अंगारकी चतुर्थी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भारतीय कालगणनेनुसार कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे चौथी तिथी मंगळवारी आली तर त्या तिथीला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.[ संदर्भ हवा ]

धार्मिक महत्त्व[संपादन]

या दिवशी उपास केला असता, तसेच गणपती देवाची स्तुती केली असता विशेष प्रसन्नता वाटते, असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]

कथा व व्रत[संपादन]

मुदगल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. याचे पालन भूमातेने केले म्हणून त्याला ' भूमीपुत्र ' किंवा ' भौम ' असेही संबोधन आहे.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा[संपादन]

इतर[संपादन]

सार्वजनिक गणेशोत्सव[संपादन]

प्रसिद्ध गणपती मंदिरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

मोरगाव मयुरेश्वर मोरगाव