पंजाबी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंजाबी
ਪੰਜਾਬੀ, پنجابی, पंजाबी
स्थानिक वापर भारत, पाकिस्तान
प्रदेश पंजाब प्रदेश
लोकसंख्या १३ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी गुरमुखी, शाहमुखी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

भारत ध्वज भारत

पाकिस्तान ध्वज पाकिस्तान

भाषा संकेत
ISO ६३९-१ pa
ISO ६३९-२ pan
ISO ६३९-३ pan (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
लंडन शहराच्या साउथॉल भागामधील इंग्लिश व गुरमुखीमध्ये लिहिलेला एक फलक

पंजाबी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख भाषा आहे. जगभर सुमारे १३ कोटी भाषिक असणारी पंजाबी जगातील नवव्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. पंजाबी व्यक्तींची ही मातृभाषा असून भारतपाकिस्तान देशांत विभागल्या गेलेल्या पंजाब प्रदेशामधील प्रमुख भाषा आहे.

पंजाबी पाकिस्तानामधील प्रथम तर भारतामध्ये अकराव्या क्रमांकाची भाषा असून कॅनडायुनायटेड किंग्डममध्ये पंजाबी भाषिकांची संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. एका पाहणीनुसार पाकिस्तानमध्ये ७.६ कोटी (२००८), भारतामध्ये ३.३ कोटी (२०११), युनायटेड किंग्डममध्ये १३ लाख (२०००) तर कॅनडामध्ये ३.६८ लाख (२००६) पंजाबी भाषिक होते. भारतामध्ये अमृतसर, जालंधर, चंदीगड, लुधियाना ही प्रमुख पंजाबी भाषिक महानगरे आहेत. लाहोर शहरामधील ८६ टक्के तर पाकिस्तानमधील ४४ टक्के लोक पंजाबी भाषिक आहेत.

भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार पंजाबी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. भारताच्या सिनेउद्योगामध्ये पंजाबीला विशेष स्थान असून बॉलिवूड चित्रपटांमधील ५० टक्क्यांहून अधिक लोकप्रिय गाणी पंजाबी भाषेमध्ये असतात.

बाराव्या शतकामध्ये एक स्वतंत्र भाषा म्हणून उदयास आलेली पंजाबी पंधराव्या शतकामध्ये स्थापन झालेल्या शीख धर्मामधील मुख्य भाषा बनली. गुरू ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ प्रामुख्याने गुरमुखी लिपी वापरून पंजाबीमध्येच लिहिला गेला आहे. गुरू नानकांच्या आयुष्यावर लिहिला गेलेला जनमसाखी हा कथासंग्रह सर्वात जुन्या पंजाबी वाङमयापैकी एक मानला जातो. शाह हुसेन, सुलतान बाबू, शाह शरफ बुल्ले शाह इत्यादी मध्य युगीन सूफी पंजाबी कवी होऊन गेले.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत