सांचीचा स्तूप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[चित्र:Sanchi Stupa from Eastern gate, Madhya Pradesh.jpg|200px|thumb|सांचीचा स्तूप]]

सांची स्तूपावरील कोरीव कामाचे बारकावे
उत्तरेकडील द्वारावरील शोभिवंत कोरीवकाम


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सांचीचा स्तूप हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे. सांची हे भोपाळपासून ४५ कि.मी. तर विदिशापासून ९ कि.मी. अंतरावर आहे. सांचीचा स्तूप हा मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेला आहे.

इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात अशोक राजाने बांधलेले, संपूर्णपणे विटांचे बांधकाम असलेले हे स्थापत्य फारच सुंदर आहे. हा स्तूप म्हणजे एक स्मारक होय. गौतम बुद्धाच्या अस्थी किंवा त्याचे काही अवशेष एका पेटीमध्ये जपून ठेवले जात असत, आणि त्या पेटीवर स्मारक म्हणून भव्य अशा स्तूपाचे बांधकाम केले जाई. सांचीचा स्तूप हे पण असेच एक स्मारक आहे.

या सांचीच्या स्तूपाच्या माथ्यावर छत्रावली आहे. इ.स.पूर्व पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात या स्तूपाच्या बाजूने भव्य शिल्पांकित अशी तोरणे बांधली गेली आणि त्या स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक सुंदर प्रदक्षिणापथ तयार करण्यात आला. इथल्या तोरणांवर गौतम बुद्धांच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. सांची इथली ही तोरणे आणि त्यावर केलेले शिल्पकाम उत्तमप्रकारे केलेले आहे. या तोरणांवर असलेल्या ब्राह्मी लिपीमधील शिलालेखानुसार महाराष्ट्रातील कोणा आनंद नावाच्या व्यापाऱ्याने यासाठी देणगी दिल्याचा उल्लेख आढळतो. भूगोल व जनसांख्यिकी- उदयगिरी पासून साँची जवळच आहे. येथे बौद्ध स्तुप आहे सगळ्या स्तुपांची कला प्रख्यात आहे. येथे रेल्वे मार्ग, बस मार्ग ने जाता येते.रेल्वे मार्गाने येताना विदीशा या गावात उतरावे लागते तसेच हवाई मार्गाने येताना भोपाळला उतरावे लागते व तेथून बस ने साँचीला जाता येते.

चित्रदालन[संपादन]

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]