मराठी संकेतस्थळे
सेर्नचे अभियंता टिम बर्नर्स-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली[१]. सेर्न या संस्थेने ३० एप्रिल १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२]
सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसांना इंटरनेटने एकत्र आणले आहे. आधुनिक जगाचे संवाद माध्यम असणाऱ्या सायबर विश्वात अगदी आत्मविश्वासाने संचार करून मराठीनेही ‘अमृताशी पैजा जिंकणारी भाषा‘ हा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. तुकारामाची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिरी काव्य ते थेट गदिमा, पुलंपर्यंतची मराठी मनात घर करून बसलेली अनेक श्रद्धास्थाने इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
सध्या संपूर्णपणे मराठीत असलेल्या संकेतस्थळांची एकूण संख्या --- एवढी आहे.[ संदर्भ हवा ]
मराठी संकेतस्थळांच्या निर्मितीचा इतिहास
फॉन्ट डाउनलोड करावी लागणारी संकेतस्थळे, डायनॅमिक एनकोडिंगमधील संकेतस्थळे व युनिकोडमधील संकेतस्थळे असे मराठीतील सुरुवातीच्या संकेतस्थळांचे प्रमुख टप्पे आहेत.
सुरुवातीच्या काळात आंतरजालावर रोमन लिपीचा वापर करत मराठी लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता. मराठी पीपल२ हा याहू ग्रुप सर्वाधिक मराठी व्यक्तींना सदस्य करून रोमनलिपीचा वापर करून कार्यरत राहिला आहे.[ संदर्भ हवा ]डायनॅमिक फॉन्ट वापरून तयार केलेल्या मायबोली डॉट कॉमने प्रथम मराठीतून संवाद घडवून आघाडी घेतली[ संदर्भ हवा ]. मराठीतील पहिले वृत्तपत्रीय संकेतस्थळ लोकमतचे www.lokmat.com हे १९९८ मध्ये सुरू झाले. या वृत्तपत्रात सर्वप्रथम मराठी डायनॅमिक फॉन्ट वापरला गेला. ई-सकाळ हे युनिकोडमध्ये बनविलेले पहिले मराठी वृत्तपत्रीय संकेतस्थळ. ई-सकाळने सुरुवातीच्या काळात मराठीत रूपांतरणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
मराठीतील पहिले संकेत स्थळ
मराठी संकेतस्थळांच्या विकासाचे टप्पे
मराठी संकेतस्थळांचे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान
१९८५ नंतर राजीव गांधींनी भारतात केलेली संगणक क्रांती,जवळपास त्याच काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्रीवसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थाना दिलेला प्रवेश,१९९१ नंतर झालेले आर्थिक उदारीकरण आणि त्याच कालावधीत अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर पाश्चात्त्य देशात भारतीय संगणक अभियंत्यांना आणि कंपन्याना वाढलेली मागणी पूर्ण करताना शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या मराठी समुदायपण जगभर स्थलांतरित झाला. आंतरजाल, ईमेल आणि मराठी संकेतस्थळे यांनी या समुद्रापार राहणाऱ्या, तसेच बृहन्मराठी समाजाची मातृभूमीशी, मित्रांशी तसेच मराठी भाषेची आणि संस्कृतीची नाळ जोडून ठेवण्याचे मोठे भरीव कार्य केले.[ संदर्भ हवा ]
या काळात मराठी खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली. महाराष्ट्र भूमीत वावरणाऱ्या मराठीने 'हे विश्वची माझे घर' ही उक्ती सार्थ ठरवली. मराठी ग्लोबल होताना साहजिकच तिची माध्यमे वेगळी आहेत. इथे पत्राना नव्हे तर ई - पत्रांना महत्त्व आहे. आपण ग्लोबल मराठीच्या काळात आहोत. हा काळ इंटरनेटचा, म्हणजेच शुद्ध मराठीत महाजालाचा आहे. त्यामुळे सध्या महाजालावर मराठी काय म्हणते, हे जाणणे काळाची गरज आहे.
संत तुकारामांची संपूर्ण अभंगगाथा इंटरनेटवर (www.tukaram.com) उपलब्ध आहे. तुकारामांचे तब्बल साडेचार हजार अभंग या संकेतस्थळावर मूळ मराठीत वाचायला मिळतातच, शिवाय महाराष्ट्रातील या महान संताचा परिचय करून देणारे हिंदी, स्पॅनिश, रशियन, जर्मन आणि इंग्रजी भाषेतील लेखही या संकेतस्थळावर आहेत. ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी‘ मूळ स्वरूपात मराही विकिस्रोत प्रकल्पात उपलब्ध आहेत.
सहज सोप्या आणि प्रासादिक रचनांमुळे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, ते गदिमाही या सायबरविश्वात भेटतात. १३ ऑक्टोबर इ.स. १९९८ मध्ये www.gadima.com हे संकेतस्थळ सुरू झाले असून, आजवर सुमारे ५३ लाख सायबरयात्रींनी या संकेतस्थळास भेट दिली आहे.[ संदर्भ हवा ] मराठी काव्यविश्वात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणाऱ्या कुसुमाग्रजांची कविताही www.kusumanjali.com या संकेतस्थळावर वाचता येऊ शकते. मराठीतील अनेक नामवंत दिनदर्शिका, प्रमुख वृत्तपत्रे, इंटरनेटवर आहेत. कळव्यातील स्मिता मनोहर या तरुणीने वेब डिझायनिंगचा डिप्लोमा करीत असताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु.ल. देशपांडे यांच्याविषयीचे www.puladeshpande.net हे संकेतस्थळ निर्माण केले.
बदलत्या काळाची स्पंदने टिपून वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या [ग्रंथाली]]नेही www.marathividyapeeth.org[मृत दुवा] या संकेतस्थळाद्वारे जगभरातील मराठी माणसांशी संवाद साधला होता. ग्रंथालीने या संकेतस्थळास मराठी विद्यापीठ म्हटले होते. जगभरातील मराठी माणसांना महाराष्ट्रात काय सुरू आहे, याबाबत उत्सुकता असते. तर नाट्य कलावंतांमध्ये दिलीप प्रभावळकर (www.dilipprabhavalkar.com) आणि प्रशांत दामले (www.prashantdamle.com) यांची संकेतस्थळे आवर्जून भेट देण्याजोगी आहेत. आरोग्य डॉट कॉम (www.aarogya.com) हे आरोग्यविषयक इत्थंभूत माहिती देणारे संकेतस्थळ इंग्रजीप्रमाणेच मराठीतही उपलब्ध आहे.
पारिभाषिक शब्दांची निर्मिती
इंग्रजी शब्दांना चपखल मराठी पारिभाषिक शब्द न आठवणे ही संकेतस्थळांवर मराठीत लेखन करताना येणारी एक अडचण असते. याकरिता विविध मराठी संकेतस्थळांवर विशेष चर्चा पाने निर्माण करून चर्चा केल्या जातात व शब्दभांडार, विक्शनरी अशा माध्यमांतून मराठी शब्दांचे संकलन होते. मराठी शब्दांना जनमानसांत रुजवण्याचे प्रयत्नदेखील बरीच संकेतस्थळे करतात.
मराठी संकेतस्थळांसमोरची तांत्रिक आव्हाने
आंतरजालावर या संकेतस्थळांनी मराठी आणले तरी त्यांचा उद्देश त्या त्या संकेतस्थळाची भरभराट व्हावी असा होता का खरोखरच मराठीची भरभराट व्हावी असा होता? उदा. अनेकदा मनोगतावर इथले सॉफ्टवेअर मुक्तस्रोत करावे अशा मागण्या येऊनही मनोगतकारांनी ते टाळले. (त्यात काही धोरणाचा भाग असेल आणि चालक म्हणून तो त्यांचा निर्णय आहे). पण त्यामुळे नवीन संकेतस्थळ तयार करणाऱ्यांना अडचणी आल्या. यावर सगळ्यात पहिल्यांदा देवनागरीमध्ये मुक्तस्रोत सुविधा निर्माण करणाऱ्या ओंकार जोशींना विसरून चालणार नाही. त्यांनी कुणालाही फुकट देवनागरीत लेखन करता येईल अशी सुविधा निर्माण केली हा मराठी संकेतस्थळांच्या वाटचालीतला मैलाचा दगड आहे.
मराठी ओपनसोर्स या याहू ग्रुपचे सभासद कुठलाही गाजावाजा न करता विविध सॉफ्टवेअरचे स्थानिकीकरण आणि मराठीत भाषांतर करत आहेत. मराठी संकेतस्थळांच्याही पलीकडेही आंतरजालावर मराठी आहे हे विसरून चालणार नाही.
आज द्रुपल आणि गमभन प्रणालीवर अनेक मराठी संकेतस्थळे तयार होत आहेत. पण काही अपवाद वगळता मराठी संकेतस्थळांच्या चालकांपैकी कुणीही त्यांना सापडलेल्या त्रुटी आणि त्यावरचे उपाय यांच्या माहितीची मुक्तपणे देवाणघेवाण करताना दिसत नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा हा विचार मिलिंद भांडारकर यानी मनोगतावर मांडल्याचे आठवते.
आज गमभन आणि द्रुपल यांनी दिलेले योगदान (इश्यू क्यू) पाहिले तर लोकायत, मायबोली यासारख्या मोजक्याच संकेतस्थळांनी आपआपल्या परीने हे मुक्तस्रोत जाहीर करून समाजाचे ऋण फेडायचा प्रयत्न केलेला दिसतो. संकेतस्थळे ही कोणत्याही साक्षर व्यक्तीस सहज हाताळण्याजोगा मार्ग आहे. परंतु सरळ सामान्य उपयोगकर्त्यांच्या हातात पोहचण्याकरिता आडचणीचा मार्ग अजूनही दूरचा आहे. संकेतस्थळांचे उपलब्ध होणे वाचक-लेखकाकडे संगणक व इंटरनेट सुविधा असण्यावर अवलंबून आहे. संगणक आणि इंटरनेट जेथे उपलब्ध आहेत तेथेही मराठी फॉंन्ट्स उपलब्ध असतीलच याची खात्री नसते. काही संकेतस्थळांवर त्यांचेचे स्वतःचे फ़ॉन्ट्स असल्याने तिथे ही अडचण जाणवत नाही. त्याशिवाय ऑपरेटिंग सिस्टिम्ज़ आणि ब्राउझर्स(न्याहाळक) आजही प्राधान्याने इंग्रजी भाषेतच आहेत. मराठी संकेतस्थळे सतत नव्यानव्या तांत्रिक प्रगतीस सामावून घेण्याची आव्हाने पेलण्याचा शक्यतेवढा प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या मोबाइल फोनवर मराठी संकेतस्थळांची उपलब्धता असणे हे असेच एक आव्हान आहे.[३]
मराठी fonts
आशय व्यवस्थापन सॉफ्टवेअर (कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर)
'आशय व्यवस्थापन सॉफ्टवेअर' ('कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेर', लघुरूप: CMS) म्हणजे संकेतस्थळावरील मजकूर व व्हिडिओ, चित्रे इत्यादी बहुमाध्यमी आशयाचे व्यवस्थापन करणारी सॉफ्टवेअर प्रणाली होय. संकेतस्थळावरील विविध प्रकारांतील माहिती वापरकर्त्यांना सोप्या स्वरूपात वापरता यावी, हा आशय व्यवस्थापन सॉफ्टवेअरांचा उद्देश असतो. मराठी संकेतस्थळे चालवण्यासाठी ड्रूपल, मीडियाविकी यांसारख्या देवनागरी मराठी लिपी वापरण्यास सक्षम अशा आशय व्यवस्थापन सॉफ्टवेअर प्रणाल्या वापरल्या जातात.
ड्रूपल
ड्रूपल (ड्रूपल अधिकृत संकेतस्थळ) हे आशय व्यवस्थापन सॉफ्टवेअर चर्चात्मक मराठी संकेतस्थळांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते [४]. एनट्रान्स (एनट्रान्स अधिकृत संकेतस्थळ) या देवनागरी टंकलेखनासाठी उपलब्ध पॅकेजातील 'इंडिक वेब इनपुट' या उपयोजनात 'मुक्त जीएनयू परवाना' वापरून काही बाबी बदलून टेक्स्टएरिया आणि टेक्स्टफील्ड यांसाठी लिप्यंतरणाची सोय करण्यात आली आहे. लिप्यंतरणासाठी केवळ उच्चारानुसारी (फोनेटिक) कीबोर्ड ठेवण्यात आला आहे. ड्रूपलशिवाय जूमला, टायपो किंवा अन्य आशय व्यवस्थापन सॉफ्टवेअरांसाठीदेखील ही सुविधा किरकोळ बदल करून वापरता येते.
मीडियाविकी
मीडियाविकी (http://www.mediawiki.org) हे एक लोकप्रिय आशय व्यवस्थापन सॉफ्टवेअर आहे. मराठी विकिपीडिया व मराठी विक्शनरी, मराठी विकिबुक्स, मराठी विकिक्वोट्स यांसारखे मराठीतील अन्य विकिमीडिया सहप्रकल्प या सॉफ्टवेर प्रणालीवर चालतात. हे सॉफ्टवेअर मुक्तस्रोत असून याच्या सॉफ्टवेअर विकसनात सहभाग घेण्यास मुक्तप्रवेश आहे. मराठीतील स्वतःचे स्वतंत्र संकेतस्थळ बनवण्यासाठी कोणासही हे सॉफ्टवेअर मुक्त वापरता येते.
मराठी संकेतस्थळांसमोरची आर्थिक मॉडेले आणि आव्हाने
मराठी संकेतस्थळांचे भविष्यातील स्वरूप
फॉन्ट डाउनलोड करावी लागणारी संकेतस्थळे
किरण भावे यांचे www.kiranfont.com या त्यांनी तयार केलेल्या संकेतस्थळावरून फाँट डाऊनलोड करता येतात. या फाँटाच्या साहाय्यानेही काही मराठी तसेच संस्कृत भाषा, त्यातील विविध विषयांचे साहित्य यांचा परिचय करून देणारे गीर्वाणभारती (www. girvanbharati.com) हे संकेतस्थळ आहे.
डायनॅमिक फॉन्टमधील संकेतस्थळे
युनिकोडमधील संकेतस्थळे
मराठी संकेतस्थळांचे युनिकोडीकरण
लोकप्रिय संकेतस्थळे
- हे मराठी भाषेतील सुरेश भट यांच्या साहित्यासंबंधी संकेतस्थळ आहे
- हे मराठी भाषेतील गदिमांच्या साहित्यासंबंधीचे संकेतस्थळ आहे
महाराष्ट्र आणि मराठीविषयक पण मराठी भाषेत नसलेली संकेतस्थळे
महाराष्ट्र मंडळांच्या संकेत स्थळांचे कार्य
परदेशात मराठी माणसांनी त्या अनोळखी प्रदेशात मराठी मंडळांची स्थापना करून स्वतःची ओळख जपली. संस्कृती जिवंत ठेवली. जशी मराठी माणसाने प्रगती केली तशीच त्याच्या मंडळांनी. मंडळांच्या कक्षा रुंदावल्या आणि आजमितीस जगभरच्या मराठी मंडळांनी अनेक चांगले उपक्रम राबवत तिथे जन्मलेल्या पुढच्या पिढीला माय मराठीची जपणूक करायला चांगले काम केले आहे. [५]
परदेशस्थ मराठी मंडळांनी गेल्या काही वर्षात महाराष्टातल्या अनेक दिग्गजांना विशेष आमंत्रण देऊन त्यांचा आपल्या कर्मभूमीत सत्कार केला आणि ही मंडळे महाराष्ट्रातील मराठी माणसाला महत्त्वाची वाटू लागली. मराठी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या उपक्रमांची दखल घ्यायला सुरुवात केली आणि लक्षात आले की ही मंडळे खूप फॉरवर्ड आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय करता येईल याचा विचार या मंडळांमध्ये होतोय. महत्त्वाचे म्हणजे या सर्व मंडळांनी आपल्या वेबसाइट तयार करून आपल्या उपक्रमांची सविस्तर माहिती त्यात दिली आहे. कुणाला मंडळाच्या सदस्यांशी संवाद साधायचा असेल, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी काही करायचे असेल किंवा मराठी संस्कृतीसाठी एखादा उपक्रम राबवायचा असेल तर त्यासाठीचे मार्गदर्शन या मंडळांच्या वेबसाइटवर असते. या साइट बघितल्या तरी तिकडल्या मंडळांचे उपक्रम लक्षात येतात. गुगलवर नुसता marathi mandal असे टाइप करून सर्च केले तरी मराठी मंडळांच्या अनेक साइटची यादीच दिसते. मात्र या सगळ्या साइट पाहताना एक बाब ठळकपणे लक्षात येते ती म्हणजे , अनेक साइटचा बराचसा मजकूर हा इंग्रजीतच आहे. महाराष्ट्र टाइम्सचे लेखक रोहन जुवेकर यांच्या मतानुसार मंडळांचे कार्यक्रम मराठी आणि त्यांच्या साइट मात्र इंग्रजी हा प्रकार समजण्यापलIकडे आहे. सर्वच साइटवर मंडळाची माहिती, त्यांच्या स्थापनेपासूनचा इतिहास, मंडळाचे उपक्रम आणि भविष्यातील कार्यक्रम ही माहिती प्रामुख्याने आहे. तसेच त्यांच्या कार्यक्रमांचे फोटो आहेत.[५]
bmmonline.org बृहनमहाराष्ट्र मंडळ या अमेरिकेतील मराठी मंडळाची साइट सर्वांचे तुतारी वाजवतच स्वागत करते. अमेरिकेत १९८१ साली स्थापन झालेल्या बीएमएमचा आतापर्यंतचा इतिहास, त्यांचे उपक्रम याबाबत साइटवर माहिती आहे. अमेरिकेत राहून उत्कृष्ट मराठी साहित्य निर्मितीचा प्रयत्न करणाऱ्या एनआरएमसाठी या साइटवर साहित्य सहवास ही खास लिंक आहे. बीएमएम बझारमध्ये पुस्तक खरेदीची सोय आहे तर बृहनमहाराष्ट्र वृत्तमध्ये मंडळाच्या कार्याचा आढावा घेणारा अहवाल. दरवर्षी कन्व्हेन्शनचे आयोजन करणाऱ्या बीएमएमच्या वर्षभरातील अन्य कार्यक्रमांची माहिती आगामी कार्यक्रममध्ये आहे. साइटच्या मुख्य लिंक डावीकडे आहेत. या लिंकवर कर्सर नेताच लिंकचे मराठी नाव वाचण्याची सोय तिथे आहे. या पद्धतीने साइटमधून मराठीपण जपणारी आतल्या पानांवर मात्र इंग्रजीमध्येच वाचावी लागते. याच साइटवर महाराष्ट्र मंडळे येथे अमेरिका आणि कॅनडातील अन्य मराठी मंडळांच्या लिंक पाहण्याची सोय आहे.[५]
mbmtoronto.com वेबसाइटला मॉडर्न लुक आहे. कॅनडातल्या मराठी भाषिक मंडळाची mbmtoronto.com ही साइट अमेरिकेच्या बीएमएमच्या सदस्य मंडळांपैकी एका मंडळाची आहे. यात मंडळाचा इतिहास , उपक्रम आणि मंडळाचे सदस्यत्व कसे घ्यायचे याची माहिती देणाऱ्या लिंक्स आहेत. [५]
mmlondon.co.uk लंडनमध्ये असलेल्या महाराष्ट्र मंडळ, लंडनची mmlondon.co.uk ही साइट इंग्लडमधील सर्व मराठी मंडळांची तसेच महाराष्ट्रासाठी कार्यरत अन्य सेवाभावी मंडळाच्या लिंक्स आपल्याला उपलब्ध करून देते. युझफुल लिंक्स मध्ये अनेक सेवाभावी मंडळांच्या साइटची यादी आहे. हेच या साइटचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. अनेक विशेष उपक्रम राबवणाऱ्या या मंडळाच्यावतीने वाचनालय चालवण्यात येते. क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याबाबत साइटवर थोडक्यात माहिती आढळते. फोटोंचा संग्रह ही या साइटची खासीयत आहे पण मोठ्या फाइल असल्यामुळे कमी इंटरनेट स्पीड असणाऱ्या भागातील युजरना फोटो पाहणे कठीण आहे.[५]
marathi.org.au मराठी मंडळ सिडनीची marathi.org.au ही साइट ऑस्ट्रेलियातील मराठी माणसांच्या उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. या साइटच्या युजफुल लिंकमध्ये आपल्याला मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाइटची यादी मिळते. वृत्तपत्रावर क्लिक करून थेट त्याच्या साइटवर जाता येते. साइटवर पैसे भारतात पाठवण्यासाठी मनी ट्रान्सफरची सोय आहे. मंडळाच्या कार्यक्रमांचे फोटो आहेत पण ते खास वाटत नाहीत. हीच या साइटची उणीव आहे.[५]
sutra.co.jp/marathi/newSite/main.html जपानच्या टोकियो मराठी मंडळाची साइटचे ( sutra.co.jp/marathi/newSite/main.html ) वैशिष्ट्य म्हणजे अन्य मंडळांच्या साइटप्रमाणे या साइटची पाने इंग्रजीत नाहीत तर चक्क मराठीत आहेत. साइट जपानी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे.[५]
marathimandal-norway.no मराठी मंडळांच्या अन्य साइट पाहून नॉर्वेच्या मंडळाची ( marathimandal-norway.no ) साइट पाहताना मात्र ही साइट बरेच दिवस अपडेट झाली नसावी अशी शंका येते. अतिशय साधी सजावट आणि तीन वर्षांपूर्वीची माहिती त्यात आढळते.[५]
mmabudhabi.com mmabudhabi.com या अबुधाबी येथील मराठी मंडळाच्या साइटचे पहिले पान मराठीत मजकुराने भरलेले आहे.[५]
maharashtramandalkenya.com अमेरिका , युरोपमध्येच मराठी मंडळे आहेत हा समज दूर करणारे एक मराठी मंडळ आफ्रिकेत नैरोबीत आहे. त्यांनी नुकतीच आपली साइट सुरू केली आहे , maharashtramandalkenya.com .[५]
याहू, एम्एस्एन इत्यादी ग्रुप्सचे मराठी व महाराष्ट्राकरिता योगदान
ऑनलाइन मराठी ग्रुप्स(याहू,गूगल,एम्एस्एन) आणि (ऑर्कुट,फेसबुक इत्यादींवरील)तसेच (बॅचमेट डॉटकॉम इत्यादी) कम्युनिटीजच्या निर्मितीबद्दल(evolution) व सामाजिक योगदानाबद्दल लिहा, केवळ दुवे नका देऊ! धन्यवाद.
पुरस्कारप्राप्त संकेतस्थळे
महाराष्ट्र शासनातर्फे २००६ मध्ये व २०१० मध्ये अशी दोन वेळा मराठी संकेतस्थळांची स्पर्धा घेतली आहे.
२००६ मध्ये घेतलेल्या मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेचा निकाल
राज्य मराठी विकास संस्थेने जनभारती C-DAC व महाराष्ट्र शासनाच्या IT विभागाच्या सहकार्याने मराठी वेबसाइट स्पर्धा घेण्यात आली त्याचे निकाल खालीलप्रमाणे:
•प्रथम पुरस्कार : अवकाशवेध (सचिन पिळणकर, Prabhadevi, Mumbai)
•द्वितीय पुरस्कार : मनोगत (महेश वेलणकर, Florida, U.S.A.)
•तृतीय पुरस्कार : ट्रेक्षितीज (प्राजक्ता महाजन, Dombivali)
•तृतीय पुरस्कार : तरुणाई (वंदना खरे, Pukar, Fort, Mumbai)
•Consolation पुरस्कार पु.ल.देशपांडे (स्मिता मनोहर, kalwa, Thane)
•Consolation पुरस्कार माय कोल्हापूर (एस.वी. रानडे, Sangali)
शेवटच्या फेरीचे परीक्षक होते
◦डॉ.बाळ फोंडके (Ex-Director National Institute of Science Communication)
◦डॉ. अलका इराणी (Chief Investigator, Janabhaaratii)
◦डॉ. अरुणचंद्र पाठक (Executive Editor and Secretary Gazetteers Dept. Govt of Maharashtra)
◦प्रा.एम.जी.राजाध्यक्ष (Ex. Dean. J.J. School of Applied Arts)
◦प्रा. हृषीकेश जोशी (I.I.T. Powai) ◦श्री. अच्युत पालव (Chief Executive,Resonanse Advertising and eminent caligrapher)
२०१० मध्ये घेतलेल्या मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेचा निकाल
शासकीय संकेतस्थळांचा गट
प्रथम क्रमांक (रु. १५०००/-) : http://www.yashada.org
द्वितीय क्रमांक (रु. १००००/-) : http://www.adfmaharashtra.in
तृतीय क्रमांक (विभागून) : http://mudkhednp.gov.in (प्रत्येकी रु.२५००/-) : http://www.zpdhule.gov.in
इतर प्रथम क्रमांक (विभागून) : http://www.arogyavidya.org (प्रत्येकी रु.१७५००/-) : http://www.baljagat.com
द्वितीय क्रमांक (विभागून) : http://www.mr.upakram.org (प्रत्येकी रु.१००००/-) : http://www.sahajach.com
तृतीय क्रमांक (विभागून) : http://www.tukaram.com (प्रत्येकी रु. ७५००/-) : http://www.champralekhan.com
प्राथमिक फेरी श्री.विकास सोनवणी, प्रा. उदय रोटे, श्रीम. काजल नाईक, श्री. अतुल ढेंगरे, प्रा. संतोष क्षीरसागर, प्रा. अविनाश रूगे, श्री. अमोल माळी,श्री. गिरीश पतके, श्रीमती शुभदा नंदर्षी, श्री. अमोल सुरोशे, श्रीमती शारदा सायवन, श्री. उदय कुलकर्णी
अंतिम फेरी श्रीमती अलका इराणी, श्री. सतीश तांबे, श्री. चिन्मय केळकर
राज्य मराठी विकास संस्था - संकेतस्थळ - http://rmvs.maharashtra.gov.in/rmvs/
......................................
शैक्षणिक संकेतस्थळे
http://marathishabda.com/moodle
साहित्यविश्वाला वाहिलेली संकेतस्थळे
मराठी ग्रंथ
मराठी वृत्तपत्रे
जवळजवळ १५ मराठी वृत्तपत्रांच्या ई - आवृत्या आहेत.( पहा http://batmidar2.blogspot.com/ मराठी वृत्तपत्रे विभाग)विविध वृत्तपत्रांची सतत अपडेट होणारी संस्थळे आहेत. 'ई - सकाळ' ने (www.esakal.com), महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रांच्या संस्थळांच्या वाचकांना प्रतिसाद देण्याची सोय उपलब्ध असते. या विविध ई-पत्रांना दिवसाला लाखो व्यक्ती भेट देतात [ संदर्भ हवा ]. याशिवाय दोन वृत्तवाहिन्या संस्थळावर उपलब्ध आहेत. फक्त नेटवर असणारे एक चॅनेलदेखील आहे. (www.nautankitv.com) याशिवाय कळते - समजते (www/batamidar2.blogspot.com) द्वारे ई - पत्रकारिताही केली जाते. तर बातमीदार(www.batamidar.blogspot.com) सारखे संस्थळ पत्रकारांवर सतत नजर ठेवून असते.
वृत्तपत्रांची अधिकॄत संकेतस्थळे :
- गांवकरी
- batmya.com ऑनलाइन मराठी बातम्या
- सकाळ
- दैनिक लोकमत
- लोकसत्ता
- महाराष्ट्र टाइम्स
- सामना
- दैनिक पुढारी
- तरुण भारत
मराठी साप्ताहिके व मासिके
शासकीय संकेतस्थळे
महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळ (www.maharashtra.gov.in) संपूर्णपणे मराठीत असून येथे आपण आपल्या(?) भाषेत कोणतीही माहिती मिळवू शकतो. याशिवाय सतत अपडेट राहणारे (www.mahanews.gov.in) हे संकेतस्थळ आहे. याशिवाय जवळजवळ सर्व जिल्ह्यांची आणि महापालिकांची संकेतस्थळे आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ई - गव्हर्नन्समध्ये पुढारलेले आहे, असे यावरून वाटते. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक दस्तऐवजाचे महत्त्व असलेली गॅझेटियर्स(दर्शनिका)सुद्धा शासकीय संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
http://www.ildc.in/Marathi/Mindex.aspx मराठी भाषा तंत्रज्ञानामध्ये विकसित उपकरणें सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तरतुदीअंतर्गत www.ildc.gov.in तसेच www.ildc.in वेबसाईट मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे
शासकीय खाते | संकेतस्थळ |
3 | 4 |
शैक्षणिक संकेतस्थळे
शैक्षणिक संस्था/विभाग | संकेतस्थळ |
3 | 4 |
मराठी वेबमास्टर्स
काही उपयुक्त संकेतस्थळे
- स्पर्धा परीक्षा विषयक माहिती स्पर्धा परीक्षा
- [१] मराठीमध्ये अत्याधुनिक संकेतस्थळे बनवण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, माहिती व सेवा पुरवतात.
- बोल मराठी ब्लॉग बनवायला शिका अगदी सोप्या भाषेत..
- कानोकानी.कॉम :मराठीतले लोकप्रिय स्थळ. जे तुम्हाला हवे, ते कानोकानीने तुमच्यापर्यंत पोहोचवावे ||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- गूगल मराठीजगत शोध - मराठी व इतर देवनागरी भाषांसाठी (युनिकोड) शोधयंत्र||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
[२]||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठीमाती डॉट कॉम||वर्गीकरण||विशेष/मराठीमाती
- मराठीमाती डॉट नेट वर्डप्रेस या संगणक कार्य प्रणालीचा वापर करून बनविलेले मराठीमाती परिवाराचे नवीन संकेतस्थळ.
- मराठी पत्रकारांसाठी उपयुक्त वेबलॉग||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी छोट्या जाहिराती||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी उपयुक्त माहिती||रोजच्या जीवनातील उपयुक्त मराठी माहिती पुरविणारे संकेतस्थळ.
- ऐसीअक्षरे जगभर पसरलेल्या मराठी भाषकांच्या खुल्या अभिव्यक्तीसाठी असणारे आंतरजालीय व्यासपीठ. साहित्य आणि चर्चांची प्रतवारी करण्याची आणि वाचकांच्या प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा देणारे पहिले मराठी संस्थळ.
- मनोगत||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- अनामिका मराठी वाचनालय़... ग्रंथालय||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मायबोली||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठीवर्ल्ड||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी शब्दबंध||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- गुगल मराठी शोध||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी ब्लॉग्स||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी मित्र मराठी शिकण्यासाठी||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी पुस्तके||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी इंग्रजी शब्दकोश||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी जगत >> इथे मराठीचिये नगरी...||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी समुदाय||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- समग्र चिंटू संग्रह (Collection of Chintoo (Chintu) cartoon strips)||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी शब्द||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठीसूची-Free Marathi Link Sharing and Marathi Blogs aggregator||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
मराठी भाषेतील मुक्त शब्दभांडार - http://thebhandarkars.com/shabdabhandar/index.php?title=Main_Page%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://saanjavel.blogspot.com/%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास http://www.marathionline.com/%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://mr.wikipedia.org/wiki/Main_Page ||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. 'विकिपीडिया' हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. ही त्याची मराठी आवृत्ती आपण घडवू शकता. मराठी भाषेत 'विकिपीडिया' संकलित करण्यास हातभार लावा. 'विकिपीडिया'मध्ये लेखांची भर घालण्यासाठी (संकलित/संपादित करण्यासाठी) मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. तसेच मराठीचा संगणकीय वापर करण्यासाठीदेखील हा लेख उपयोगी आहे. सध्या(?) 'विकिपीडिया'मध्ये लेखांची एकूण संख्या १३६(?) आहे. मराठीभाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल.
http://maayboli.com/%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
हे 'मनोगत'प्रमाणेच परंतु किंचित निराळे आहे. ह्यात काही पूर्वनियोजित असे कप्पे असतात. त्यात तुम्ही तुमचे लिखाण लिहू शकता.
http://marathiworld.com%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://www.mazikavita.com/main.html%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
माझी कविता
सदर संकेतस्थळावर चंद्रशेखर गोखले, गिरीश ओक, निशिगंधा वाड आदींच्या मोजक्याच कविता उपलब्ध आहेत.
पुलदेशपांडे. नेट
इथे पुलंच्या बहुरूपी व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवणारे अनेक दुवे आहेत. flash मधील एक "बहुरूपी पुलं"ही. त्यांची अनेक छायाचित्रे, काही पत्रे, काही कविता, लेख, चाहत्यांची पत्रे, हस्ताक्षर इत्यादीही इथे उपलब्ध आहे.
सदर संकेतस्थळास आजवर ३ वर्षात साधारणपणे ८० हजार वेळा भेट दिली गेली आहे..... अर्थात पुन्हापुन्हा भेट देण्याजोगे आहे.
पुलदेशपांडे . नेट http://www.puladeshpande.net/%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
खगोलशास्त्रावरील मराठीतून माहिती देणारे संकेतस्थळ अवकाशवेध. यावर आपली सूर्यमाला, ग्रह, तारे व नक्षत्रांबद्दल माहिती उपलब्ध आहे.
तसेच काही चित्रे, या महिन्याचे आकाश इत्यादी माहिती आहे
http://www.avakashvedh.com%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://web.archive.org/web/20041211233538/http://n.1asphost.com/puladeshpande/AntuBarva.html अंतु बर्वा||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
या दुव्यावर काही मराठी पुस्तके online आहेत. http://www.rasik.com/marathi/index.html%7C%7Cवर्गीकरण%7C%7Cविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
जर खरेदी करावीशी वाटली तर येथे पुस्तके विकत मिळतात.
(या संकेतस्थळाचा मी फक्त वाचक आहे. त्याव्यतिरिक्त माझा त्यांच्याशी काही संबंध नाही).
रसिकपुस्तके संकेतस्थळ आहे तर छान; पण या स्थळावरचा मजकूर युनिकोडित नसल्यामुळे ह्या स्थळाचा गूगल, याहू इ. सारख्या सर्वसाधारण शोधसाधनांद्वारे शोध करता येत नाही. म्हणून एखाद्या पुस्तकाबद्दल जर माहिती काढायची असली किंवा विकत घ्यायचे असले तर पानेच्या पाने शोधत बसावी लागतात. जर हे संकेतस्थळ युनिकोडित करण्यात आले तर फ़ायदा होईल; ग्राहकांचा तर होईलच, पण त्यामुळे अधिक पुस्तके विकली गेल्यामुळे रसिक पुस्तकवाल्यांचादेखील. मनोगत युनिकोडित असल्याचा हाच तर मुख्य फ़ायदा मला जाणवतो. उदा. जर कोणाला पोहे बनवण्याची पाकक्रिया हवी असली तर फक्त गूगलवर 'पोहे' हा शब्द शोधण्याची गरज आहे.. हा शोध त्यांना सरळ मनोगतवरच्या रोहिणीच्या पोहे बनवण्याची पाककृती लिहिलेल्या पानावर नेऊन सोडतो.... खरं तर मराठी बातमीपत्राच्या संकेतस्थळांनीसुद्धा युनिकोडचा वापर केला तर आपण बातम्यादेखील गूगलवर सरळ मराठीत शोधू शकू..[३]
http://www.cfilt.iitb.ac.in/marathi_Corpus/ ही काही उपयुक्त मराठी लेख/पुस्तके आहेत. याही दुव्याची माहिती मनोगतावर इतरत्र मिळाली.. वर्गीकरणविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
या ही संकेतस्थळाची माहिती मनोगतानेच दिली (?) इथे मराठीसह अनेक भारतीय भाषांचे विशाल शब्दकोश युनिकोडमधे उपलब्ध आहेत.
http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/वर्गीकरणविशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
डॉट कॉम मधले मराठी जग
==तात्पुरती यादी
बाह्यदुवा नाव | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.maharashtra.gov.in/ | शासकीय | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.GuruBirbal.com/ | आर्थिक साक्षरता | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.aathavanitli-gani.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.dilipprabhawalkar.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.kanokani.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.natak.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.marathimati.com | वर्गीकरण | विशेष/मराठीमाती |
http://www.marathimati.net | वर्गीकरण | विशेष/मराठीमाती |
http://www.marathimitra.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.Marathiworld.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.marathishabda.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.meemaza.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.mumbai-masala.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.mymarathi.org/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.Aathavanitli-Gani.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.gadima.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.natak.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.prashantdamle.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.dailykesari.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.dainikaikya.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.deshdoot.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.deshonnati.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.lokmat.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.loksatta.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.maharashtratimes.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.pudhari.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.saamana.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.esakal.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.tarunbharat.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.avakashvedh.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.chintoo.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.ekata.ca/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.aisiakshare.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.maayboli.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.bmmonline.org/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.manogat.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.rss.org | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.ramdas.org | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.satpudamanudevi.org | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.shanishinganapur.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.SwamiSamarth.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.tukaram.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
http://www.prashantdamle.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
https://mahasarav.com | शैक्षणिक | विशेष/मराठी लेखदुवा |
https://aamchimarathi.com | वर्गीकरण | विशेष/मराठी लेखदुवा |
ऐक्य, केसरी, तरूण भारत, देशोन्नती, देशदूत, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, सामना.
header 1 | header 2 | header 3 |
---|---|---|
row 1, cell 1 | row 1, cell 2 | row 1, cell 3 |
row 2, cell 1 | row 2, cell 2 | row 2, cell 3 |
हेसुद्धा पाहा
संदर्भ व नोंदी
- ^ The website of the world's first-ever web server". Retrieved on 2008-08-30.
- ^ Cailliau, Robert. "A Little History of the World Wide Web". Retrieved on 2007-02-16.
- ^ लोकायतवर मोबाईलवर मराठी संकेतस्थळे ही चर्चा १९ जून २००९ १ वाजून ४२ मिनिटांनी दिसली. त्याप्रमाणे
- ^ http://www.drupal.in/
- ^ a b c d e f g h i j [maharashtratimes.indiatimes.com/international/global-maharashtra/-/articleshow/4964962.cms? डॉट कॉम मधले मराठी जग महाराष्ट्र टाइम्स दिनांक Jul 9, 2009, 07.40 PM IST लेखक रोहन जुवेकर] संस्थळावरील लेख जसा पाहिला.
नोंदी
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |