"दीक्षाभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:
दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात मात्र [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]] किंवा १४ ऑक्टोबर रोजी यांच्या संखेत लक्षणिय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात. भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे [[जपान]], [[थायलंड]] आणि [[श्रीलंका]] येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट असतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/nagpur-news/maharashtra-govt-approves-grade-a-status-to-deekshabhoomi-at-nagpur-1212251/|title=नागपूरची दीक्षाभूमी आता ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ|date=2016-03-08|work=Loksatta|access-date=2018-05-17|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/topics/diksha-bhoomi-nagpur/|title=Latest Diksha Bhoomi Nagpur News in Marathi {{!}} Diksha Bhoomi Nagpur Live Updates in Marathi {{!}} दीक्षाभूमी बातम्या at Lokmat.com|work=http://www.lokmat.com|access-date=2018-05-17}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.bhaskar.com/maharashtra/mumbai/news/MH-MUM-OMC-deeksha-bhoomi-class-a-tourist-spot-declared-5269136-PHO.html|title=दीक्षा भूमि ‘अ’ वर्ग का पर्यटन स्थल घोषित ब्यूरो|work=dainikbhaskar|access-date=2018-05-17|language=hi}}</ref>
दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात मात्र [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]] किंवा १४ ऑक्टोबर रोजी यांच्या संखेत लक्षणिय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात. भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे [[जपान]], [[थायलंड]] आणि [[श्रीलंका]] येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट असतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/nagpur-news/maharashtra-govt-approves-grade-a-status-to-deekshabhoomi-at-nagpur-1212251/|title=नागपूरची दीक्षाभूमी आता ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ|date=2016-03-08|work=Loksatta|access-date=2018-05-17|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/topics/diksha-bhoomi-nagpur/|title=Latest Diksha Bhoomi Nagpur News in Marathi {{!}} Diksha Bhoomi Nagpur Live Updates in Marathi {{!}} दीक्षाभूमी बातम्या at Lokmat.com|work=http://www.lokmat.com|access-date=2018-05-17}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.bhaskar.com/maharashtra/mumbai/news/MH-MUM-OMC-deeksha-bhoomi-class-a-tourist-spot-declared-5269136-PHO.html|title=दीक्षा भूमि ‘अ’ वर्ग का पर्यटन स्थल घोषित ब्यूरो|work=dainikbhaskar|access-date=2018-05-17|language=hi}}</ref>


‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’चे अध्यक्ष व भारतीय बौद्ध [[भिक्खू]] [[सुरई ससाई]] यांनी म्हटले आहे की, “दीक्षाभूमी ही जागतिक भूमी आहे. तिचे पावित्र्य जगात आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील.” भारताचे राष्ट्रपती [[रामनाथ कोविंद]] यांनी दीक्षाभूमीला 'मानवतेचे प्रेरणास्थान' म्हटले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे’, अशा शब्दांत [[भारताचे राष्ट्रपती]] [[रामनाथ कोविंद]] यांनी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-president-kovind-visited-to-deekshabhoomi/articleshow/60800159.cms</ref>
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’चे अध्यक्ष व भारतीय बौद्ध [[भिक्खू]] [[सुरई ससाई]] यांनी म्हटले आहे की, “दीक्षाभूमी ही जागतिक भूमी आहे. तिचे पावित्र्य जगात आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील.” भारताचे राष्ट्रपती [[रामनाथ कोविंद]] यांनी दीक्षाभूमीला 'मानवतेचे प्रेरणास्थान' म्हटले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.patrika.com/chhindwara-news/president-ram-nath-kovind-arrives-in-diksha-bhumi-1840361/|title=President Ram Nath Kovind arrives in Diksha bhumi, Chhindwara News in Hindi – इस स्थान पर पहुंचने के बाद राष्ट्रपति बोले मैं धन्य हो गया, जानें खूबी|work=www.patrika.com|access-date=2018-05-17|language=hi-IN}}</ref> ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे’, अशा शब्दांत [[भारताचे राष्ट्रपती]] [[रामनाथ कोविंद]] यांनी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-president-kovind-visited-to-deekshabhoomi/articleshow/60800159.cms</ref>


== इतिहास ==
== इतिहास ==

१३:१७, १७ मे २०१८ ची आवृत्ती

हेसुद्धा पाहा: दीक्षाभूमी (चंद्रपूर)


दीक्षाभूमी
सर्वसाधारण माहिती
प्रकार धार्मिक व ऐतिहासिक स्मारक
ठिकाण नागपूर, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात जुलै १९७८
पूर्ण १८ डिसेंबर २००१
ऊंची
वास्तुशास्त्रीय १२० फूट उंचीचा स्तूप
बांधकाम
वास्तुविशारद शे डान मल, शशी शर्मा

दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे स्थळ महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हटले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला 'धम्मचक्र स्तूप' असेही म्हटले जाते.

दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी यांच्या संखेत लक्षणिय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात. भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट असतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.[१][२][३]

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’चे अध्यक्ष व भारतीय बौद्ध भिक्खू सुरई ससाई यांनी म्हटले आहे की, “दीक्षाभूमी ही जागतिक भूमी आहे. तिचे पावित्र्य जगात आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील.” भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला 'मानवतेचे प्रेरणास्थान' म्हटले आहे.[४] ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे’, अशा शब्दांत भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.[५]

इतिहास

हिंदू धर्माच्या त्याग करतांना दीक्षाभूमी, नागपूर येथे २२ प्रतिज्ञा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १४ ऑक्टो. १९५६

सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणना गेला. विसाव्या शतकात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सपत्निक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्या ५,००,०००० अनुयायांना दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी सोहळ्याला उशिरा आलेल्या उर्वरित ३,००,००० अनुयायांना धम्म दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर याला स्थानाला महत्त्व प्राप्त झाले, एक प्रमुख बौद्ध क्षेत्र म्हणूनही या स्थानानाची ओळख बनली. दरवर्षी येथे बरेच बौद्ध लोक बुद्ध, बाबासाहेब व दीक्षा अभिवादन करण्यासाठी येऊ लागले. इथे एक भव्य स्तूप निर्माण केला गेला, बावीस प्रतिज्ञांचा स्तंभही अभारला गेला. येथे बोधिवृक्ष लावला गेला व बौद्ध भिक्खू भिक्खूणींच्या निवासासाठी बाजूला एक विहार बांधला गेला.

बावीस प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर दिलेल्या २२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिलप्रमाणे आहेत.[६][७][८][९]

  1. मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  2. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  3. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  4. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
  5. गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
  6. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
  7. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
  8. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
  9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
  10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
  11. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  12. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
  13. मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
  14. मी चोरी करणार नाही.
  15. मी व्याभिचार करणार नाही.
  16. मी खोटे बोलणार नाही.
  17. मी दारू पिणार नाही.
  18. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
  19. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
  20. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
  21. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
  22. इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.


या २२ प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्वाच्या आहेत. सामान्यतः सर्व नवयानी बौद्ध या २२ प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अष्टांगिक मार्गदहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत.

या बावीस अटी बाबासाहेबांनी केलेल्या आज्ञा नाहित. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकिद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत.

रचना

दीक्षाभूमीतील आतील बाजू – बुद्ध मूर्तींसमोर बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थीकलश

दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पहायला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.

धमचक्र प्रवर्तन दिन

धम्मचक्र प्रवर्तन दिन - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने

दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात.त्यावेळी येथे १५ ते २० लाख बौद्ध जमा होतात आणि बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना अभिवादन करतात. भारतातील, विषेशतः महाराष्ट्रातील मुख्य राजकीय नेते सणात सहभागी होतात; जर्मनी, थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशांतील बौद्ध उपासक, भिक्खूही उपस्थित राहतात.

मान्यवरांच्या भेटी

भारतातील आणि जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना दीक्षाभूमीस भेटी देऊन बुद्ध व बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. यात दलाई लामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद राजपक्षे, बाबा रामदेव, अजय देवगण, अमित शहा इ. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यक्ती आहेत.

चित्र दालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "नागपूरची दीक्षाभूमी आता 'अ' वर्ग पर्यटनस्थळ". Loksatta. 2016-03-08. 2018-05-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Latest Diksha Bhoomi Nagpur News in Marathi | Diksha Bhoomi Nagpur Live Updates in Marathi | दीक्षाभूमी बातम्या at Lokmat.com". http://www.lokmat.com. 2018-05-17 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
  3. ^ "दीक्षा भूमि 'अ' वर्ग का पर्यटन स्थल घोषित ब्यूरो". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-17 रोजी पाहिले.
  4. ^ "President Ram Nath Kovind arrives in Diksha bhumi, Chhindwara News in Hindi – इस स्थान पर पहुंचने के बाद राष्ट्रपति बोले मैं धन्य हो गया, जानें खूबी". www.patrika.com (हिंदी भाषेत). 2018-05-17 रोजी पाहिले.
  5. ^ https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-president-kovind-visited-to-deekshabhoomi/articleshow/60800159.cms
  6. ^ १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिलेले भाषण
  7. ^ "22 Vows of Dr. Ambedkar : English, Hindi, Marathi". Jai Bhim Ambedkar (इंग्रजी भाषेत). 2017-01-29. 2018-03-18 रोजी पाहिले.
  8. ^ "22 Vows Of Dr. Ambedkar - BAIAE Japan" (इंग्रजी भाषेत). 2018-03-18 रोजी पाहिले.
  9. ^ "ARJUNWADI-Village Panchayat - National Panchayat Portal - Govt. of India". www.arjunwadi.mahapanchayat.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-03-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे