पुण्यातील रस्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
कर्वे रोड

मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग[संपादन]

हे दोन आहेत.

  1. राष्ट्रीय महामार्ग ४ : मुंबई-शींव-ठाणे-पनवेल-खंडाळा-लोणावळा-पुणे(रेल्वे स्टेशन)-पुणे(स्वारगेट)-सातारा-बंगलोर.
  2. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग : मुंबई-शींव-वाशी मार्गे हा साधा महामार्ग पनवेलजवळच्या कळंबोलीला पोचतो आणि तेथून गतिमार्ग बनून देहूरोडच्या जवळून कात्रजमार्गे बंगलोरला जातो. हा पुणे शहरात प्रवेश करत नाही. मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान याला कोण(शेंडुंग), चौक, खालापूर, कुसगाव आणि तळेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ला जोडणारे फाटे आहेत.

पुणे-नाशिक रस्ता[संपादन]

या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग ५० म्हणतात. हा रनाशिक फाटा- कासारवाडी येथून राष्ट्रीय महामार्ग ४ पासुन सुरू होतो आणि पुढे भोसरी-मोशी-चाकण-खेड-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेरमार्गे नाशिकला पोहोचतो.

पुणे-सोलापूर रस्ता[संपादन]

सोलापूर रस्त्यावरील ७ लव्हस् चौक लहुजी वस्ताद साळवे उड्डान पुल

कर्वे रस्ता[संपादन]

हा पुण्यातील एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. डेक्कन जिमखाना कॉर्नरपाशी (लकडी ऊर्फ संभाजी पुलाच्या उत्तर टोकाला असलेल्या खंडूजी बाबा चौकापासून हा रस्ता सुरू होतो. आबासाहेब गरवारे कॉलेज(एम्‌ईएस कॉलेज), नळ स्टॉप, पौड फाटा, मयूर कॉलनी, कर्वे पुतळा असा हा रस्ता आहे. वाढत्या पुण्याच्या हिशेबाने आता हा रस्ता वारजे(माळवाडी)पर्यंत जातो. हा अत्यंत रहदारीचा रस्ता असून आजपर्यंत या रस्त्याला समर्थ पर्याय पुणेकरांना मिळू शकलेला नाही.

रस्त्याच्या सुरुवातीलाच याला प्रभात रस्ता मिळतो, पुढे नळ स्टॉपपाशी लॉ कॉलेज रस्ता आणि त्यापुढील पौड फाटा चौकात पौड रस्ता.

फर्ग्युसन कॉलेज रस्ता[संपादन]

डेक्कन जिमखान्याजवळच्या गरवारे उड्डाण पुलापासून निघालेला हा रस्ता गणेश खिंड रस्त्याला म्हसोबा गेटपाशी संपतो. या रस्त्याचे वापरात नसलेले अधिकृत नाव गोखले रोड आहे.

या रस्त्यावर गोखले इन्स्टिट्यूट, फर्ग्युसन कॉलेज, ज्ञानेश्वर पादुका चौक आणि पोलीस परेड ग्राउंड आहे.

जंगली महाराज रस्ता[संपादन]

जंगली महाराज रस्ता पुण्यातील हमरस्ता आहे. हा रस्ता डेक्कन जिमखान्यापासून शिवाजीनगर पर्यंत पश्चिम-पूर्व जातो. या रस्त्यावर अनेक चांगली चांगली दुकाने व उत्तम उपाहारगृहे आहेत.

मॅकडोनाल्डस् स्टोर

रस्त्याची रुंदी ८० फूट आहे. हा रस्ता बांधण्यापूर्वी इतका रुंद रस्ता पुणे शहरात नव्हता. त्यामुळे या रस्त्याला अजूनही काही लोक एटी-फ़ीट-रोड म्हणतात.

या रस्त्यावर जंगली महाराजांचे देऊळ आणि पाताळेश्वरची लेणी आहेत. छान माहीती दिली आहे

टिळक रस्ता[संपादन]

महात्मा गांधी रस्ता[संपादन]

== लक्ष्मी रस्ता==5gg

कुमठेकर रस्ता[संपादन]

गाडगीळ रस्ता[संपादन]

सिंहगड रस्ता[संपादन]

पौड रस्ता[संपादन]

लॉ कॉलेज रस्ता[संपादन]

पुण्यातील प्रमुख रस्त्यांपैकी एक. हा कर्वे रोडवरील नळ स्टॉप जवळ सुरू होतो आणि सेनापती बापट रोडजवळच्या एनसीसी मैदानाजवळ संपतो. या रस्त्याचे वापरात नसलेले अधिकृत नाव चिपळूणकर रस्ता असे आहे.

रस्त्यावरील मुख्यस्थळे :

प्रभात रस्ता[संपादन]

कॅनॉल रस्ता[संपादन]

शिवाजी रस्ता[संपादन]

हा शिवाजीनगर रेल्वे स्टेशनापासून सुरू होतो. पुढे तो शिवाजीपुतळा(श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल), नवापूल, शनिवारवाडा, लालमहाल, बुधवार चौक, बेलबाग चौक, दगडू हलवाई दत्तमंदिर, मंडई, खडक-माळआळीवरून स्वारगेटला जाऊन संपतो. स्वारगेटहून पुढे जाणाऱ्या रस्त्याला सातारा रोड म्हणतात.

बाजीराव रस्ता[संपादन]

हा शनिवार वाड्याजवळ सुरू होतो आणि फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक, शनिपार, अत्रे सभागृहमार्गे पर्वतीच्या पायथ्याला पोचतो.