पौड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?पौड
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

१८° ३१′ २७.१२″ N, ७३° ३६′ ५६.८८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पुणे जिल्हा
लोकसंख्या ५,५५८

गुणक: 18°31′27″N 73°36′57″E / 18.52417°N 73.61583°E / 18.52417; 73.61583{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. पौड हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.

भौगोलिक माहिती[संपादन]

इतिहास[संपादन]

तालुक्याला नाव मुळशी असले तरी पूर्वीपासून तालु्नयाचा कारभार पौड येथून चालत आहे. पौडच गावठाणामध्ये दर मंगळवारी बाजार भरत असे. कोढावळे, शेरेे, माले, जामगाव, मुळशी धरण भाग, कोळवण येथे खोरे ते पिरंगुटपर्यंतचे ग्रामस्थ खरेदीसाठी येत असत. कपडे, किराणा, भुसार आदींची अनेक मोठी दुकाने येथे होती. भरगच्च बाजारपेठ होती. मंगळवारी बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेने अनेक दुकाने थाटली जात. पुढे बदलत्या काळात गावठाणातील बाजार बंद पडला. नवीन एसटी स्थानकासमोर सध्या बाजार भरतो. तहसीलदार, पोलिस स्टेशन, विविध शासकीय कार्यालये व पंचायत समितीचा कारभार पौड येथेच होत असतो. तालुक्यातील मुख्य ठिकाण पौड. इंग्रजांच्या काळापासून पौडला महत्त्व आहे. पंचायत राज सुरू झाल्यानंतर येथे राजकीय व शासकीय कामकाजाचे मुख्य केंद्र झाले. तहसील, पोलिस स्टेशन, कृषी, एमएसईबी, पाटबंधारे, वन विभाग आदी कार्यालये तेथे सुरू झाली. पूर्वीपासून बाजाराचे मुख्य ठिकाण म्हणून पौड ओळखले जात होते. तेथील बाजारपेठ कपडे, किराणा, हॉटेल व विविध व्यवसायांनी सज्ज होती. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची खरेदीसाठी मोठी गर्दी जमत असे. येथील बाजाराचा दिवस पूर्वीपासून मंगळवार आहे. बाजार व शासकीय कामे एकाच वेळी शेतकर्‍यांना करता येत होती. पंचायत राज १९६२ला सुरू झाल्यानंतर पंचायत समिती अस्तित्वात आली. सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तालु्नयाला जमत असत. येथील बाजाराचा दिवस मंगळवार असल्यामुळे तोच वार राजकीय मंडळींनी तालु्नयातील बैठकीचा ठरविला. सर्व पदाधिकार्‍यांनी या दिवशी पौडला उपस्थित राहण्याचे ठरले. तसेच, सर्व शासकीय अधिकार्‍यांनाही त्या दिवशी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे तालु्नयातून येणार्‍या ग्रामस्थांची, गावांची कामे समोरासमोर करता येतील, हा उद्देश होता. बाजाराला येणारे ग्रामस्थ पुढार्‍यांनाही भेटू लागले. गावांचे प्रश्‍न मांडू लागले.त्या वेळेपासून तालु्नयाचा वार मंगळवार सर्वत्र चर्चेत आला. त्या वेळी तालु्नयात कोणत्या गावात कधी कार्यक्रम घ्यायचे, याचा निर्णय पुढारी घेत. तालु्नयात एकमेव कॉंग्रेस पक्ष प्रबळ होता. त्यामुळे पक्षीय बातम्या कमी होत्या. पंचायत समितीची जुनी इमारत होती. सभापती, उपसभापती एकाच रूममध्ये बसत. त्यांच्या जवळच्या कक्षात बी.डी.ओ. बसत असत. आठ-दहा खुर्च्या ग्रामस्थांसाठी असत. ठरावीक कार्यकर्ते मंगळवारी येत असत. पुढील काळात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसमधील फूट यांचा परिणाम तालु्नयाच्या राजकारणावर झाला. विशेषत: आमसभा दर वर्षी होऊ लागल्या. नेत्यांची एकमेकांवर टीका, विरोध तीव्र होऊ लागला. पुढे कॉंग्रेसची सत्ता जाऊन शिवसेनेची सत्ता आली. या सत्तातरानंतर राजकीय घडामोडीमुळे पौडचे महत्त्व अधिक वाढले. ती दहा वर्षे होती. त्यानंतर राष्ट्रवादीची सत्ता झाली. प्रत्येक पक्षाची ताकद वाढल्यामुळे दर मंगळवारी पौडची गर्दीही वाढत होती. सरपंच, उपसरपंच यांचेही चित्र गावोगावी बदलले. नवीन झालेल्या पदाधिकार्‍यांचा पौडचा ओढा वाढू लागला. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी बैठकीसाठी येऊ लागले. तालु्नयात जिल्हा बॅंकेचे सभागृह (मामासाहेब मोहोळ), कॉंग्रेसचे सभागृह (बाबूराव रायरीकर), पंचायत समितीचे सभागृह (अप्पासाहेब ढमाले) व नवीन इमारतीमध्ये सेनापती बापट सभागृह झाले. तालु्नयातील कार्यकर्त्यांना पौडची वेगळीच सवय झाली. मंगळवार म्हटले, की पौडला जायचे. पौडला गेलो नाही, तर काही तरी चुकल्यासारखे त्यांना वाटते. जसे व्यायामाची सवय असलेल्यांना एखाद्या दिवशी व्यायाम चुकल्यावर वाटते तसे. पौडला आल्यावर ते उत्साहाने एकमेकांना भेटत असतात. अधिकार्‍यांसमोर प्रश्‍न मांडत असतात. बैठका व कार्यक्रमात भाग घेत असतात.

पर्यावरण[संपादन]

सामाजिक माहिती[संपादन]

इतर माहिती[संपादन]