दशावतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजा रवी वर्मा यांनी काढलेले दशावतारांचे चित्र
दशावतार origional photo

विष्णूचे दशावतार[संपादन]

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात की,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

अर्थात, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते म्हणजेच लोक धर्माचरण सोडून भ्रष्टाचारी ,व्यसनी होतात आणि वेद-शास्त्र , गोमाता ,यज्ञ -याग या सर्वांचा लोकांना विसर पडून दहशतवाद उफाळू लागतो तेव्हा आणि जेव्हा अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा मी या भारतवर्षात अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.

भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.

दशावतार म्हणजे हिंदू धर्म आणि सदभक्तांचे रक्षण करून सत्य श्रेष्ठ हिंदू धर्माची पुनः स्थापना करण्यासाठी श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या (ईश्वराच्या ) आद्नेने क्षत्रियाद्य श्रीहरी ने धारण केलेले १० शाश्वत आणि मूळ अवतार . या सर्व अवतारांत श्री हरी आपल्या पूर्ण सच्चिदानंद स्वरुपांत प्रकट झाला आहे . या सर्व अवतारांसंबंधी माहिती सांगणारा श्लोक "कलियुगाचे युगनेमस्त सत्य श्रेष्ठ ईश्वरीय ज्ञान उपदेशक श्रीमत सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी" महाराजांच्या "श्री जातवेद महावाक्यांग " या ग्रंथा मध्ये त्यांनी निरुपण केला आहे तो असा

    "मच्छा पासुनी चार स्वामी हरी 'जो अवतार घेतो कृती '
     त्रेती वामन फर्श राम 'तिसरा श्रीराम सीतापती '
     द्वापारी कृष्णनाथ बौध्य दुसरा 'पाळी स्वयें पांडवा '
      कलीत अवतार एक हरीचा' कलंकी नमो केशवा "

याचा अर्थ कि आजवर क्षत्रीयाद्य श्रीहरीने कुता युगात मच्छ ,कच्छ ,वराह ,नृसिंह त्रेतायुगात वामन ,परशुराम आणि श्रीराम त्याचप्रमाणे द्वापार युगात श्री कृष्ण आणि बौध्य म्हणजे बोधराज स्वामी श्री विठ्ठल (बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध आणि बौध्य हे वेगळे शब्द आहेत . बौध्य चा अर्थ गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे असा आहे कि विशाल भाल असलेला ,संपूर्ण मौन धारण केलेला ,कटी कर ठेऊन भक्त रक्षणासाठी उभा असलेला असा तो .पण सध्याचे अध्यात्मिक गुरु आणि धर्मप्रचारक यांच्या मौना मुळेच हरीचा ९वा अवतार लोक गौतम बुद्धाला मानतात पण गौतम बुद्ध हा हरी अवतार नाही हे सत्य आहे संदर्भासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही संताचे आणि संत कबीर दासांचे ग्रंथ पहा ) आणि शेवटचा कलियुगातील कलंकी केशव अवतार जो करवीर(कोल्हापूर) येथे कलियुगाच्या अंतिम चरनांत होईल ज्याला अजून अंदाजे ४ लक्ष २७ सहस्त्र वर्षे बाकी आहेत .

 • मत्स्य
 • कूर्म
 • वराह
 • नरसिंह
 • वामन
 • परशुराम
 • श्रीराम
 • श्रीकृष्ण
 • बौध्य (बोधराज स्वामी श्री विठ्ठल )
 • कल्की

जीवसृष्टीच्या उत्क्रांतीची प्रतिके[संपादन]

मत्स्यावतार[संपादन]

मुख्य लेख: मत्स्यावतार

दशावतार हे पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या उत्क्रांती-अवस्थेचे अगदी चपखल वर्णन करतात असे एक मत आहे.[ संदर्भ हवा ] आधुनिक जीवशास्त्राचे असे म्हणणे आहे कि सर्वप्रथम पृथ्वीवरचा एकपेशीय जीव पाण्यात जन्मला.तो पेशींची विभागणी करून प्रजोत्पादन करू लागला.त्यातूनच मग बहुपेशीय सजीव निर्माण झालेत व ते लैंगिक प्रजोत्पादन करणारे जीव होते.मत्स्य हा त्यातील सर्वात विकसित जीव आहे.याचे प्रतिक म्हणून प्रथम अवतार हा मत्स्यावतार आहे.हा वैदिक प्रजापतीविष्णूचा पहिला अवतार आहे.[ संदर्भ हवा ]

कूर्मावतार[संपादन]

मुख्य लेख: कूर्म अवतार

प्रथम उद्भवलेल्या जलचर प्राण्यांतून उत्क्रांती होत-होत मग उभयचर प्राणी निर्माण झालेत.कूर्म हा एक उभयचर प्राणी होता. त्याचे प्रतिक म्हणून कूर्मावतार.कूर्माचे आयुष्यपण इतर प्राण्यांपेक्षा जास्तच असते.[ संदर्भ हवा ] तैत्तरीय आरण्यक आणि शतपथ ब्राह्मण ग्रंथात याचा उल्लेख सापडतो.

पुराणांनुसार, समुद्रमंथनाचे वेळी जेंव्हा मेरू पर्वताची रवी करून देव व दैत्य हे त्यास घुसळू लागले, तेंव्हा मेरू पर्वताची उंची ही समुद्राच्या खोलीपेक्षा कमी पडली.त्यामुळे मेरू पर्वत बुडू लागतो. तेंव्हा विष्णूने कूर्मावतार घेऊन आपल्या पाठीवर त्यास तोलून धरले अशी आख्यायिका आहे.

वराहावतार[संपादन]

मुख्य लेख: वराह अवतार

जामिनीवर राहणारे प्राणी मग उभयचरांतून उत्क्रांत झाले. त्यातील वराह हा तिसरा अवतार होय. हा प्राणी आपल्या खास चार वैशिष्ट्यांमुळे सर्व प्राण्यात उठून दिसतो.१. त्याची प्रजननशक्ती २. त्याचे तीक्ष्ण घ्राणेंद्रीय जे सुमारे ८ ते १० किमी अंतरावरील तसेच जमिनीच्या खाली सुमारे ८ मीटर अंतरावरील वस्तूसुद्धा वास घेऊन हुडकू शकते.म्हणजेच माग काढण्याचे कौशल्य. ३.झाडांना आपल्या सुळ्याद्वारे समूळ उखडून टाकण्याचे कौशल्य. समूळ उच्चाटन करणे हा भाव. व ४. हाडांचादेखील चूरा करू शकणारा मजबूत ताकतीचा जबडा. वराहावतारात विष्णूने पृथ्वी उचलली असा समज आहे. वराह हा राजशक्तीचे प्रतिक आहे. राजाच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण त्यात आहेत असा समज आहे.

नरसिंहावतार[संपादन]

मुख्य लेख: नृसिंह

नरसिंह म्हणजे अर्धा नर व अर्धा सिंह(वनचर). या अवतारात श्रीविष्णूने आपल्या प्रल्हाद या भक्ताची जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ही श्रद्धा व धारणा नक्की केली.

वामनावतार[संपादन]

मुख्य लेख: वामन अवतार

वामन म्हणजे बुटका, बुद्धीचा वापर करणारा असा वामनाअवतार.त्याने आपल्या बुद्धीने बली राजास पातळात धाडले.

परशुरामावतार[संपादन]

मुख्य लेख: परशुराम

पुढे मानवात अजून उत्क्रांती होत गेली.तो जीवनापयोगी व जीवन राखण्यास आवश्यक ती साधने बनवू लागला. त्याने धातूचा वापर सुरू केला.परशुसाठी धातूचे पाते वापरणारा तो परशुराम.त्यांनी या परशुच्या जोरावर २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली.तसेच भारतातील कोकण गोवा व केरळ ही किनारपट्टी मागे हटवून स्वतःसाठी भूमी तयार केली.भीष्म द्रोणकर्ण यांना धनुर्विद्या शिकविणारे हेच होते. हा अवतार म्हणजे ब्राह्मतेजक्षात्रतेज याचा मिलापच होता.

रामावतार[संपादन]

मुख्य लेख: राम

परशु हे शस्त्र असे आहे कि त्याचा शत्रुवर फार जवळून वापर करावा लागतो.त्यामध्ये शत्रुचा वार आपल्यावर देखील होण्याचा संभव असतो. यासाठी स्वतःस सुरक्षित ठेऊन, दूरवर मारा करता येण्याजोगे शस्त्र धनुष्यबाण वापरणारा हा राम.ही देखील पुढची उत्क्रांती.रामकृष्ण यांना पूर्णावतार म्हणतात कारण यांनी जीवनाचे चारही आश्रम भोगले.जन्मापासून मृत्यूपर्यंत देहाच्या सर्व अवस्था पार केल्या.रामबाण हा प्रख्यात शब्द रामाच्या बाणावरुनच आला.अचूक वेध घेण्याचे कौशल्य असा याचा अर्थ होतो.

कृष्णावतार[संपादन]

मुख्य लेख: कृष्ण

यानंतर कृष्णावतार झाला.तो हरहुन्नरी होता.पराक्रमी,मुष्टीयोद्धा,मुत्सद्दी,उत्कृष्ट सारथी,सखा, प्रियकर, तत्त्वज्ञानी होता.अष्टपैलू होता.हा मानवाचा सर्वांगिण विकास होय.

बौद्धावतार[संपादन]

मुख्य लेख: बौद्धावतार

कल्की अवतार[संपादन]

मुख्य लेख: कल्की अवतार

चित्र सज्जा[संपादन]