राज्यव्यवहार कोश
शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. . राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. राज्यव्यवहार कोश हा मुळात रघुनाथ हनुमंते (पंडित) यांनी करवून घेतला होता आणि नंतर त्यांनी तो शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी नजर केला असे एक मत आहे.[१] ह्या कोशाच्या सुरुवातीस असणारे श्लोक, ज्यानुसार हा कोश शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला असे निर्देशित होते, नंतर घातले गेले असावेत. या म्हणण्यास पुरावा हा आहे की या रचनेत हनुमंते कुळाची स्तुती करण्यासाठी कर्त्याकडून जास्त शब्द खर्ची घातले गेलेले आहेत. हा कोश राज्याभिषेकाच्या वेळी जर शिवाजी महाराजांनी करवून घेतला असता तर असे झाले नसते. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या राज्यव्यवहार कोशाचा कर्ता रघुनाथ पंडित नसून तंजावरचा ढुंढिराज व्यास हा आहे. सेतु माधव पगडींच्यामतेमात्र तो कोश रघुनाथ नारायण हणमंते(रघुनाथ पंडित) यांचाच. हा कोश फार्सी-मराठी नसून दख्खनीयावनी(उर्दू)-संस्कृत आहे. त्यातल्या १३८० शब्दांपैकी फारतर दहा टक्के शब्द मराठीत अजूनही प्रचलित आहेत.चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.
कोशातील शब्द
[संपादन]मराठी भाषेत प्रचलित असलेल्या परकीय भाषेच्या सुळसुळाटाला शिवाजी महाराजांनीन राज्यव्यवहारकोश करून चांगलाच शह दिला होता हे सर्वसाधारणपणे मान्य करण्यास कोणाचेही दुमत नसावे. ही गोष्ट खरोखरच खरी. इतिहासकार वि. का. राजवाड्यांच्या मते सन १६२८ मध्ये मराठी(+फ़ार्सी) पत्रलेखनात मराठी शब्दांचे प्रमाण १६२८ मध्ये शेकडा १४.४ टक्के होते, ते १६७७ मध्ये ६२.७ एवढे आणि १७२८मध्ये ९३.७ टक्क्यांपर्यंत वाढले. सध्याच्या लाखभर शब्दसंख्या असलेल्या मराठीत तुर्की-अरबी-फ़ार्सी शब्द फक्त २९००(२.९६%) आहेत.
इतके असूनसुद्धा मराठीतून फ़ार्सी शब्दांचे उच्चाटन झाले नाही. शिवाजी महाराज पुरस्कृत शब्दकोशातील अनेक शब्द टिकले नाहीत. मराठीतले सध्याचे फ़ार्सी शब्द संस्कृत शब्दापेक्षा अर्थाची वेगळी छटा दाखवतात आणि त्यामुळे सर्रास वापरले जातात.[२]
वजीरच्या जागी प्रधान, दिवाणच्या जागी सचिव असे संस्कृत शब्द उपयोजण्यास सांगितले. सेनापती, सुमंत, अमात्य, न्यायाधीश हे शब्दही या कोषाचीच देणगी. [३]
कोशात अरबी-फार्सी-तुर्की शब्दांना संस्कृत प्रतिशब्द दिले आहेत. उदा. गरम-उष्ण, गुलाम-दास, चोपदार-दण्डधर, चाकर-सेवक [४]
सेनापती, सुमंत, अमात्य, न्यायाधीश हे शब्दही या कोषाचीच देणगी. योगप्रभू म्हणतात तसे, कोशात 'सेनापती' 'सुमंत' नाहीत. सेनाकर्ता व सेनानी, आणि सुमंत्र आहेत. अनेक प्रांतांवर नेमलेल्या अधिकाऱ्यासाठी सुमंत्र(फारसी, कारमुल्की! ). वजिरासाठी सामंत(प्रधान नाही! ) (सामंत म्हणजे स्वतंत्र नसलेला छोटा राजा,; लष्करातला वरिष्ठ अधिकारी) आणि सरनोबतसाठी सेनानी आणि दलवायी. [५]
घोडा ( अश्व), पागा ( अश्वशाला), साहेब ( स्वामी), अमात्य, कोषागर
मूळ श्लोक
[संपादन]शिवाजीपुरस्कृत राजव्यवहारकोशातील मूळ श्लोक असेः अमात्यः स्यात् मजुमदारः सेनाकर्ता हुकूमतः । (राजव्यवहारकोश १. ३) वाकनीसोऽपि मंत्री स्यात् न्यायाधीशोप्यदालतः । कारमुल्की तु सुमंत्रः स्यात् सभासद् स्यात् मजालसी ॥ (राव्यको १. ४) शाहजादा राजपुत्रः प्रधानः पेशवा तथा । (१. २) सामंतोऽस्तु वजीरः स्यात् सैन्यं लष्करमीरितम् । सरनोबतस्तु सेनानी जुमलेदारः शताधिपः ॥ (६.१) पदातिसैन्यं हशमं प्यादा पत्तिः प्रकीर्तितः । तत्र सरनोबतो यस्तु दलवायीस ईरितः॥ (६.५) इत्यलम् ।
संदर्भ
[संपादन]- ^ टिकेकर, एस आर. "Rajya Vyavahara Kosha A Reappraisal". www.archives.com. 29-11-20 रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ [शुद्ध मराठी] (मंगळ., ०८/०९/२००९ - १९:५६).
- ^ योगप्रभू (गुरु., ०३/०९/२००९ - १४:१७).
- ^ शुद्ध मराठी (गुरु., ०३/०९/२००९ - २२:४१).
- ^ प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०६/०९/२००९ - २३:०६).