चित्पावनी बोलीभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चित्पावनी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Wiktionary-logo-mr.png
Look up चित्पावनी बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
चित्पावनी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
कर्नाटकातील काही भागात बोलल्या जाणाऱ्या चित्पावनी भाषेचा नमुना

चित्पावनी ही मराठी भाषेची एक बोलीभाषा आहे. ही भाषा महाराष्ट्रात दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली असली तरी अजूनही गोव्याच्या काही भागात आणि कर्नाटकातील काही भागात विशेषतः कारवार, उडुपी भागात ही भाषा अजूनही काही कुटुंबांत बोलली जाते. हिचा वापर मुख्यत्वे चित्पावन ब्राह्मण समाजात होत असे.

चित्पावनी बोलीतले काही शब्द[संपादन]

असलो - होतो
असस - आहेस
असां/असे - आहे
आत्वार - स्वैपाकघर
आंबडणे - हाकलणे
आमचेत्यां = आमच्याकडे, त्याचप्रमाणे मामात्यां=मामाकडे, तुमचेत्यां = तुमच्याकडे इत्यादी
आसा - आहेत
इलास - आलांस
ओखद - औषध
कई =कधीतरी
करूक - करायला
कापूचे - कापायचे
कामेरी - कामकरी स्त्री
कार्रोय =कुठेही
कितां - काय? कें - कोठे/कुठे?
केडला - कधी
केंथीन - कोठून? खळां= अंगण
खायल्या =खालच्या
गोरवां ढोरवां - गुरे ढोरे
चिचाहारली - चिंचेकडली
जपाचां - जपायला
जपान - जपून
ठिकाण=कुळागर
ठेयलांसे - ठेवले आहे
तां - तें
तेला - त्याला, तसेच हेला - ह्याला. माला - मला
तोरेचां पाणी - गोड्या पाण्यात मासेमारी करताना एक प्रकारची फळे वापरतात. त्यामुळे ती फळे वापरली की पाणी बाधते. तशा पाण्याला तोरेचां पाणी म्हणतात.
नी, मां, मरे - ?
नेचे - नेते
पणस=फणस
पहू=पोहे
पाडूचे - पाडायचे
पेरां= पेरू
बेडे=सुपाऱ्या
बोड्यो - मुलगा
भाऊश - भाऊ
भिंडा - कोकम
भेणिश - बहीण
माटव=मांडव
माड्यो=माडीचे बहुवचन. माडी=पोफळीचे झाड
में - मी
म्हणीं - म्हणून
येवजलाच नतलां = विचारच केला नव्हता
ऱ्हेव्वे =रहायला; त्याचप्रमाणे ल्हेव्वे=लिहायला, खायवे=खायला, जेववे/जेव्वे = जेवायला, पव्वे=पोहायला
रात्रीचां -रात्रीचे
रेहे - रहा
लागता - लागते
वय - झाड्या/काट्याकुट्यांचे कुंपण
वर्खां=वर्षे
वावरचे - वावरते
शकसां= शकेन
शिरश्याची=शिरशीची (शिरशी या गावची)
सत =आहेत
सनार=असणार
सयन - असेन
सलां = होतं
सांगेव्यो= सांगाव्यात
सांबारां - आमटी
सोपसत - संपतात
हकडा तकडा - इकडे तिकडे
हठा - येथे
हाड - आण; हाडां - आणा.
०हारी - ०कडे


चित्पावनी भाषेसंबंधी पुस्तके[संपादन]

  • सुलभ चित्पावनी - लेखक श्री. श्रीधर बर्वे, अस्नोडा गोवा
    खडतर जिणा - लेखक. श्री.अशोक नेने कडतरी गोवा

काळजातले कुकारे - लेखक. श्री.अशोक नेने कडतरी गोवा चित्पावनी भाषेतील पहिले नाटक -ना घरना दार लेखक. श्री. अशोक नेने चित्पावनी भाषेतील नाटक - निबरातील सावली लेखक. श्रीधर बर्वे अस्नोडा गोवा

संदर्भ[संपादन]