ताशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताशा ह्या वाद्याचा उगम हा अतिशय मनोरंजक आहे पुर्वी वेळ पाहण्या साठी घटीका वापरली जाई या घटीकेच्या दोन वेळे नुसार एक तास होत असे हा तास सर्वांना समजण्या साठी ताशाची निर्मीती करण्यात आली दोन घटीका झाल्या की ताश्या वाजवला जाई हा ताशा पितळी किंवा तांब्याच्या भांड्याला चामडे लावून तयार केला जाई तसेच लग्नांमध्ये ही लग्न घटीका पूर्ण झाल्या नंतर ताशा वाजवला जात असे व नंतर वधू वर वर माला गळ्यात घालत असत ताश्याच्या जागेवर घंटानाद ही वाजवली जात असे त्या मुळे वेळेला घंटा संबोधले जाते. यामुळेच ताशा सनई-चौघड्यासह मिरवणुकीत वाजवायचे एक चर्मवाद्य बनले आहे. हे टोपलीच्या आकारांचे असून तांब्याचे बनविलेले असते. याचे तोंड चामड्याने मढविलेले असते. स्वर चढविण्यासाठी त्याच्या चामडयाला गरम करतात. लाकडाच्या दोन कामट्यांनी हे वाजवतात.