श्री गणेश अथर्वशीर्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


श्री गणेश अथर्वशीर्ष हे गणपतीचे एक स्तोत्र आहे.

इतिहास[संपादन]

श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले.

मराठी अथर्वशीर्ष[संपादन]

ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। तू साक्षात् नित्य तो आत्मा॥१॥ [१] ऋत मी सत्य मी वदे ॥२॥[२] करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरु - शिष्यांस रक्ष तू। मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण वरुनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥[३] जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा॥४॥ सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। तूचि वायु नि आकाश, वाणी स्थाने हि चार तू॥५॥[४] तू जसा त्रिगुणां-पार ,त्रिदेहांच्याहि पार तू। तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णुही। तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष, नि स्वर्गही। तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही॥ ६॥[५] आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । ‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ॥७॥[६] एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ॥ ८॥[७] एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । द्न्त नी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता । भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा। सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ॥ ९॥[८] वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। वांछिला वर देणार्याय, तव मूर्तिस वन्दन ॥१०॥[९]

महत्त्व[संपादन]

अन्य स्तोत्रांत आधी देवतेचे ध्यान, आणि नंतर स्तुती असते. परंतु श्री अथर्वशीर्षात आधी स्तुती आणि नंतर ध्यान अशी रचना आहे.

या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अज़ाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळीं पठण करणारा रात्रीं (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहित होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी अशा अनधिकार्याीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल. ॥११॥

या अथर्वशीर्षानें जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्त्म वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें वाक्य आहे. (याचा जप करणार्याीला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं. ॥१२॥ जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होतें. ॥१३॥

आठ ब्राम्हणांना योग्य प्रकारें (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपति प्रतिमेसंनिध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हें असें जाणतो. असें हें उपनिषद् आहे. ॥१४॥

मूळ स्रोत मजकूर विकिस्रोत मध्ये स्थानांतरीत[संपादन]

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: श्री गणेश अथर्वशीर्ष हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:श्री गणेश अथर्वशीर्ष येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.
हे सुद्धा पहा[संपादन]

पुणे येथील सार्वजनिक गणेशोत्सव[संपादन]

प्रसिद्ध गणपती मंदिरे[संपादन]

  • पि. डि. एफ. मध्ये अथर्वशीर्ष
  • ^ गणेश प्रतिष्ठापना पूजा - ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पोथी
  • ^ गणेश प्रतिष्ठापना पूजा - ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पोथी
  • ^ गणेश प्रतिष्ठापना पूजा - ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पोथी
  • ^ गणेश प्रतिष्ठापना पूजा - ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पोथी
  • ^ गणेश प्रतिष्ठापना पूजा - ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पोथी
  • ^ गणेश प्रतिष्ठापना पूजा - ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पोथी
  • ^ गणेश प्रतिष्ठापना पूजा - ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पोथी
  • ^ गणेश प्रतिष्ठापना पूजा - ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पोथी
  • ^ गणेश प्रतिष्ठापना पूजा - ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पोथी