Jump to content

राहुल बजाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राहुल बजाज
राहुल बजाज
जन्म जून १०, इ.स. १९३८
कोलकाता
मृत्यू १२ फेब्रुवारी, २०२२ (वय ८३)
पुणे
निवासस्थान पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण  • सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली
(बीए),
 • हर्षल लॉ कॉलेज,
(लॉ),
 • हार्वर्ड बिझनेस स्कूल
(एमबीए)
पेशा उद्योजक, राजकारणी
मालक बजाज ऑटो
निव्वळ मालमत्ता १.८ अब्ज अमेरिकन डॉलर (इ.स. २०१२) [१]
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संचालकमंडळाचे सभासद बजाज ऑटो (संचालक)
धर्म हिंदू
जोडीदार
रूपा बजाज
(ल. १९६१; मृ. २०१३)
अपत्ये राजीव, संजीव, सूनयना
वडील कमलनयन बजाज
आई सावित्री बजाज
नातेवाईक जमनालाल बजाज (आजोबा)
पुरस्कार पद्मभूषण

राहुल बजाज (जून १०, इ.स. १९३८ कलकत्ता , १२ फेब्रुवारी २०२२, पुणे[२]) यांचा जन्म, सावित्री आणि कमलनयन बजाज या मातापित्यांच्या पोटी, कलकत्ता येथे १० जून १९३८ रोजी  मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती. ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना २००१ साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रूपा घोलप या महाराष्ट्रीयन तरुणीशी १९६१ साली राहुल यांचा विवाह झाला. रूपा या त्या काळातील सौंदर्यवती व नवोदित मॉडेल होत्या. राहुल व रूपा यांना राजीव (जन्म - १९६६), संजीव (जन्म - १९६९), सुनयना केजरीवाल (जन्म-१९७१) ही तीन मुले आहेत. हे भारतामधील एक उद्योजक आहेत. बजाज ऑटो या कंपनीचे ते संचालक आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यानच्या काळात राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज आणि संजीव बजाज बजाज कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रवेश केला. त्यांची मुलगी सुनयना यांचा विवाह तेमाझेक इंडिया चे माजी प्रमुख मनीष केजरीवाल यांच्याशी  झाला.

राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत. जमनालाल बजाज हे जवाहरलाल नेहरू यांचेही खूप जवळचे मित्र होते. काँग्रेस पक्षाच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे होते. बजाज आणि नेहरू या घराण्याचे गेल्या तीन पिढ्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. कमलनयन आणि इंदिरा गांधी दोघे काही काळ एकाच विद्यालयात शिकत होते. कमलनयन यांच्या पहिल्या अपत्याचे राहुल हे नाव स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेले आहे. राहुल यांचे बालपण अतिशय शिस्तीच्या वातावरणात गेले. कमलनयन बजाज हे महात्मा गांधींच्या वर्ध्यातील संन्याशी आश्रमात वाढले.

शिक्षण[संपादन]

राहुल यांचे शालेय शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित अश्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन  या शाळांमधून झाले. त्यांनी १९६८ साली दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए (ऑनर्स ) ही पदवी मिळवली. मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करता करता बजाज इलेक्ट्रॉनिकस मध्ये उमेदवारी केली. १९६४ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची   व्यवस्थापन क्षेत्रातील  (एम.बी.ए.) पदवी प्राप्त केली.

१९६५ साली ते बजाज ग्रुप चे चेरमन झाले. २००५ साली  चेरमन पदावरून पायउतार झाले. त्याचे पुत्र राजीव हे बजाज ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक झाले. राहुल बजाज हे २००६ ते २०१० या दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. २०१६ च्या फोर्ब्ज च्या जगातील श्रीमंत लोकांच्या  यादीमध्ये राहुल बजाज हे ७२२ व्या क्रमांकावर होते.

पुरस्कार[संपादन]

  • २००१ साली भारत सरकारने राहुल बजाज यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले.
  • फ्रान्स सरकारने 'नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच नागरिक सन्मान देऊन सन्मानित केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "राहुल बजाज" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार | Rahul Bajaj". eSakal - Marathi Newspaper. 2022-02-12 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]