Jump to content

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचि स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. 'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.

महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके

[संपादन]

महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या [] या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासूनच्या अध्यक्षांची यादी क्रमानुसार अशी-(तर्कतीर्थ) लक्ष्मणशास्त्री जोशी, सुरेन्द्र बारलिंगे, यशवंत मनोहर, य. दि. फडके, विद्याधर गोखले, मधुकर आष्टीकर, द. मा. मिरासदार, सुरेश द्वादशीवार, रा. रं. बोराडे, रतनलाल सोनग्रा, मधु मंगेश कर्णिक, बाबा भांड

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
अध्यक्षकार्यकाळउल्लेखनीय योगदान/वैशिष्ट्ये
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी१९६० – १९८०मंडळाचे पहिले अध्यक्ष. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विश्वकोश निर्मितीच्या प्रकल्पास गती मिळाली.
डॉ. सुरेंद्र बारलिंगे१९८० – १९८८प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि लेखक. त्यांनी मंडळाच्या ग्रंथ प्रकाशन योजनेत मोलाची भूमिका बजावली.
डॉ. य. दि. फडके१९८८ – १९९१नामवंत इतिहासकार आणि संशोधक. त्यांनी मंडळाच्या माध्यमातून अनेक दुर्मिळ ग्रंथांचे पुनरुज्जीवन केले.
प्रा. राम शेवाळकर१९९१ – १९९४प्रख्यात वक्ते आणि साहित्यिक. मंडळाच्या कामात लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न.
रा. ग. जाधव१९९५ – १९९८समर्थ समीक्षक आणि कवी. वाङ्मयीन संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी कार्य केले.
डॉ. द. भि. कुलकर्णी२००१ – २००४कवी आणि समीक्षक. साहित्यातील सौंदर्याशास्त्राचे अभ्यासक
ना. धों. महानोर२००४ – २००८निसर्गकवी आणि शेतीनिष्ठ साहित्यिक. ग्रामीण साहित्याला प्रोत्साहन देण्याचे काम केले.
मधू मंगेश कर्णिक२००८ – २०११कोकणच्या मातीतील ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार. 'अमृतमहोत्सवी' वर्षाचे उपक्रम राबवले.
हेमंत टकले२०१२ – २०१४साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते. मंडळाच्या प्रशासकीय कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे२०१५ – २०१७थोर इतिहास संशोधक आणि लेखक. शिवचरित्र घराघरांत पोहोचवण्यासाठी कार्य.
डॉ. सदानंद मोरे२०१७ – २०२३संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि विचारवंत. तुकाराम गाथा आणि वारकरी संप्रदायावर विशेष संशोधन.
मीनाक्षी पाटील२०२३ – २०२४कवी आणि प्रशासक. मंडळाच्या पहिल्या महिला सचिव आणि नंतर अध्यक्ष
डॉ. सदानंद मोरे२०२४ – सध्यापुन्हा एकदा मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या योजना

[संपादन]
  • पुस्तक प्रकाशन योजना - विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणे
  • महाराष्ट्राचे शिल्पकार चरित्रमाला योजना
  • उत्कृष्ट ग्रंथांची भाषांतरे योजना
  • ललित व ललितेतर वाड्:मयाच्या प्रकाशनार्थ अनुदान योजना
  • नवलेखक पुस्तक प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ अनुदान योजना
  • नवलेखक कार्यशाळा अनुदान योजना
  • नियतकालिकांना अनुदान योजना
  • अन्य मराठी साहित्य संमेलनांना अनुदान योजना

नेटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेली पुस्तकांची यादी

[संपादन]
  • आरोग्य आणि आहारशास्त्र
  • आर्थिक सिद्धान्त व अर्धविकसित प्रदेश
  • आसरा
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - तेजस्विनी अहिल्याबाई होळकर
  • आशियाई क्रीडास्पर्धा
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - भाई उद्धवराव पाटील
  • उद्‌भट आणि त्याचा काव्यालंकार सारसंग्रह
  • एमिली डिकिन्सन : निवडक कविता
  • कबड्डी
  • कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी
  • कात्यायन शुल्ब सूत्रे
  • खानदेशातील कृषक जीवन - सचित्र कोश
  • गजाआडच्या कविता
  • सर्वज्ञ श्री चक्रधर
  • चरियापिटक
  • चिरकालीन सिरॅमिक्स
  • चौदा पत्रे
  • जीवनसंग्राम
  • झुंडशाहीचे बंड
  • टोळ्ळुगट्टी
  • ट्रांझिस्टर
  • डिझेल एंजिन
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - ताराबाई शिंदे
  • ताऱ्यांचे अंतरंग
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - दादासाहेब फाळके
  • हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त
  • धन्याचा बंदा गुलाम
  • धर्मकीर्तन
  • महाराष्ट्राचे शिल्पकार –महर्षी धोंडो केशव कर्वे
  • नाट्यमंडप
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - नाना पाटील
  • पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास
  • पाणी पुरवठा
  • प्लॅस्टिकची मेजवानी
  • फळे व भाज्यांपासून टिकाऊ पदार्थ
  • बहुरूपी बहुगुणी कार्बन
  • भरताच्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय
  • भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -भाग १ ते ५
  • मधुमेह
  • मराठी वाङ्‍मयकोश खंड दुसरा भाग एक मराठी ग्रंथकार (दिवंगत)
  • मराठी वाङ्‍मयकोश खंड ३ रा (ग्रंथपरिचय) इ.स. १८५८ ते १९६०
  • महात्मा गांधी – रविंद्रनाथ ठाकूर
  • महात्मा ज्योतिराव फुले
  • महाराष्ट्राची सागरी मत्स्यसंपत्ती
  • मानवी आनुवंशिकता
  • माहेरी गेली
  • मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा
  • मोरस कथा दशावतार
  • मोरस-मराठी कविता दशावतार
  • महाराष्ट्राचे शिल्पकार – यदुनाथ थत्ते
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे
  • लिओनार्दो दा विंची
  • लुकेना
  • वंश आणि वंशवाद
  • महाराष्ट्राचे शिल्पकार – वसंतराव नाईक
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - डॉ. विठ्ठलराव विखेपाटील
  • विलक्षण जपानी
  • संगीताचार्य पं. विष्णू नारायण भातखंडे
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - शंकरराव किर्लोस्कर
  • शरीर -एक समरांगण
  • संगीत आणि कल्पकता
  • श्री संत शुभराय महाराज कलाकृतीसंग्रह-चित्रचिरंतन
  • समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी
  • संहितासमीक्षा आणि पारिभाषिक संज्ञा
  • सुती वस्त्रोद्योग
  • सुब्बण्णा
  • सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने
  • स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र
  • हॉकी
  • THE HIGH-CASTE HINDU WOMAN(PANDITA RAMABAI)
  • Maratha Wall Paintings

(अपूर्ण यादी)

मंडळातर्फे मराठी साहित्यसेवेसाठी दिले जाणारे पुरस्कार

[संपादन]
  • गौरवमूर्ती पुरस्कार
  • स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कार
  • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
  • श्री. पु. भागवत पुरस्कार


अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]
https://msblc.maharashtra.gov.in/ Archived 2018-05-01 at the वेबॅक मशीन.