गणेश उत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गणपती.jpg

धार्मिक महत्व[संपादन]

गणेशोत्सव गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. गाणपत्य संप्रदायाचे हे एक प्रमुख व्रत मानले जाते.भाद्रपद शुक्ल चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा शिवा असे म्हटले जाते.गाणपत्य संप्रदायाचे मूळ व्रत हे श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या महिनाभरात केले जाते. काळाच्या ओघात त्यात बदल होव्वोन हे व्रत आता गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरु केले जाते.या व्रताला 'पार्थिव गणेश व्रत' असे नाव आहे. वाळू वा मातीपास्सोन नदीकिनारी गणपतीची मूर्ती तयार करणे, तिचे पूजन करणे आणि लगेच तिचे विसर्जन करणे असे या व्रताचे स्वरूप आहे.[१] लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय प्रेरणा जागृत होण्याच्या सामाजिक हेतूने गणेश उत्सव हा दहा दिवसांचा केला. घराघरांत आणि सार्वजिनिक मंडळांत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. कोंकणामध्ये, आरतीच्या नंतर देवें म्हणतात. अन्यत्र आरतीनंतर गणपतीला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटतात. अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव, नद्या, समुद्र यात विसर्जन होते.

गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. हा गणेश उत्सव भारतात, महाराष्ट्र या शिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये तसेच, भारताबाहेरही ब्रिटन, अमेरिका, फिजी, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, कंबोडिया, कॅनडा, ब्रह्मदेश, आणि त्रिनिदाद व टोब्यागो या देशांमध्ये साजरा केला जातो. मुंबई आणि पुण्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात होयो. पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग आणि केसरी वाडा. या व्यतिरिक्त दगडूशेठ हलवाई, मंडई, बाबू गेनू आणि जिलब्या मारुती ही काही इतर मोठी मंडळे आहेत. पुण्यात हिरा बाग मंडळ हे भव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई मध्ये लालबागचा राजा हा सर्व गणपतींत मोठा मानलेला गणपती आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

सार्वजनिक गणेशोत्सव[संपादन]

प्रसिद्ध गणपती मंदिरे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवा[संपादन]

  1. श्री गणेश कोश-संपादक-अमरेंद्र गाडगीळ