बंजारा भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बंजारा बोली ही बंजारा समाजाची मायबोली असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे.[१]  

डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी , डॉ. राहुल सांस्कृत्यायन यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी एक सहिष्णूतेची मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ती निसर्गाच्या कुशीत बहरणारी आहे.धरती ,आकाश , चंद्र, तारे , पशू-पक्षी, नदी-नाले, झरे , वृक्ष-वेलीशी संवाद साधणारी निसर्गाची बोली आहेे" या शब्दात वर्णन‌ केले आहे.[२]


बंजारा बोली मराठी भाषांतर
याडी , ये जगेम तू सेती रूपवान छी | याडी, थारो घंळो रीण छ | आई, या जगात तू सर्वात सौंदर्यवान आहेस. आई, तुझे थोर उपकार आहे.
नायक, मारास्टेनं हारोभरो किदो | किरत वोरी सारी दनियाम गावै | नाईक ,यांनी महाराष्ट्राला हिरवेगार केले. किर्ती त्यांची जगभर गातात.
तू घंळी हार्द आवछी | तू आयीस कना ? वाटं जोवूं थारी | तू आयीस कना? तू खूप आठवतेस. तू येथील केंव्हा ? वाट बघतो/बघते तुझी. तू येथील केंव्हा?

बंजारा भाषा-साहित्य[संपादन]

बंजारा साहित्य-संस्कृती विश्वात अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कवी, लेखक, समिक्षक, गीतकार तर काही इतिहास संशोधक देखील लाभले आहे. ज्यामुळे बंजारा भाषा साहित्य आणि संस्कृती अबाधित राहण्यास फार मोठी मदत झाली. बंजारा साहित्य व इतिहासाचे आदयसंशोधक म्हणून इतिहासकार स्मृ.बळीराम पाटील यांना मानले जाते. तांडाकार स्मृ. आत्माराम राठोड उपाख्य डॅनियल राणा यांनी बंजारा साहित्याला पुढे आणले. "या पुढची घटना आम्हीही लिहू, आमची बंजारा बोली अजून लिपीबद्ध व्हायची आहे." असे 'लदेणी' मध्ये त्यांनी म्हटले होते. बंजारा भाषिक अस्मिता जाणवणारा हा प्रवास आजच्या एकविसाव्या शतकातही कायम टिकून आहे. बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक व चळवळीतील विचारवंत एकनाथ पवार-नायक यांनी बंजारा भाषेचे गौरवगीत लिहिले.

"केसूला नै मोरा री | धरती अंब्रेती बोला री |

म्हारी बोली बंजारा री || " (मराठी भावार्थ : पळस फुलाप्रमाणे बहरवणारी, धरती, आकाशासोबत बोलावणारी अशी माझी प्रिय बंजारा बोली आहे.)

बंजारा भाषेच्या दर्जासाठी लढा[संपादन]

बंजारा बोली ही भारतभर बोलली जाणणारी बंजारा समाजाची मायबोली आहे. संविधानाच्या आठव्या सुचीत समावेश करण्यात यावे, यासाठी सर्वप्रथम लोकसभेत खासदार हरिसिंग उर्फ हरिभाऊ राठोड यांनी शासनाकडे मागणी केली. त्यानंतर खासदार राजीव सातव यांनी देखील लोकसभेत मागणी रेटून बंजारा बोलीला भाषेचा दर्जा मिळण्याबाबत लढयाला गती दिली. कर्नाटक येथील खासदार उमेश जाधव यांनी देखील तशी मागणी शासनाकडे केली. 'तांडेसामू चालो' अभियान अंतर्गत पहिल्यांदाच बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्यात यावे, याबाबत 'चांदा ते बांदा' स्वाक्षरी मोहीम राबवली. प्रसिद्ध लेखक भिमणीपूत्र मोहन नाईक यांनी पत्रव्यवहार केले. पुढे राष्ट्रीय बंजारा परिषद व इतर संघटनांकडून जागृती निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील अनेक खासदार व आमदारांनी शासनाकडे लेखी पत्रव्यवहार केला. राज्यातील विधान परिषदेचे आमदार हरिसिंग राठोड व तत्कालीन मंत्री संजय सिंह राठोड यांनी शासनाकडे जोरकस मागणी रेटल्याने बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्राकडे तशी शिफारस देखील करण्यात आली. बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्यात यावे, यासाठी बंजारा समाजाकडून सातत्याने मागणी सुरू झालेली आहे.


बंजारा साहित्यिक व लेखक[संपादन]

संदर्भ : [३][४][५]

  1. ^ "Inclusion of Banjara language in 8th Schedule sought". द हिंदू (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ नायक - पवार, एकनाथ (2022). "केसुला नै मोरारी मायड भाषा बंजारारी". दैनिक सकाळ. नागपूर.
  3. ^ हुंमाळो नंगारारो. पोहरादेवी (महाराष्ट्र). डिसेंबर २०१८. p. 49. ISBN 978-16-30412-22-7.
  4. ^ चव्हाण, डॉ. मोहन (२००७). बंजारा बोली भाषा : एक अध्ययन. सूर्या प्रकाशन.
  5. ^ "बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा". वाशीम, बंजारा साहित्य संमेलन: लोकमत वृत्तपत्र. २०१६.