Jump to content

त्रिरश्मी लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पांडवलेणी या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्र हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील त्रिरश्मी लेणी ही नाशिकमधील लेणी आहेत.[१]

इतिहास[संपादन]

त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व २००च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केले आहे.[२] सातवाहन राजांनी ही लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखांत आढळून येतो.

चित्र:त्रिरश्मी बौद्ध लेणी.JPG
त्रिरश्मी बौद्ध लेणी

सातवाहन आणि क्षत्रप या राजवंशाने त्रिरश्मी लेणी कोरण्यास मदत केली होती. येथील शिलालेख हे त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास सांगणारा मोलाचा स्रोत आहे. नाशिक या भूभागावर सातवाहन राजांचे अधिराज्य असल्याचे पुरावे पाहायला मिळतात. नाशिकचा उल्लेख शिलालेखांतून वाचायला मिळतो.

स्वरूप[संपादन]

त्रिरश्मी लेणीसमूहात अनेक लेणी असून काही लेण्यांत स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आहेत. या गुहांमध्ये संपूर्ण सुस्थितीतले एक प्रमुख चैत्यगृह आहे. त्याचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे.

चित्र:त्रिरश्मी बौद्ध लेणी .JPG
[पूर्व दिशेचे प्रवेशद्वार]
त्रिरश्मी बौद्ध लेण्यांचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार - सकाळचे दृश्य

पश्चिमेकडील काही लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहे.

अधिक माहिती[संपादन]

या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. या टेकडीवर प्राचीन पाण्याची टाकी आहेत, परंतु ही पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते.

या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.

[नाशिक शहराचे विहंगम दृश्य]

त्रिरश्मी लेण्यांवरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीखाली बुद्ध विहारदादासाहेब फाळके स्मारक आहे. त्रिरश्मी बौद्ध लेण्यांवर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

पंचवटी, मध्यवर्ती बसस्थानक तसेच नाशिकरोड येथून बौद्ध लेण्यांसाठी बसेस सुटतात. अंबडला जाणाऱ्या बसने येथे उतरता येते. तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "बौद्धसंस्कार : त्रिरश्मी लेण्यावर श्रमणोर शिबिर". Lokmat. 2018-05-05. 2018-05-31 रोजी पाहिले.
  2. ^ "नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)