प्रकाश आवाडे
प्रकाश आवाडे | |
माजी वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य
| |
मतदारसंघ | इचलकरंजी |
---|---|
जन्म | १५ मार्च, १९५३ इचलकरंजी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | अपक्ष |
पत्नी | सौ.किशोरी आवाडे |
निवास | ‘इंदुकला’ आवाडेनगर, इचलकरंजी - ४१६११५.
ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. महाराष्ट्र |
संकेतस्थळ | [१०] |
प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत.इचलकरंजी मतदारसंघातून १९८५[१] मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी त्यांची निवड झाली.प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधि या नात्याने राजकरणात वेगळा ठसा उमटविला आहे. ते १९८८ ते १९९० मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री होते. सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री आणि नंतरच्या काळात कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री या नात्याने त्यांनी वस्त्रोद्योगासाठी मौलिक कार्य केले आहे.
वैयक्तिक माहिती
[संपादन]त्यांच्या वडिलांचे नाव कल्लाप्पाण्णा आवाडे आहे. प्रकाशरावांना राजकीय वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला.राजकीय पद असो किंवा नसो जनतेची सेवा हाच खरा धर्म अशी शिकवण त्यांना मिळाली व त्यामुळेच अनेक कार्यातून लोकांच्या उन्नतीसाठी अविरत झटणारे समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जातात.
सामाजिक कार्य
[संपादन]- फिल्टर वॉटर प्रोजेक्ट
प्रदूषित पाण्यामुळे होणारे पोटांचे आणि आतड्यांचे विकार याने नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे हे जाणून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहराला फिल्टर वॉटरची सोय करून दिली.
- आरोग्य सुविधा
रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्टीसह गरिबांना खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेणे परवडत नाही.फिरत्या दवाखान्यातून गरिबांची सेवा करता यावी यासाठी माजी मंत्री श्री.प्रकाश आवाडे यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे चॅरिटेबल सोसायटी मार्फत फिरता दवाखाना चालू केला.
- महिला विकास
इचलकरंजीतील आधुनिक लुम्स वरील दर्जेदार कापडाच्या विक्रीवर समाधानी न राहता या कापडापासून गारमेंट तयार करण्यात यावे यासाठी प्रकाश रावांनी पुढाकार घेतला.व महिला गारमेंट प्रशिक्षण योजना आणली.
राजकीय टप्पे
[संपादन]१। इचलकरंजी मतदारसंघातून १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.[२] [३][४]
2| १९८८-९० महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री
३। १९९५ मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून विधानसभेवर पुन्हा निवड.[५] [६]
४। १९९९ मधील निवडणूकीत इचलकरंजी मतदारसंघातून पुन्हा निवड व महाराष्ट्रच्या मंत्रीमंडळात वस्त्रउद्योग,आदिवासी विकास व विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून समावेश. [७] [८]
५। २००४ मध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. [९]
६| जानेवारी २००३ पासून वस्त्रउद्योग राज्यमंत्रीपदाबरोबर जालना जिल्हयाचे पालकमंत्री पदाची जबाबदारी.
७| जुलै २००४ पासून कॅबिनेटपदी बढती मिळून वस्त्रउद्योग व माजी सैनिकांचे कल्याण मंत्री म्हणून कार्यभार तसेच सिंधूदुर्ग जिल्हा पालकमंत्रीपदाची धुरा.
संदर्भ
[संपादन]