सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा तसेच सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे
मुथिया मुरलीधरन हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचेपूर्ण सभासद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त अग्रमानांकित चार असोसिएट संघांदरम्यान खेळला जाणारा क्रिकेट सामन्यांचा प्रकार आहे.[१] एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात मर्यादित षटके असतात, पुर्वी ५५ ते ६० षटके असणारे सामने आता प्रत्येकी ५० षटकांचे खेळविण्यात येतात.[२] एकदिवसीय क्रिकेट हे लिस्ट – अ क्रिकेट असल्याने, एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी ही लिस्ट-अ विक्रमांमध्ये ग्राह्य धरली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जानेवारी १९७१ मध्ये खेळवला गेलेला सामना सर्वात सुरुवातीचा एकदिवसीय सामना समजला जातो;[३] तेव्हा पासून आजवर २६ देशांदरम्यान ४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. काही अंशी एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होण्यामुळे आणि त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह आपली महसूल वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सामन्यांची संख्या वाढली आहे.[४]
विजयांच्या टक्केवारीचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ (आशिया XI क्रिकेट संघ सोडून, ज्यांचे फक्त सात सामने झाले आहेत) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ आहे. २०१७ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले, आणि १९ जून २०१९ पर्यंत त्यांची विजयी टक्केवारी ६३.८७ इतकी होती.[५] याच्या विरुद्ध, तीन संघ असेही आहेत जे आजवर एकही विजय मिळवू शकले नाहीत: पूर्व आफ्रिका, ओमान, आणि युएसए,[५] ह्या सर्व संघांचे मिळून केवळ सातच सामने झाले आहेत.
भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत, तर ५३४ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथिया मुरलीधरनच्या नावावर आहे. यष्टीरक्षण करताना सर्वाधिक ४८२ गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्या नावावर आहे. तर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्याच महेला जयवर्धने ह्याने केला आहे.
सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकाराच्या यादीमध्ये पहिल्या पाच विक्रमांचा समावेश आहे. (पाचपैकी शेवटच्या स्थानासाठी बरोबरी असलेले आणि असे सर्व विक्रम नोंद केलेले असल्यास अशी यादी वगळून).
(३००-३) असे दर्शवितात की संघाने ३ फलंदाज गमावून ३०० धावा केल्या आणि षटके टाकून संपल्यामुळे किंवा उर्वरित षटके टाकता न आल्याने किंवा धावांचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे संघाचा डाव संपुष्टात आला आहे.
(३००) असे दर्शवितात की संघाने ३०० धावा केल्या आणि सर्व फलंदाज बाद झाले, किंवा एक अथवा एकापेक्षा जास्त फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत व इतर सर्व गडी बाद झाले.
फलंदाजी संकेत
(१००*) असे दर्शवितात की फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो नाबाद राहीला.
(१७५) असे दर्शवितात की फलंदाजाने १७५ धावा केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला.
गोलंदाजी संकेत
(५-४०) दर्शवितात की फलंदाजाने ४० धावा देऊन ५ गडी बाद केले.
(४९.५ षटके) दर्शवितात की (प्रत्येकी ६ चेंडूंची) ४९ षटके पूर्ण झाली आणि एक षटक केवळ ५ चेंडू टाकून अपूरे राहीले.
सध्या खेळणारे खेळाडू
सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळणारे विक्रमवीर खेळाडू ‡ ह्या चिन्हाने दर्शविले आहेत (म्हणजे त्यांचे विक्रम बदलू शकतात).
मोसम
बहुतेक देशांमध्ये उन्हाळ्याच्या मोसमात क्रिकेट खेळले जाते. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज मध्ये त्यामुळे हा मोसम दोन कॅलेंडर वर्षांत विभागला जातो, आणि त्यामुळे रुढीनुसार असा मोसम (उदा.) "२००८-०९" असा दाखवला जातो. इंग्लंडमधील क्रिकेट मोसम एकेरी वर्ष कालावधी म्हणून दाखवला जातो. उदा. "२००९". आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका किंवा स्पर्धा ह्या कमी कालावधी मध्ये खेळवल्या जातात, आणि क्रिकइन्फो, "मे ते सप्टेंबर मध्ये सुरू झालेल्या स्पर्धा ह्या संबंधित एका वर्षात तर ऑक्टोबर ते एप्रिल मध्ये खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धा त्यावेळच्या दुहेरीवर्ष मोसमानुसार दाखवतात".[६] विक्रमांच्या यादीत, दोन वर्षांचा कालावधी असे दर्शवितो की सदर विक्रम वरती नमूद केलेल्या देशांमधील स्थानिक मोसमात केला गेला आहे.
^[अ] ही शृंखला अनिर्णित सामन्यानंतर सुरुवात झाली आणि अनिर्णित सामन्याने संपली. इंग्लंड विरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या ७व्या सामन्यात मिळवलेला विजय हा पहिला होता. ६वा एकदिवसीय सामना (आं.ए.दि. २२२५) अनिर्णितावस्थेत संपला, त्याआधी दक्षिण आफ्रिकेने ३रा (आं.ए.दि. २२२१), ४था (आं.ए.दि. २२२३), आणि ५वा (आं.ए.दि. २२२४) एकदिवसीय सामना जिंकला होता. अनिर्णित सामने वगळल्यास सदर शृंखला १५ सामन्यांपर्यंत अबाधित होती.[११] शेवटचा विजय हा न्यू झीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील ३ऱ्या सामन्यात (आं.ए.दि. २२८९) मिळविलेला होता. ४था सामना (आ.ए.दि. २२९२) अनिर्णित राहिला आणि त्यानंतरचा ५वा सामना (आं.ए.दि. २२९३) तसेच भारताविरुद्धच्या पुढील मालिकेमधील १ला सामना (आं.ए.दि. २२९७) दक्षिण आफ्रिकेने जिंकला, त्यानंतरचा २रा सामन्यात (आं.ए.दि. २२९८) त्यांना पराभव पत्करावा लागला. हे अनिर्णित सामने वगळल्यास दक्षिण आफ्रिकेची विजय शृंखला १७ सामन्यांपर्यंत जाते.[१२]
^[ब] ही शृंखला अनिर्णित सामन्याने संपली. शेवटचा विजय हा २००७ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील (आं.ए.दि. २५८१) होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना हा (आं.ए.दि. २६२१) भारताविरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होता; जो अनिर्णित राहिला. त्यानंतरचे मालिकेतील दोन सामने (आं.ए.दि. २६२३ आणि २६२५) ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि ४थ्या सामन्यात (आं.ए.दि. २६२७) त्यांचा पराभव झाला. अनिर्णित सामना वगळल्यास, ऑस्ट्रेलियावी विजयी शृंखला १३ सामन्यांची होते.[१३]
^[अ] २३-सामन्यांच्या श्रृंखला अनिर्णित सामन्याने (आं.ए.दि. १९०४) संपली. त्यानंतर पुन्हा सलग चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहीला (आं.ए.दि.१९५६), आणि त्यानंतर बांगलादेशला पुन्हा सलग १८ सामन्यांमध्ये पराभव सहन करावा लागला. अनिर्णित सामने वगळले तर त्यांची पराभवाची श्रृंखला ४५ सामने सुरूच राहीली.[१५]