जयसिंगपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयसिंगपूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक शहर आहे. या शहराचे नाव श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे वडील राजा जयसिंग, यांच्या नावावरून ठेवले आहे.हे शहर कोल्हापूरपासून ३८ किलोमीटर पूर्वेला रत्‍नागिरी-नागपूर राज्यमार्गावर ,वसलेले आहे. या शहराच्या पूर्वेला कृष्णा नदी वाहते व ही नदी कोल्हापूर , सांगली या जिल्ह्यांमधील सीमा बनते. येथील गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या शहराची रचना एका वेगळ्या प्रकारची आहे. हे शहर तंबाखू, मिरची, गूळ व्यापारासाठी वसवले गेले. JAYSINGPUR HYA CITI CHE NAV RAJA JAYSING HYA RAJA NAVANE PADLE.

दळणवळण[संपादन]

हे शहर सांगली व कोल्हापूर या दोन्ही जिल्हा प्रशासकीय केन्द्रांशी रस्त्यांमार्गे जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस दोन्हीकडे जाण्यासाठी दर १५ मिनिटांनी सेवा पुरवतात. जयसिंगपूर रेल्वे स्थानक हे कोल्हापूर मिरज मार्गावरील प्रमुख स्थानक आहे.[१] येथील जवळचा विमानतळ हे कोल्हापूर (उजळाईवाडी) आहे.

प्रशासन[संपादन]

जयसिंगपूर नगरपालिकेची स्थापना इ.स. १९४२ मध्ये झाली. जयसिंगपूर शहर हे शिरोळ तालुक्यामध्ये येते.

शैक्षणिक[संपादन]

जयसिंगपूरमध्ये जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर, नवजीवन विद्यामंदीर, बलवंतराव झेले विद्यामंदीर, मालू विद्यामंदीर, रयत शिक्षण संस्थेचे, लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कुल ही प्रमुख विद्यामंदिरे असून जयसिंगपूर कॉलेज, झेले कॉलेज ही उच्चमाध्यमिक महाविद्यालये आहेत. जे.जे. मगदूम इंजिनीरिंग व वैद्यकीय महाविद्यालय ही व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर शिक्षणसंस्था आहे .

सामाजिक[संपादन]

जयसिंगपूर हे शहर ऊस परिषदेसाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक या भागातील ऊस शेतकरी आमदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दाराची मागणी करतात. या परिषदेमुळे ऊस दारामध्ये वाढ झालेली आहे.[२]

आर्थिक[संपादन]

जयसिंगपूर तंबाखूसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेली तंबाखूची बाजारपेठ ही भारतामधील मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. येथून देशभर गुटखा आणि तंबाखू यांची निर्यात केली जाते. राज्य महामार्गावर असल्यामुळे व सांगली शहराच्या जवळकीमुळे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. आर्थिक विकासामुळे व उद्योगामुळे या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. जयसिंगपूरमध्ये शूटिंग बॉल हा खेळ लोकप्रिय आहे. १९५९ साली जयसिंगपुरात शूटिंग बॉल (व्हॉलीबॉल) क्लबची स्थापना झाली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ moderator. "Jayasingpur Railway Station Map/Atlas CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2018-03-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Raju Shetty on indefinite fast - Times of India". The Times of India. 2018-03-17 रोजी पाहिले.[permanent dead link]