Jump to content

चर्चा:पुण्यातील गणेशोत्सव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असा लेख नसावा, प्रत्येक शहर, गावातील गणेशोत्सव असा लेख इतरांनी लिहिला तर्???? Sarvamanya (चर्चा) २१:३२, १० सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

@आर्या जोशी: हा लेख वेगळा असणे आवश्यक आहे का? आपण हे लेख गणेशोत्सव या लेखात विलीन केले की चांगले होईल असे माझे मत आहे. असे प्रत्येक शहर किव्हा जिल्यातील उत्सवावर स्वतंत्र लेख तयार करणे आवश्यक नाही असे वाटते. आपला यावर काय विचार आहे?. (उदाहरण: नाताळ आणि ईद ही तर साऱ्या जगात मानले/साजरा केले जाते तर प्रत्येक शहराचे स्वतंत्र लेख चांगले वाटणार नाही.) --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:५३, ३० ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: @V. narsikar: टायवीन यांच्या सूचनेवर आपलीही मते नोंदवा.सर्वानुमते निर्णय करूया. धन्यवाद !आर्या जोशी (चर्चा) १६:११, ३० ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

पुण्यातील गणेशोत्सव हा लेख वेगळा असावा.
सार्वजनिक गणेशोत्सवाची (आणि शिवजयंतीची) कल्पना लोकमान्य टिळक यांनी पुण्यात सुरू केली. यामागे सामाजिक आणि राजकीय कारणे होती. याचा प्रभाव भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर झाला. नवरात्रीप्रमाणेच हा उत्सव धार्मिक न राहता सामाजिक उत्सव झालेला आहे. त्यातही काही शहरांत हा उत्सव अधिक प्रमाणात सामाजिक उत्सव आहे.
पुण्यातील गणेशोत्सव जगातील सगळ्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेशोत्सावांपैकीच नव्हे तर सार्वजनिक पातळीवर होणाऱ्या उत्सवांपैकी एक आहे. या उत्सवात अनेक अधिकृत आणि अनधिकृत परंपरा (उदा मानाचे गणपती, ठरलेले मार्ग, त्यासाठी दिली जाणारी सार्वजनिक सुट्टी, महापौरांकरवे पूजा, इ.) अनेक दशके (शतके?) पाळल्या जातात.
पुण्याशिवाय मुंबई, हैदराबाद, वडोदरा आणि इतर निवडक शहरांमधील गणेशोत्सवाबद्दल स्वतंत्र लेख असावे व गणेशोत्सव लेखात त्याबद्दल थोडक्यात वर्णन आणि दुवे असावे.
अभय नातू (चर्चा) १८:४६, ३० ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: सुचनेसाठी आणि मार्गदर्शनासाठी धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ०७:५१, १ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]