Jump to content

कमल हासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमल हासन
कमल हासन
जन्म ७ नोव्हेंबर, १९५४ (1954-11-07) (वय: ७०)
परमाकुडी, मद्रास प्रांत, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय, पटकथालेखन, दिग्दर्शन)
कारकीर्दीचा काळ इ.स. १९५९ - चालू
भाषा तमिळ
प्रमुख चित्रपट दशावतारम (इ.स. २००८)
नायगन (इ.स. १९८७)
पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता (१९८२)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता (१९८७)
पद्मश्री
वडील श्रीनिवासन हासन
पत्नी वाणी गणपती (इ.स. १९७८ - इ.स. १९८८)
सारिका हासन (इ.स. १९८८ - इ.स. २००४)
गौतमी (अभिनेत्री) (इ.स. २००५ -२०१६)[]
अपत्ये श्रुती हासन
अक्षरा हासन
अधिकृत संकेतस्थळ http://www.imdb.com/name/nm0352032/

कमल हासन (तमिळ: கமல் ஹாசன்) (७ नोव्हेंबर, इ.स. १९५४ - हयात) हे तमिळहिंदी चित्रपट-अभिनेते,राजकारणी, पटकथालेखक व दिग्दर्शक आहेत. १२ ऑगस्ट, इ.स. १९५९ रोजी चित्रपटगृहांत झळकलेल्या कलतूर कन्नम्मा या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी कमल हासन यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. इ.स. १९७५ सालच्या अपूर्व रागांगल या तमिळ चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेद्वारे तरुणपणी त्यांचा चित्रपटक्षेत्रात पुनःप्रवेश झाला. त्यांनी अभिनय केलेले मूंद्रम पिरै (इ.स. १९८२), नायगन (इ.स. १९८७), हे राम (इ.स. २०००), विरुमांदी (इ.स. २००४), दशावतारम्‌ (इ.स. २००८) हे चित्रपट विशेष गाजले.

कमल हासनांच्या अनेक चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या निघाल्या आहेत तर त्यांनी काही चित्रपट मूळ हिंदीमध्येच काढलेले आहेत. २०१३ सालापर्यंत कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

पुरस्कार

[संपादन]
  • मामि (मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज) या संस्थेच्या महोत्सवात मिळालेला जीवनगौरव पुरस्कार (२०१३)
  • पद्मश्री पुरस्कारासह तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


  1. ^ Bhattacharya, Ananya (1 November 2016). "Kamal Haasan and Gautami part ways after living together for 13 years". इंडिया टुडे. 2 November 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.