कोसांबी
Jump to navigation
Jump to search
गुणक: 25°32′N 81°23′E / 25.53°N 81.38°E
बौद्ध तीर्थस्थळे |
---|
![]() |
चार मुख्य स्थळे |
चार अतिरिक्त स्थळे |
इतर स्थळे |
नंतरची स्थळे |
|
कोसांबी (पाली) किंवा कौशांबी (संस्कृत) ही एक प्राचीन नगरी आहे. ही नगरी प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेले वत्स या राज्याची राजधानी होती. सध्या भारताच्या उत्तरप्रदेश राज्याच्या एका जिल्ह्याचे नाव (जिल्ह्याचे मुख्यालय मंझनपूर) आहे. हे शहर कौशंबी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. वैदिक व बौद्ध साहित्यात या नगरीचे महत्त्व वर्णिलेले आहे. पांडव वंशातील प्रसिद्ध राजा उदयन याचीही हीच राजधानी होती. याच्या काळातच बुद्धाने काही काळ येथे वास्तव्य केले होते. चिनी यात्री ह्युएन-त्सांग याने इ.स. च्या सातव्या शतकात या नगरीला भेट दिली होती. येथे केलेल्या उत्खननात अनेक देवालये व बौद्ध विहारांचे भग्नावशेष सापडलेले आहेत.