महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
ब्रीदवाक्य प्रवाश्यांच्या सेवेसाठी
प्रकार प्रवासी
स्थापना १९४८
संस्थापक मुंबई प्रांत सरकार
मुख्यालय

मुंबई, भारत

महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ.आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.
कार्यालयांची संख्या
सेवांतर्गत प्रदेश महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, तेलंगणा
महत्त्वाच्या व्यक्ती दिवाकर रावते चेअरमन, रणजीत सिंह देओल,उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सेवा टप्पा पद्धतीने प्रवासी वहातूक
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
४३७० कोटी
निव्वळ उत्पन्न ७० कोटी
मालक महाराष्ट्र शासन
विभाग १२
संकेतस्थळ https://msrtc.maharashtra.gov.in/index.php

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव: एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.


स्थापना आणि इतिहास[संपादन]

वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतूकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारा खासगी व्यावसायिकांद्वारे सुरु झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारतातील ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रांसपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.

बीएसआरटीसीची पहिली बस जून १, इ.स. १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.

सेवा आणि विस्तार[संपादन]

मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर असे एसटीचे सहा विभाग आहेत

वाहनांचा ताफा (फ्लीट)[संपादन]

एस.टी.ची एक ग्रामीण भागात चालणारी बस

MSRTC-Shivneri-Volvo-B7R.jpg|240 px|इवलेसे|एस.टी.ची वातानुकूलीत शिवनेरी बस]]

एस.टी.ची निम-आराम हिरकणी बस

आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५५० वाहने आहेत त्यांचा तपशील असा

साध्या बसगाड्या १४०२२
शहर बस गाड्या ६५१
निम आराम बसगाड्या ५४४
मिनी बसगाड्या १९९
डीलक्स बसगाड्या ४८
वातानुकुलित बसगाड्या २६
मिडी गाड्या १०

याशिवाय अधिकारीवर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामंडळाकडे आहेत

आधुनिकीकरण[संपादन]

एसटी ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवित आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.

एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाउ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात.

महामंडळाची रचना[संपादन]

एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. [१]

  • श्री.दिवाकर रावते - अध्यक्ष
  • श्री रणजितसिंग देओल - उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
  • श्री. सुधीर श्रीवास्तव - शासकीय संचालक
  • श्री. यशवंतराव इ. केरुरे - शासकीय संचालक
  • श्रीमती इराने चेरियान - शासकीय संचालक
  • श्री. सतीश पुंडलिक दुधे - शासकीय संचालक
  • डॉ. श्री. प्रवीण गेडाम - शासकीय संचालक

कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापन[संपादन]

Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.एसटी महामंडळात एकूण २० कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत. तरीही आज सर्वात कमी पगार एसटी कर्मचाऱ्यांना मिळतो.[ संदर्भ हवा ] श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा १९७१ नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचे धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचा व वेतन करार करताना प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा अधिकार या एकाच संघटनेला प्राप्त झालेला आहे.

परंतु आता पर्यंत एसटी तोट्यात असल्याचे कारण पुढे करून वेतनवाढ रोखण्यास प्रशासन आणि संघटना यशस्वी झालेत आणि कर्मचारी आजही कमी वेतनात राबताना दिसत आहे. त्यामुळे आता गरज आहे एसटीला प्रशासन आणि संघटनेच्या जाचातून मुक्त करण्याची आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा एसटी महामंडळ पूर्णतः शासनाच्या ताब्यात जाईल.. म्हणून एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याची गरज आहे.

सामाजिक जबाबदारी[संपादन]

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे.

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]