श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
Appearance
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३ | |||||
भारत | श्रीलंका | ||||
संघनायक | हार्दिक पंड्या (टी२०) रोहित शर्मा (ए.दि.) |
दासुन शनाका | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (२८३) | दासुन शनाका (१२१) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद सिराज (९) | कसुन रजिता (६) | |||
मालिकावीर | विराट कोहली (भा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सूर्यकुमार यादव (१७०) | दासुन शनाका (१२४) | |||
सर्वाधिक बळी | उमरान मलिक (७) | दिलशान मदुशंका (५) | |||
मालिकावीर | अक्षर पटेल (भा) |
श्रीलंका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये भारताचा दौरा केला.[१] डिसेंबर २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सामन्यांची पुष्टी केली.[२]
२०-२० मालिकेमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेवर २-१ असा विजय मिळवला. तर एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाने ३-० असे निर्भेळ यश मिळवले.
पथके
[संपादन]भारत | श्रीलंका[३] | ||
---|---|---|---|
टी२०[४] | ए.दि.[५] | टी२० | ए.दि. |
३ जानेवारी रोजी, जसप्रीत बुमराहला भारताच्या एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आले.[६] तथापि, ९ जानेवारी रोजी बुमराहला संघातून बाहेर काढण्यात आले.[७] ४ जानेवारी रोजी जितेश शर्माला दुखापतग्रस्त संजू सॅमसनच्या जागी भारताच्या टी२० संघात स्थान दिले गेले.[८]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला टी२०
[संपादन]वि
|
||
२रा टी२०
[संपादन]
३रा टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- सूर्यकुमार यादवने लोकेश राहुलला मागे टाकत त्याचे तिसरे टी२० शतक झळकावले, त्याची शतके ही भारतीय फलंदाजांतर्फे दुसरी सर्वाधिक शतके आहे.[९]
- सूर्यकुमार यादव आंटी२० मध्ये २ पेक्षा जास्त शतके नोंदवणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.[१०]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण
- दिलशान मदुशंकाचे (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- विराट कोहलीची मायदेशातील सर्वाधिक (२०) शतकांच्या विक्रमाशी बरोबरी. [११]
२रा ए.दि. सामना
[संपादन]
३रा ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- दुनिथ वेल्लालागेने कन्क्शन सब्स्टिट्यूट म्हणून जेफ्री व्हँडर्सेची जागा घेतली.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली (भा) पाचव्या क्रमांकावर पोहोचला.[१२] कोहलीने भारतातील त्याचे २१ वे एकदिवसीय शतक झळकावले, एका देशातील कोणत्याही खेळाडूतर्फे हि सर्वाधिक शतके होत,[१३][१४] आणि श्रीलंकेविरुद्धचे त्याचे हे १०वे शतक होते, कोणत्याही प्रतिपक्षाविरुद्ध कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वाधिक शतके.[१५]
- ३१७ धावांनी विजय हा एकदिवसीय सामन्यांमध्ये एक विक्रम होता.[१६][१७]
संदर्भयादी
[संपादन]- ^ "श्रीलंकेचा भारत दौरा: श्रीलंका डिसेंबर-जानेवारी २०२३ मध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार". स्पोर्टझपॉईंट. ७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआयकडून श्रीलंका, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशी होणाऱ्या मास्टरकार्ड मालिकेचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "२०२३ च्या भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ". श्रीलंका क्रिकेट. २८ डिसेंबर २०२२. ७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत हार्दिक भारताचे नेतृत्व करणार; रोहितचे वनडेसाठी पुनरागमन; पंत दोन्ही संघात नाही". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघ: हार्दिक टी२० कर्णधार, रोहित, कोहली वनडेसाठी परतले; पंत, धवनला वगळले; मावीला पहिल्यांदा बोलावणे". स्पोर्टस्टार. २७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "जसप्रीत बुमराहचा श्रीलंका मालिकेसाठी एकदिवसीय संघात समावेश". बीसीसीआय (इंग्रजी भाषेत). १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "जसप्रीत बुमराहची भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेमधून बाहेर बीसीसीआयची मोठी माघार: अहवाल". हिंदुस्तान टाइम्स (इंग्रजी भाषेत). १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "संजू सॅमसन उर्वरित टी२० मालिकेतून बाहेर". बीसीसीआय (इंग्रजी भाषेत). १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात नाबाद शतक झळकावल्यानंतर सूर्यकुमार यादवने केएल राहुलला मागे टाकले". हिंदुस्थान टाइम्स (इंग्रजी भाषेत). ७ जानेवारी २०२३. ८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "सूर्यकुमार यादवने तिसऱ्या टी२० मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून विक्रम मोडीत काढले". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ७ जानेवारी २०२३. ८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "विराट कोहलीचे ४५वे एकदिवसीय शतक, सचिनच्या घरच्या मैदानावर सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). १० जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "विराट कोहलीच्या १६६ धावा, विक्रम मोडला". डेली न्यूझ पोस्ट. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "विराट कोहलीने ७४ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले, सचिन तेंडुलकरला मागे टाकले हा मैलाचा टप्पा गाठला". डेली न्यूझ पोस्ट. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "४६व्या एकदिवसीय शतकासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा दीर्घकालीन विक्रम मोडला". प्रोबॅट्समन. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताचा श्रीलंकेवर विक्रमी विजय". बीबीसी स्पोर्ट. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "कोहली, सिराज चमकले, भारताने धावांच्या फरकाने सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम मोडला, तिसर्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव". हिंदुस्थान टाइम्स. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "भारताने श्रीलंकेचा 371 धावांनी पराभव करत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला". प्रोबॅट्समन. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.