रघुनाथ पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रघुनाथ पंडित, जन्म : बहुधा सतराव्या शतकातला परंतु वादग्रस्त व अनिर्णित. मराठी काव्य परंपरेतील हे एक श्रेष्ठ पंडित व कवी होत. यांचे संस्कृतफार्सी या भाषांवर प्रभुत्व होते. महाभारतातील कथा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे कवी.

जीवन[संपादन]

रघुनाथ पंडित शिवाजीच्या काळातील असावेत असे अ.का.प्रियोळकर व द.सी.पंगू यांचे अनुमान आहे.

काव्य संपदा[संपादन]

  • रामदास वर्णन
  • गजेंद्रमोक्ष
  • दमयंती स्वयंवर

तेथील एक कलहंस तटीं निजेला ।

जो भागला जलविहार विशेष केला ॥|

पोटीच एक पद, लांबविला दुजा तो ।

पक्षी तनु लपवि, भूप तया पाहतो ॥१॥

(दमयंती स्वयंवर श्लोक क्र. ४२) - संपादक अ. का. प्रियोळकर