राजगीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजगीर (अधिकृत नाव: गिरीवराज) हे बिहार मधील नालंदा जिल्ह्यातील एक शहर व अधिसूचित क्षेत्र आहे. ही प्राचीन काळी मगध साम्राज्याची राजधानी होती. त्यानंतर मौर्य साम्राज्य उदयास आले. राजगीरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आहे. वसुमतिपुर, वृहद्रथपुर, गिरिब्रज, कुशग्रपुर आणि राजगृह या नावांनी सुद्धा हे प्रसिद्ध राहिले आहे. बौद्ध साहित्यानुसार, बुद्धांची साधनाभूमी राजगीरमध्ये आहे. राजगीर हेच २४ वे तीर्थंकर महावीर यांचे पहिले देशना स्थळ (जेथे उपदेश केला ती जागा)सुद्धा आहे. (देशना म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर एखाद्या जैन तीर्थंकराने सर्वभूतांसमॊर केलेले धार्मिक प्रवचन).

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत