Jump to content

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[१] एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

वैशिष्ट्य[संपादन]

पुणे शहरातील आकाराने आणि उंचीने मोठी असलेली गणेशाची मूर्ती असल्याने हा गणपती भाविकांचे आकर्षण आहे. तुळशीबाग परिसरातील व्यापारी समूहाचा हा गणपती आहे. जर्मनी येथील म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सवात या गणपतीची प्रतिकृती नेली गेली आहे. तिची पूजा या मंडळात केली जाईल. पर्यावरण पूरक साधनांचा वापर करून ही प्रतिकृती तयार केली गेली आहे.[२]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पुण्याच्या तुळशीबाग गणपतीची आरती लाईव्ह : बाप्पा मोरया". एबीपी माझा. 2021-09-15. 2021-09-17 रोजी पाहिले.
  2. ^ "तुळशीबाग गणपती आता जाणार सातासमुद्रापार,जर्मनीमधील महाराष्ट्र मंडळात होणार प्रतिष्ठापना". लोकसत्ता. 2023-09-10. 2023-09-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती
कसबा गणपतीतांबडी जोगेश्वरी गणपतीगुरुजी तालीम गणपतीतुळशीबाग गणपतीकेसरीवाडा गणपतीदगडूशेठ हलवाई गणपती