असावी असे मानले जाते.
बहामनी काल
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांचे स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरू झाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झाल्याने मराठी भाषेत ’तारीख’सारख्या अनेक फारसी शब्दांचे आगमन झाले. अशा धकाधकीच्या काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. नृसिंहसरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णुदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.
शिवाजीचा काल
हा काल इ.स. १६०० ते इ.स. १७०० असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले. असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.
पेशवे काल
हा काल इ.स. १७०० ते इ.स. १८१८ असा आहे. याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केल्या. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडवप्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झाले. याच काळात वाङ्मय हा रंजनाचा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.
इंग्रजी कालखंड
हा काल इ.स. १७१८ ते आजतागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याचा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.
छपाईची सुरुवात झाल्यानंतर मराठी भाषेचा उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकार्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी चिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.
अभिजात मराठी
मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-
- इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
- गाथा सप्तशती हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाअगोदर किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले हाही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
- भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत. वगैरे.
१९५० ते १९८०
साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. अक्षरश: शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले (बंडखोर) मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पँथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसर्या बाजूला ‘अॅकॅडमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.
‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं.त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पँथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री.ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी !) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग.वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. बाळ गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.[११]
मराठीतील बोली भाषा
जळगाव जिल्हा सावळदबारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातील बर्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीचा वापर केला आहे.
- इस्रायली मराठी
- कोंकणी -
कोकणी या नावाने ओळखल्या जाणार्या दहाहून अधिक बोली आहेत. आगरी, चित्पावनी, ठाणा जिल्ह्यातली वारली, रत्नागिरी जिल्ह्यातली कुडाळी, सिंधुदुर्गातली मालवणी, गोव्यातले श्रीमंत हिंदू शेतकरी बोलतात ती काणकोणची कोकणी, तिथल्याच शेतमजुरांची कोकणी, गोव्यातल्या ख्रिचनांची पोर्तुगीज पद्धतीची कोकणी, गावड्यांची कोकणी, कारवारी या सर्व बोली ठोकपणे कोकणी बोली समजल्या जातात, .पण निश्चितपणे एकमेकांपासून वेगळ्या आहेत.
- कोल्हापुरी -
कोल्हापूर भागात बोलली जाणारी ही बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो.
- खानदेशी
- चंदगडी -
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाजारास गेल्लो'(मी बाजारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
- चित्पावनी -
- '''झाडीबोली''' -
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्यांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराजकृत 'विवेकसिंधू'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
- डांगी
- तंजावर मराठी -
- तावडी -
जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. 'क' च्या जागी 'ख'चा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीचा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समजत असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
- देहवाली -
भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराथी आणि हिंदी भाषांचा हिच्यावर मोठा प्रभाव आहे.. बोलीची वाक्यरचनाही गुजराथीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेचे खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवाली च्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमी द्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
- नंदभाषा -
व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आजही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेचा वापर करून शंकराची स्तुती करणार्या काव्यरचनाही केल्या आहेत.
- नागपुरी -
पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर चा काही भाग आणि गडचिरोली चा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वर्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.
महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीबाषा बोलतात.
- बेळगावी -
बेळगाव या महाराष्ट्राच्या सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. जसे काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला... या भाषेत गा हा प्रत्यय लावला जातो जसे 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
- भटक्या विमुक्त -
जमातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्या जमाती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत रहावीत यासाठी या बोली भाषांचा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातील डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.
- मराठवाडी -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यंतत ही बोलीभाषा वापरली जाते. काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेचाचा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. 'लाव', 'लास', 'आव' या स्वरूपाचे कारकवाचक प्रत्यय या बोलीचे वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, चाल्लास, ठिवताव इत्यादी.
- माणदेशी -
- मॉरिशसची मराठी -
- मालवणी -
दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धी पावली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
- वर्हाडी -
बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतून वर्हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वर्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला जातो. जसे, 'नदीच्या गायात, गाय फसली' (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.
वगैरे.
मराठी साहित्य
प्रमुख लेख मराठी साहित्य येथे आहे.
मराठीचे आद्य कवी
मराठीचे आद्य कवी पुढील प्रमाणे मानले जातात.
- १. मुकुंदराज - आद्य महानुभावी कवी
- २. ज्ञानेश्वर
- ३. नामदेव
- ४. एकनाथ
- ५. तुकाराम
- ६. रामदास
- ७. वामन पंडित
- ८. श्रीधर
- ९. मुक्तेश्वर
- १०. मोरोपंत
- ११. माधवस्वामी तंजावरचे लेखक.
- १२. होनाजी
- १३. महिपती
ही यादी पूर्ण नसून फक्त काही प्रमुख कवींची यादी आहे.
मराठी मुळाक्षरांचे उच्चार
Labial | Dental | Alveolar | Retroflex | Alveopalatal | Velar | Glottal | |
---|---|---|---|---|---|---|---|
Voiceless stops |
p pʰ |
t̪ t̪ʰ |
ʈ ʈʰ |
cɕ cɕʰ |
k kʰ |
||
Voiced stops |
b bʰ |
d̪ d̪ʰ |
ɖ ɖʰ |
ɟʝ ɟʝʰ |
ɡ ɡʰ |
||
Voiceless fricatives |
s | ɕ | h | ||||
Nasals | m mʰ |
n̪ n̪ʰ |
ɳ ɳʰ |
ɲ | ŋ | ||
Liquids | ʋ ʋʰ |
l ɾ lʰ ɾʰ |
ɭ ɽ | j |
Front | Central | Back | |
---|---|---|---|
High | iː i |
uː u | |
Mid | eː | ə | oː |
Low | aː |
संगणकावर मराठी
हा चार्ट देवनागरी लिपीसाठी आहे, यातील काही अक्षरे मराठीत वापरली जात नाहीत आणि मराठीतील काही अक्षरे या चार्टात नाहीत.
चार्टात नसलेली मराठी अक्षरे
- ॲ
- च़ छ़ ज झ़ ञ़
- र्य
- र्ह
देवनागरी युनिकोड | 0 | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | A | B | C | D | E | F |
U+090x | ऀ | ँ | ं | ः | ऄ | अ | आ | इ | ई | उ | ऊ | ऋ | ऌ | ऍ | ऎ | ए |
U+091x | ऐ | ऑ | ऒ | ओ | औ | क | ख | ग | घ | ङ | ङ | च | छ | ज | झ | ञ |
U+092x | ट | ठ | ड | ढ | ण | त | थ | द | न | ऩ | प | फ | ब | भ | म | य |
U+093x | र | ऱ | ल | ळ | ऴ | व | श | ष | स | ह | ऻ | ऽ | ा | ि | ी | ु |
U+094x | ू | ृ | ॄ | ॅ | ॆ | े | ै | ॉ | ॊ | ो | ौ | ् | ॎ | ॏ | ॐ | ॒ |
U+095x | ॓ | ॔ | ॕ | ॖ | ॗ | क़ | ॖ | ॗ | क़ | ख़ | ग़ | ज़ | ड़ | ढ़ | फ़ | य़ |
U+096x | ॠ | ॡ | ॢ | ॣ | । | ॥ | ० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
U+097x | ॰ | ॱ | ॲ | ॳ | ॴ | ॵ | ॶ | ॷ | ॸ | ॹ | ॺ | ॻ | ॼ | ॽ | ॾ | ॿ |
↓ ☸ → | ० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | A | B | C | D | E | F |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
u+A8Ex | ꣠ | ꣡ | ꣢ | ꣣ | ꣤ | ꣥ | ꣦ | ꣧ | ꣨ | ꣩ | ꣪ | ꣫ | ꣬ | ꣭ | ꣮ | ꣯ |
u+A8Fx | ꣰ | ꣱ | ꣲ | ꣳ | ꣴ | ꣵ | ꣶ | ꣷ | ꣸ | ꣹ | ꣺ | ꣻ |
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदान
- भाषा सल्लागार मंडळ : हे बंद पडले आहे.
- भाषा संचालनालय
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
- विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ : हे बंद पडले आहे.
- भाषा सल्लागार समिती
- विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती (केवळ अस्तित्वमात्र शिल्लक आहे).
- राज्य विकास मराठी संस्था (१९९२) : (केवळ पुस्तक प्रकाशने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचे काम करीत राहिल्याने या संस्था-स्थापनेचा मूळ हेतू बारगळला
- मराठी भाषा अभ्यास परिषद
- मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
- विदर्भ साहित्य संघ : ही बिनसरकारी संस्था आहे.
- महाराष्ट्र साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
- मराठवाडा साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
- कोकण मराठी साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
हेसुद्धा पहा
- देवनागरी
- मोडी
- युनिकोड
- संगणक आणि मराठी
- महाराष्ट्र
- मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने
- मराठी साहित्य संमेलने
- अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन
- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण
- मराठी-मराठी शब्दकोशांची सूची
- शब्दकोशांची सूची
मराठी संकेतस्थळे
- विकिपीडिया हे जाहिरात करण्याचे स्थळ नसल्यामुळे, कृपया संकेतस्थळांचे दुवे मुख्य लेख - मराठी संकेतस्थळे
या लेखातच द्यावेत. या विभागात मराठी संकेतस्थळे हा लेख पूर्ण झाल्यानंतर दुवाविरहित परिच्छेद अतंर्भूत केला जाईल या दृष्टीने ह्या विभागात रस असलेल्यांनी मराठी संकेतस्थळे हा लेख परिपूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
संदर्भ
- ^ भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार
- ^ एथनोलॉगचा मराठी बाबतचा अहवाल
- ^ इंडियनलँग्वेजेस.कॉम- मराठी
- ^ दादरा व नगर हवेली प्रशासनाचे माहितीपत्रक
- ^ गोवा विद्यापीठ- मराठी विभाग
- ^ महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा
- ^ गुलबर्गा विद्यापीठ
- ^ देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर
- ^ जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली
- ^ १९६० मधे महाराष्ट्राचे एकभाषिक राज्य स्थापन झाले - मराठीमाती
- ^ Google च्या http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34417:2009-12-24-16-51-58&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 [मृत दुवा]ची कॅश आहे. 29 Dec 2009 08:22:53 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा फोटो आहे.
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |