नांदेड
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
?नांदेड नंदीतट महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: हुजुरसाहेब (अबचलनगर) | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
६३.२२ चौ. किमी • ३६२ मी |
अंतर • लातूर पासून • परभणी पासून • यवतमाळ पासून |
• १३५ किमी नैर्ऋत्य दिशा (रत्नागिरी - नागपूर महामार्ग) • ७० किमी पश्चिम दिशा (नांदेड - परभणी महामार्ग) • १९२ किमी ईशान्य दिशा (नांदेड - नागपूर महामार्ग) |
जवळचे शहर | अर्धापूर, मुदखेड, लोहा, वसमत, परभणी |
प्रांत | मराठवाडा |
विभाग | छत्रपती संभाजीनगर विभाग |
जिल्हा | नांदेड जिल्हा |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर साक्षरता |
५,५०,४३९ (८०) (२०११) • ८,७००/किमी२ ९४२ ♂/♀ ६५ % |
भाषा | मराठी |
महापौर | रिक्त (अंतिम-श्रीमती पावडे) |
आयुक्त | सुनील लहाने (IAS) |
आमदार | • बालाजी कल्याणकर(नां. उत्तर), • आनंद तिडके, (नां. दक्षिण) |
विधानसभा (जागा) | महाराष्ट्र विधानसभा (६) |
संसदीय मतदारसंघ | नांदेड |
तहसील | नांदेड तालुका |
महानगरपालिका | नांदेड-वाघाळा महानगरपालिका |
जिल्हा परिषद | नांदेड जिल्हा परिषद |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३१६०१ ते ४३१६०५ • +०२४६२ • MH - 26 |
संकेतस्थळ: [१] |
नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.[१]
नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. इ.स. २००८ साली येथे शीख धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' हा गुरुग्रंथास धर्मगुरूचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत 'शेष'घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत विष्णूपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे.
तालुके
[संपादन]१९५६ मध्ये महाराष्ट्रात सामील झाला तेव्हा ६ तहसिल व २ (भोकर व बिलोली) महल होते. नंतर किनवट व धर्माबाद अनुक्रमे मुधोळ तहसिलीच्या हस्तांतरणाने सामिल झाले. १९९१ पर्यंत ८ तालुकेच होते.
नांदेड जिल्ह्यात नांदेडसह १६ तालुके आहेत, त्यांची नांवे पुढीलप्रमाणे: मुखेड, मुदखेड, लोहा, नायगांव, बिलोली, देगलुर, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर व नांदेड.
प्रस्तावित तालुके:
- तामसा
- मुक्रमाबाद
- दक्षिण व उत्तर नांदेड (विभाजन)
- मांडवी
भौगोलिक स्थान
[संपादन]महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, हिंगोली व यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद तेलंगणातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.
वाहतूक व्यवस्था
[संपादन]पारंपारिक वाहतूक
[संपादन]महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेड साठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची थेट बससेवा उपलब्ध आहे.
रेल्वे
[संपादन]नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय रेल विकास भवन चैतन्य नगर नांदेड येथे आहे हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागात आहे आणि दिल्ली,मुंबई, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, बंगळूर, चेन्नई, चंदिगढ, जयपूर, बनारस, अलाहाबाद, विशाखापट्टणम, श्री गंगानगर, ओरिसा, हावडा, तिरुपती, कोल्हापूर, पटना, नागपूर येथून नान्देडसाठी थेट रेल्वेसेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते.
हवाई
[संपादन]नांदेड येथे श्री गुरू गोविंदसिंग जी विमानतळ आहे. नांदेड हे हवाई मार्गाने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अमृतसर आणि तिरुपती या शहरांशी जोडले गेले आहे. खाजगी विमान कंपन्यांपैकी ट्रुजेट आणि एर इंडिया या कंपन्यांच्या विमानांनी नांदेडला जाता येते.
स्थानिक वाहतूक
[संपादन]स्थानिक लोक सायकल रिक्षाचा व शेअर रिक्षाचा उपयोग करतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात रिक्षा नांन्देडमध्ये आहेत.[ संदर्भ हवा ]
संस्कृती
[संपादन]या शहरात प्रामुख्याने हिंदू,मुस्लिम आणि महत्त्वाची म्हणजे शीख धर्मियांची संस्कृती अस्तित्वात आहे. येथील गोदावरी नदीच्या किनारी नंदी या महादेवाच्या वाहनाने नृत्य केले म्हणून या शहरास नांदेड असे नाव पडले आणि याच्या मुळेच इथे हिंदू संस्कृती अस्तित्वात आली. शीख धर्मियांच्या दहावे गुरू गोविंदसिंग यांचे समाधी स्थळ इथेच आहे ते म्हणजे सचखंड गुरुद्वारा यांच्यामुळेच इथे शीख संस्कृती वसली आहे.
भाषा
[संपादन]नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी भाषा आहे. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तसेच तेलंगाणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे येथे काही नागरिक तेलुगू, कन्नड व दखनी उर्दू भाषेत सुद्धा बोलतात. गोरमाटी भाषा अनेक वस्ती, तांड्यावर बोलली जाते इथे गोर बंजारा समाज पण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आढळून येते.नांदेड येथे पंजाबी भाषा पण मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते.
परंपरा
[संपादन]दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा , महाविहार बाबरी नगर दाभड येथे भरणारी महाधम्म परिषद, बाराड चैत्र पौर्णिमा यात्रा,हुजुर साहिब नांदेड दसरा हल्लाबोल महहला,भगवान बालाजी दसरा रथयात्रा नांदेड,दाभाड सत्य गणपती, कंधार येथील हजिसाया उरूस, माहूर येथील नारळी पौर्णिमा निमित्त भरणारी परिक्रमा यात्रा तसेच नवरात्र महोत्सव, दत्तशिखर माहूर येथील दत्त जयंती सोहळा, सोनखेड येथील जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा बिजोत्सव सप्ताह, हिन्दू व शीख समुदायाचा दसरा हे वार्षिक सोहळे अत्यन्त छान असतात. रावण दहन, दीपावली, सन्दल, रमजान ईद, बकरी ईद, ईद ए मिलाद, शिवजयन्ती,डॉ. बाबासाहेब आम्बेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयन्ती, बुद्ध पौर्णिमा, गणेश उत्सव हे दिवसही उत्साहाने साजरे होतात.
माध्यमे
[संपादन]स्थानिक वृत्तपत्रे
[संपादन]नान्देड येथून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे -
- दैनिक गोदातीर समाचार
- दैनिक प्रजावाणी
- दैनिक भूमिपुत्र
- दैनिक लोकपत्र
- दै.उद्याचा मराठवाडा
- दैनिक सत्यप्रभा
इलेक्ट्रॉनिक मीडिया
[संपादन]उद्याचा मराठवाडा, गोदातीर समाचार, प्रजावाणी, लोकमत, लोकसत्ता, सकाळ ही मराठी वृत्तपत्रे आणि इण्डियन एक्सप्रेस व टाइम्स ऑफ इण्डिया या इंग्रजी वृत्तपत्रांचा नान्देडमध्ये अधिक खप आहे.[ संदर्भ हवा ]. साप्ताहिक मराठी स्वराज्य हे मराठी साप्ताहिक वृत्तपत्रही लोकप्रिय आहे. नान्देडमध्ये आकाशवाणी, रेडियो सिटी ही रेडियो केन्द्रे ऐकता येतात. झी मराठी, ई-टीव्ही मराठी, आयबी एन लोकमत, मी मराठी, साम मराठी आणि दूरदर्शनची सह्यादी या मराठी दूरचित्रवाहिन्या विशेष लोकप्रिय आहेत[ संदर्भ हवा ]. अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील दूरचित्रवाणीवर दिसतात. अनेक संस्था अन्तरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात; परंतु त्यांतल्या त्यांत बीएस्एन्एल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कम्पन्या आहेत[ संदर्भ हवा ].
शैक्षणिक
[संपादन]नांदेड हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. नांदेडला महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक परीक्षा विभागाची शाखा आहे.
विद्यापीठ
[संपादन]इ.स. १९९४ साली मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या पार्श्वभूमीवर नांदेड उपकेंद्राचे रुपांतर करून (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची) स्थापना झाली. सुमारे ३८९ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे विभागीय केंद्र नांदेड येथे विद्यापीठ परिसरात आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालये
[संपादन]- श्री गुरू गोविन्द सिंहजी अभियांत्रिकी आणि तंत्र संस्था
- रेणुकादेवी अभियांत्रिकी महाविद्यालय, माहूर जि. नांदेड
- महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय
- मातोश्री प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी महाविद्यालय, विष्णपुरी
- ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय.
औषधनिर्माण महाविद्यालये
[संपादन]- औषधनिर्माण शाळा, विद्यापीठ परिसर
- नांदेड औषधनिर्माण महाविद्यालय, बाबानगर
- सहयोग औषधनिर्माण संस्था, विष्णुपुरी
वैद्यकीय महाविद्यालये
[संपादन]- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,विष्णूपुरी
- शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, वजिराबाद
- ग्रामीण दंत महाविद्यालय, नांदेड
- श्यामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालय
- युनानी रसशाळा, वाजेगांव
विधी महाविद्यालये
[संपादन]- नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय
- शरद पवार विधी महाविद्यालय
- शिवाजी विधी महाविद्यालय, कंधार
पारंपारिक महाविद्यालये
[संपादन]- नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज व पिपल्स महाविद्यालय
- महिला महाविद्यालय, तरोडा
- शारदा भवन शैक्षणिक संस्थेचे यशवंत महाविद्यालय, बाबानगर
- नेताजी सुभाषचन्द्र बोस महाविद्यालय
- वसंतराव नाईक महाविद्यालय, वसरणी
- देगलूर महाविद्यालय
सैनिकी प्रशिक्षण संस्था
[संपादन]- राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय सगरोळी ता. बिलोली येथे आहे. प्राचार्य अरविंद देशमुख यांनी या सैनिकी शाळेसाठी आयुष्य वेचले.
- मुदखेड येथे केंद्रीय राखीव पोलीस बलाचे (CRPF College) केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय आहे.
प्राथमिक शिक्षण संस्था
[संपादन]- प्रतिभा निकेतन
- गुजराती हायस्कूल
- नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स हायस्कूल
- म. ज्योतिबा फुले विद्यालय, बाबानगर
- केंब्रिज विद्यालय
- शाहू विद्यालय * इंदिरा पब्लिक स्कूल * नरसिंह विद्या मंदिर * शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
- जिजामाता प्राथमिक शाळा * राणी लक्ष्मीबाई विद्यालय * गोदावरी इंटर नॅशनल स्कूल. * सरस्वती हायस्कूल * सांदिपानी पब्लिक स्कूल. * नागसेन विद्यालय प्रभातनगर * इंदिरा गांधी हायस्कूल हडको नांदेड. * नागार्जुना इंटरनॅशनल स्कूल कौथा नांदेड
राजकारण
[संपादन]नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. कै. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकीय स्तरावर माहीत असलेले मोठे नेते होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारत देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादी पदे भूषविली. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण हे चालवत आहेत. त्यांनी मुख्यमत्र्यांच्या दोन कालावधीत हे पद ग्रहण केले आहे. महाराष्ट्रातील पिता-पुत्रांची ही एकमेव जोडी आहे.
- तसेच शेतकरी कामगार पक्ष नेते माजी खासदार व आमदार भाई डॉ.केशवराव धोंडगे हे सुद्धा मातब्बर नेते होते. त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.
- मा.खा. सूर्यकांता पाटील यांनी सुद्धा देशाच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामविकास, संसदीयकार्य राज्यमंत्री म्हणून नांदेडचे नाव उज्ज्वल केले आहे.
- माजी मंत्री माधव भुजंगराव किन्हाळकर यांनी बाभळी बंधाऱ्याचे बांधकाम करून जलक्रांती करून आंध्रमध्ये जाणारे पाणी सीमाभागात रोखले.
स्थानिक प्र/भाग किंवा परीसर
[संपादन]अबचलनगर
[संपादन]शिवाजीनगर
[संपादन]श्रीनगर
[संपादन]चौफाळा
[संपादन]चैतन्य नगर
[संपादन]विष्णूनगर
[संपादन]हा नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे प्रभाग क्रमांक ९ चा भाग आहे. विष्णुनगर येथे जाण्यास हुजुर साहेब अबचलनगर नांदेड रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म ४ मधून बाहेर निघल्यास चौकातून उजवी कडे पायी चालत गेल्यास ४-५ मिनिट वेळ लागतो. महापालिकेची शाळा आहे. येथील युवक आणि युवती साठी अद्ययावत असे बास्केटबॉल कोर्ट आहे. विष्णूनगरच्या आग्निय दिशेला अंडर ग्राउंड ब्रिज आहे दक्षिणेस हमालपुरा आहे. पश्चिमेस गोकुळनगर आणि राम मनोहर लोहिया वाचनालय तर वायव्य दिशेला स्टेडियम, विसावा उद्यान आहे. उत्तर दिशेला VIP रोड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ( नवा मोंढा) आहे आणि ईशान्य दिशेला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे. आणि पुर्वेस MSEB चे कार्यालय आहे
भाग्यनगर
[संपादन]राहुलनगर
[संपादन]राहुल नगर महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील नांदेड वाघाळा महानगरपालिका वसलेले नगरचा भाग आहे. नांदेड-वाघाळा महानगर पालिकेतील शेवटचे टोक महानगर पालिका अंतर्गत नगराचा विकास झाला आहे राहुल नगरच्या बाजूला नांदेड मधील M.I.D.C एरिया असुन लोकचा मुख्यता कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- नांदेड जिल्ह्याचे शासकीय संकेतस्थळ
- नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे संकेतस्थळ Archived 2009-04-09 at the Wayback Machine.
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ
संदर्भ
[संपादन]- ^ "भाग दोन नंदगिरी किल्ल्याला आहे दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास". १४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.