मँचेस्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मँचेस्टर
Manchester
युनायटेड किंग्डममधील शहर

Montage of Manchester 2012.jpg

Arms of the City of Manchester.svg
चिन्ह
Manchester UK locator map.svg
मँचेस्टरचे ग्रेटर मँचेस्टरमधील स्थान
मँचेस्टर is located in इंग्लंड
मँचेस्टर
मँचेस्टर
मँचेस्टरचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 53°28′N 2°14′W / 53.46667°N 2.23333°W / 53.46667; -2.23333गुणक: 53°28′N 2°14′W / 53.46667°N 2.23333°W / 53.46667; -2.23333

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश वायव्य इंग्लंड
काउंटी ग्रेटर मँचेस्टर
स्थापना वर्ष इ.स.चे पहिले शतक
क्षेत्रफळ ११५.६५ चौ. किमी (४४.६५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२५ फूट (३८ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ५,०२,९००
  - घनता ४,३४९ /चौ. किमी (११,२६० /चौ. मैल)
  - महानगर २५,५३,३७९
प्रमाणवेळ यूटीसी±००:००
manchester.gov.uk
सुमारे १८२० सालामधील मँचेस्टर येथील एक यंत्रमाग कारखाना

मँचेस्टर (इंग्लिश: Manchester हे इंग्लंड देशामधील महानगरी बरो व एक प्रमुख शहर आहे. हे शहर इंग्लंडच्या मध्य-उत्तर भागात वसले असून ते ग्रेटर लंडन खालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

१९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले मँचेस्टर औद्योगिक क्रांतीदरम्यान जगातील पहिले औद्योगिक शहर बनले. येथील वस्त्र निर्माण उद्योग जगातील सर्वात मोठा होता. लिव्हरपूल ते मँचेस्टर ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक रेल्वे सेवा होती व मँचेस्टर येथे जगातील पहिले रेल्वे स्थानक बांधले गेले होते. इ.स. १८९४ मध्ये बांधल्या गेलेल्या मँचेस्टर कालव्याद्वारे मँचेस्टर आयरिश समुद्रासोबत जोडले गेले ज्यामुळे येथील उद्योगास अधिकच चालना मिळाली.

सध्या मँचेस्टर हे इंग्लंडमधील एक प्रगत शहर असून येथील संगीत, वास्तूशास्त्र, खेळ इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे राहणारे १४.४ टक्के लोक दक्षिण आशियाई वंशाच्या आहेत.

खेळ[संपादन]

मँचेस्टर शहर खेळांकरिता प्रसिद्ध असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारे मँचेस्टर युनायटेडमँचेस्टर सिटी हे दोन सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. २००२ राष्ट्रकुल खेळ येथील सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियममध्ये आयोजीत केले गेले. हे स्टेडियम सध्या मँचेस्टर सिटी हा क्लब वापरत असून मँचेस्टर युनायटेड आपले सामने ओल्ड ट्रॅफर्ड ह्या ऐतिहासिक मैदानामधून खेळतो. मँचेस्टरमध्ये आजवर १९६६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९९६, २०१२ उन्हाळी ऑलिंपिक, २००३ युएफा चँपियन्स लीग अंतिम सामना तसेच २००८ युएफा युरोपा लीग अंतिम सामना इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सामने खेळवले गेले आहेत.

इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळणारा लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब मँचेस्टर येथे स्थित आहे व तो आपले सामने ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानामधून खेळतो.

वाहतूक[संपादन]

मँचेस्टर विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तो २०१३ साली ब्रिटनमधील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: