देवगिरीचे यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
देवगिरीचे यादव साम्राज्य
सेऊण (यादव) साम्राज्य
Blank.png इ.स. ८३०१३३४ Blank.png


Asia 1200ad.jpg
ब्रीदवाक्य: हर हर महादेव
राजधानी देवगिरी
शासनप्रकार राजतंत्र
अधिकृत भाषा मराठी
इतर भाषा कन्नड, महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत

सेवुण/सेऊण राजवंश किंवा देवगिरीचे यादव (इ.स. ८५० - इ.स. १३३४) हे महाराष्ट्रातील प्राचीन शासक आहेत. अशा सोमवंशी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. हे यादव महाभारत कालीन कृष्णाचे वंशज होते त्याबाबतीतले शिलालेख सापडलेले आहेत तसेच त्यासंबधीची बिरूदेही लावत. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात विस्तारलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र होते पण मांडलिक नव्हते, चालुक्यांच्या दुर्लक्षित शासनाला पाहून नंतर ते सुबाहूच्या कारकीर्दीत स्वतंत्र झाले. त्यांनी साम्राज्य व्यवस्थपनासाठी वारंगल व हाळेबीड येथे ऊपराजधान्या स्थापून दोन मुलांना तिकडे पाठवले. त्यांचेच वंशज भिल्लमदेव यादवने देवगिरी राजधानी केली तसेच राज्यात प्रजाहितेची अनेक कामे केली. यादव राजांनी अनेक मंदिरे बांधली, हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानली जातात, यादव काळात या शैलीला वेगळे नाव होते पण पुढे मुळचा यादवकुलीन नसलेला पण यादव राजा घोषित करणारा रामदेवराव याच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. राजा सिंघण (द्वितीय) आणि राजा महादेव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव राजाची तुलना महान राजांच्या तुलना होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्र प्रजा सुखी होती, पहिले मराठी राज्य म्हणून यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले. शिखर शिंगणापूरचे महादेव मंदिर सिंघणराजाने बांधले, सिंघण वरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा चक्रवर्ती सम्राट रामदेेवराय. यांच्या काळातच मराठी भाषेला राजास्रय मिळाला. संतशिरोमनी माऊलींना संरक्षण दिले. काही वर्षांनंतर अल्लाउद्दिन खिलजीने रामदेवरायांना फितूरीने पराभुत केले. त्यांचे जावई व सेनापती चंद्रवंशी यादव हरपालदेव यांना जिवंत सोलून देवगीरीच्या प्रवेशद्वाराला टांगुन ठेवून क्रूर हत्या केली. त्याच्याच कुळातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेरचे नाव जाधव या यादव वशंज मानल्या जात. महाराष्ट्रात आजही क्षत्रिय यादवराव, यादव ही आडनाव घराणी देवगिरी यादव मानले जातात. महाराष्ट्रात मंदिरे, बारव तसेच अनेक वास्तूकला ही देवगिरी यादव राजांची देनं आजही अनेक ठिकाणी व्यवस्थित तर काही ठिकाणी अवशेष रूपात पहावयास मिळते.

पुस्तक[संपादन]

  • देवगिरीचे यादव : इतिहास संशोधक महामहोपाध्याय डॉ.ब्रह्मानंद देशपांडे यांनी महाराष्ट्रातील पराक्रमी अशा यादव राजवंशावर लिहिलेला हा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे.

मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्या अजोड पराक्रमाने ४५० वर्षे महाराष्ट्राचे नाव झळकत ठेवणार्‍या कर्तबगार यादव राजांची सविस्तर ऐतिहासिक माहिती या ग्रंथात मिळते. भिल्लम, सेउणचंद्र, भिल्लम (पाचवा), जैतुगी (द्वितीय), सिंघणदेव (द्वितीय), कृष्णदेव, रामचंद्र अशा अनेक पराक्रमी यादवराजांची यशोगाथा या पुस्तकात वर्णिली आहे..