इंडो-युरोपीय भाषासमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंडो-युरोपीय भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
  बहुसंख्य इंडो-युरोपीय भाषिक लोक असणारे जगातील देश
  अल्पसंख्य इंडो-युरोपीय भाषिक लोक असणारे देश

इंडो-युरोपीय हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. युरोप, दक्षिण आशिया, इराण, अनातोलिया इत्यादी भूभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बव्हंशी प्रमुख भाषा ह्याच कुळातील आहेत.

सध्या जगात ३ अब्ज इंडो-युरोपीय भाषिक लोक आहेत. जगातील २० प्रमुख भाषांपैकी स्पॅनिश, इंग्लिश, हिंदी, पोर्तुगीज, बांग्ला, रशियन, जर्मन, मराठी, फ्रेंच, इटालियन, पंजाबीउर्दू ह्या १२ भाषा इंडो-युरोपीय कुळामधील आहेत.


वर्गीकरण[संपादन]

जगातील सर्व इंडो-युरोपीय भाषांचे साधारणपणे १० गटांमध्ये वर्गीकरण केले जाते.

युरोपआशियामधील इंडो-युरोपीय भाषांचे वर्गीकरण
  हेलेनिक (ग्रीक)
  इटालिक (रोमान्स)
  बाल्टो-स्लाव्हिकः (बाल्टिक)
  बाल्टो-स्लाव्हिकः (स्लाविक)
  इंडो-युरोपेतर भाषा
 1. अनातोलियनः अनातोलिया भागात अतिप्राचीन काळापासून ते मध्य युगाच्या सुरूवातीपर्यंत बोलल्या जाणाऱ्या व सध्या नष्ट झालेल्या भाषांचा एक समूह.
 2. हेलेनिकः प्राचीन व आजची ग्रीक भाषा व तिच्या इतर प्रकारांच्या भाषांचा समूह
 3. इंडो-इराणी
 4. इटालिकः लॅटिनरोमान्स भाषा.
 5. सेल्टिक[१][२]
 6. जर्मेनिक
 7. आर्मेनियन
 8. तोचारियनः ग्रीसमधील लुप्त झालेल्या भाषांचा समूह
 9. बाल्टो-स्लाव्हिकः बाल्टिक भाषा (लात्व्हियन आणि लिथुएनियन) व स्लाव्हिक भाषांचा समूह
 10. आल्बेनियन[३][४]

संदर्भ[संपादन]

 1. Celtic from the West Chapter 9: Paradigm Shift? Interpreting Tartessian as Celtic. 
 2. Tartessian 2: The Inscription of Mesas do Castelinho ro and the Verbal Complex. Preliminaries to Historical Phonology. 
 3. Of the Albanian Language. William Martin Leake, London, 1814.
 4. The Thracian language.