छत्रपती
छत्रपती ही एक भारतीय शाही उपाधी आहे. ती राज्याभिषेक झालेल्या हिंदू राजाच्या नावाआधी वापरली जाते. छत्रपती म्हणजे प्रजेवर सतत मायेच छत्र धारण करणारा, म्हणजेच सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेणारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा प्रजेचे रक्षण करणारा होय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर लिहिलेल्या जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या एक अभंगात छत्रपती शब्दाचा उल्लेख आहे.
“शिव तुझे नाव। ठेविले पवित्र।
छत्रपती सूत्र। विश्वाचे की।”