गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुरुजी तालीम गणपती

गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[१] एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

इतिहास[संपादन]

गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळ,पुणे

पुणे शहराच्या इतिहासात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य यासाठी प्रोत्साहन देणारा हा गणपती असल्याने याला मानाचे तिसरे स्थान देण्यात आले आहे.[२] कुस्तीच्या आखाड्यातील सदस्यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीचा हा गणपती आहे असे मानले जाते.[३] १८८७ साली भिकू शिंदे,शेख कासम वल्लाद,नानासाहेब खासगीवाले यांनी हा उत्सव सुरू केला.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'हे' आहेत पुण्यातील मानाचे पाच गणपती; असं दिमाखात झालं आगमन". लोकमत. 2021-09-10. 2021-09-17 रोजी पाहिले.
  2. ^ "मानाचे गणपती: कोणत्या गणपती मंडळाचा मान कितवा हे कसं ठरलं?".
  3. ^ "पुणे के 5 प्रसिद्ध गणपति, जानिए क्या है इनका इतिहास और क्यों है महत्व". टीव्ही९ भारतवर्ष (हिंदी भाषेत). 2022-08-31. 2022-09-04 रोजी पाहिले.
  4. ^ "गुरुजी तालीम गणपतीचा इतिहास". eSakal - Marathi Newspaper. 2023-09-21 रोजी पाहिले.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती
कसबा गणपतीतांबडी जोगेश्वरी गणपतीगुरुजी तालीम गणपतीतुळशीबाग गणपतीकेसरीवाडा गणपतीदगडूशेठ हलवाई गणपती