जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ncralogo.gif
जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप
Gmrt.JPG

नारायणगाव येथील एक टेलिस्कोप

प्रकार {{{प्रकार}}}
उत्पादक {{{उत्पादक}}}
रचनाकार डॉ. गोविंद स्वरुप
सद्यस्थिती सेवेत
उत्पादन काळ १९९५
मूळ प्रकार जीएमआरटी

जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण.) (लघुरूप: जी.एम.आर.टी.; इंग्लिश: Giant Metrewave Radio Telescope ;) हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामधल्या खोडद (अक्षांश: १९.०९६५१७ उ.; रेखांश: ७४.०४९७४२ पू.) येथील दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. या दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे. दुर्बिणी पॅराबोलिक आकाराचे तारांचे जाळे आहे.

जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या लहरींसाठी बनवली आहे. जी.एम.आर.टी.मध्ये ५० मेगाहर्टझ ते १४२० मेगाहर्टझ या वर्णपटातल्या लहरींचा अभ्यास होतो.

बाह्य दुवे[संपादन]