पंचायतन पूजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजा रवी वर्मा यांनी काढलेले पंचायतनाचे चित्र

पंचायतन म्हणजे पाच देवांचा, पाच गुरूंचा, पाच थोर व्यक्तींचा किंवा पाच वस्तूंचा समुदाय. भारतीय संस्कृती सर्वग्राही तशीच सर्वसहिष्णू आहे. मानवाने ईश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार केल्यानंतर त्याने ईश्वराची कॊणत्या स्वरूपात पूजा करावी ह्यासाठी भारतीय संस्कृतीचा कोणताही आग्रह नाही. भगवंताची सर्वच रूपे सुंदर आणि मनोहारी आहेत. ज्याचे मन ज्या रूपात आकर्षित होते त्याने त्या रूपाची पूजा करावी.

विभिन्न उपास्य देवांना मानीत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली. ह्या पद्धतीनुसार विष्णुपंचायतनात हरी (विष्णू), शिव, गणपती, तेज (भास्कर) आणि देवी (अंबा) ह्या पाच देवांचे पूजन होते. ह्या पाच देवतांतून उपासक ज्याला प्रधान मानीत असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजूबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करायची. याच्या परिणामी 'गणेश पंचायतन', 'शिव पंचायतन' वगैरे सुरू झाले. पंचायतन पूजापद्धतीने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि समाजात असलेला विभिन्न संप्रदायांमधील राग द्वेषही कमी झाला.

गणपती, शिव, हरी (विष्णू), तेज (भास्कर) आणि अंबा ह्यांचे पूजन म्हणजे बुद्धी, ज्ञान, लक्ष्मी, तेज आणि शक्ती ह्यांची उपासना. मानवी विकासात ह्या पाच तत्त्वांचीच आवश्यकता असते.

राम पंचायतनात राम, ल्क्ष्मण, सीता, भरत-शत्रुघ्न आणि हनुमानाचा समावेश होतो.

शिव पंचायतनात शंकर, विष्णू, गणेश, सूर्य, देवी हा क्रम आहे.

सूर्य पंचायतानात देवांचा क्रम सूर्य, शंकर, गणेश, विष्णू देवी असा आहे.

देवी पंचायतन म्हणजे देवी, विष्णू, शंकर, गणेश, सूर्य आणि

गणेश पंचायत म्हणजे गणेश, विष्णू, शंकर, सूर्य, देवी.

समर्थ पंचायतनात समर्थ रामदासस्वामी, जयरामस्वामी वडगावकर, रंगनाथस्वामी निगडीकर, आनंदमूर्ती, आणि केशवस्वामी यांचा समावेश होतो. याबद्दलचा एक श्लोक असा आहे :-

श्रीरामदास जयराम रंगनाथ।
आनंदमूर्ति केशव सनाथ।।
ऐसे हे पंचायतन समर्थ।
रामदासस्वामींचे॥१॥

हे दिसताती वेगळाले।
परी ते स्वरूपी मिळाले॥।
अवघे मिळोनि येकच जाले।
निर्विकारवस्तु॥२॥


हेदेखील पहा[संपादन]

वैदिक प्रतीक-दर्शन

हे सुद्धा पहा[संपादन]

सार्वजनिक गणेशोत्सव[संपादन]

प्रसिद्ध गणपती मंदिरे[संपादन]