मोदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
खव्याचे मोदक

मोदक हा महाराष्ट्रातदक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो.[१] उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकोलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.[२]

अर्थ[संपादन]

मोदक या यामध्ये मोद असा शब्द आहे. जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" असे म्हटले जाते.[३]गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात.[४]

उकडीचे मोदक[संपादन]

भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करण्याची प्रथा आहे.[५] महाराष्ट्रात कोकण विभागात उकडीचे मोदक या प्रकारास महत्त्व असते.हे मोदक तांदळाच्या पिठापासून केले जातात.कोकणात हा पदार्थ विशेष प्रसिद्ध आहे.

पाककृती- साहित्य- तांदुळाची पिठी, मैदा, मीठ, तेल, सारणासाठी - खोबरे, गूळ, जायफळ पूड इ.

आवश्यक प्रमाणात पाणी घेऊन (साधारण पिठीच्या निम्म्या प्रमाणात) ते उकळावे. उकळी आल्यावर त्यात पिठी, आवश्यक वाटल्यास मैदा आणि किंचित मीठ व तेल घालून एकजीव करावे. गुठळ्या राहू देऊ नयेत. हे मिश्रण थंड झाल्यावर मळून घ्यावे. खोबरे आणि गूळ यांचे सारण शिजवून थंड करून घ्यावे.( सुकामेवा किंवा अन्य पौष्टिक पदार्थही या सारणात घालता येतात.) पिठाच्या गोळ्याची पारी करून त्याला पाकळ्या करून घ्याव्यात. त्याच्या आत खोब-याचे सारण भरावे. पाकळ्या बंद कराव्यात. असे सर्व मोदक भांड्यात किंवा कुकरमध्ये चाळणी ठेवून त्यावर वाफवून घ्यावेत. मोदकपात्रात असल्यास त्याचा वापर करावा.[६] हा पदार्थ तुपासह खाण्याची पद्धती प्रचलित आहे.

तळणीचे मोदक[संपादन]

अनंत चतुर्दशीला किंवा संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करण्याची पद्धती प्रचलित आहे. याचप्रमाणे खव्याचे, सुकामेव्याचे, पुरणाचे सारण भरूनसुद्धा मोदक तयार केले जातात.तळणीच्या मोदकांना उकडीच्या मोदकाला असते तसे सारण करतात. हे सारण काही वेळा सुके खोबरे आणि गूळ यांचेही मिश्रण असते. तांदळाच्या पिठाऐवजी हे मोदक कणकेचे करतात आणि सारण भरून मोदक तयार केल्यावर ते तळून घेतात.[६]


चित्रदालन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (en मजकूर). ABC-CLIO. आय.एस.बी.एन. 9781610694124. 
  2. ^ "मिसळ महोत्सवानंतर ठाण्यात भरणार मोदक महोत्सव (१. ८. २०१८)". 
  3. ^ "संस्कृत-हिन्दी शब्दकोश (पवर्ग) - विकिशब्दकोशः". sa.wiktionary.org (sa मजकूर). 2018-09-08 रोजी पाहिले. 
  4. ^ Kabootar, Kaue Aur Tote (hi मजकूर). Bhartiya Jnanpith. आय.एस.बी.एन. 9788126313938. 
  5. ^ Guides, Fodor's Travel (2015-03-31). Fodor's Essential India: with Delhi, Rajasthan, Mumbai & Kerala (en मजकूर). Fodor's Travel. आय.एस.बी.एन. 9781101878682. 
  6. a b CHANGEDE, RIMAL (2012-08-01). AAJACHA MENU (mr मजकूर). Mehta Publishing House. आय.एस.बी.एन. 9788177666922.