प्रभाकर दातार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रभाकर जनार्दन दातार (१७५५:गंगापूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र - १८४३) हे मराठी लावणीकार होते. हेमुरुड या गावचा राहणारा. त्याने पेशवाईचा उत्कर्ष आणि अपकर्ष दोन्हीही पाहिले. दातार यांचा जन्म गंगापूर जि. नाशिक येथे झाला. २०-२२ व्या वर्षी तो पुण्यात दाखल झाला. गंगू हैबतीच्या फडात नंतर तो सामील झाला. प्रभाकरच्या कवनाने तो काळ गाजविला त्याच्या कवनात उत्तान श्रुंगार आढळतो. त्याचा संग्रह १९२० मधे प्रसिद्ध झाला. १३ पोवाडे ११९ लावण्या त्याने लिहिल्या. माधवराव पेशवे यांचा 'रंग' आणि त्यांचा 'मृत्यू' यासंबधीचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. सवाई माधवरावांचा पोवाडा करुणरसाचा उत्कट अविष्कार करतो.