सुभाष खोत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुभाष खोत साचा:१० जून १९७८, इचलकरंजी हे संगणक शास्त्रज्ञ आणि गणिती आहेत. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सौ.गंगामाई विद्यामंदिर, इचलकरंजी येथून आणि माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल,इचलकरंजी येथून पूर्ण केले. शालेय वयातच आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी दाखवली. त्यांना पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृती मिळाली. १९९५ मध्ये आय.आय.टी.च्या प्रवेश परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आय.आय.टी., मुंबई येथून संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयातील पदवी १९९९ मध्ये संपादन केली. गणित ऑलिम्पियाड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी भारताचे दोन वेळा प्रतिनिधीत्व करताना रजत पदके मिळवली. सध्या ते न्यूयॉर्क विद्यापीठातील कोरंट इंस्टीट्यूट ऑफ मॅथेमटीकल सायन्सेस येथे प्राध्यापक म्हणून काम करतात. कॉम्प्यूटेशनल कॉम्प्लेक्सिटी या विषयात त्यांनी अनपेक्षित आणि मूलभूत योगदान दिले आहे. त्यांच्या युनिक गेम्स कंजेक्चर साठी ते ओळखले जातात.

पुरस्कार[संपादन]

  1. डॉ.सुभाष खोत यांना २०१४ मध्ये रॉल्फ नेव्हालिना पुरस्काराने गौरवण्यात आले.
  2. २०१६ मध्ये त्यांना त्यांच्या क्षेत्रातील अपवादात्मक कल्पकतेसाठी मक आर्थर फेलोशिपने गौरवण्यात आले. या फेलोशिपला 'जिनियस ग्रँट' असेही म्हटले जाते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]