फेब्रुवारी २४
Appearance
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५५ वा किंवा लीप वर्षात ५५ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरी दिनदर्शिका प्रदर्शित केली.
सतरावे शतक
[संपादन]- १६७४ - कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सरसेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.
अठरावे शतक
[संपादन]- १७३९ - कर्नालची लढाई - नादीरशहाचा मुघल सैन्यावर विजय.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८२२ - जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले.
- १८२६ - यांदाबूचा तह - म्यानमार व इंग्लिश सैन्यातील लढाई थांबली.
- १८३१ - डान्सिंग रॅबिट क्रीकचा करार - अमेरिकेतील चॉक्टाओ जमातीने मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील भाग अमेरिकेला दिला.
- १८४५ - फ्रांसचा राजा लुई-फिलिपने पदत्याग केला.
- १८६८ - अमेरिकेच्या अध्यक्ष अँड्रु जॉन्सनवर अमेरिकन काँग्रेसने महाभियोग सुरू केला. अंततः जॉन्सन निर्दोष ठरला.
विसावे शतक
[संपादन]- १९१८ - एस्टोनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- १९२० - जर्मनीमध्ये नाझी पार्टीची स्थापना झाली.
- १९३८ - दु पॉॅंतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
- १९४२ - व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.
- १९४५ - ईजिप्तच्या पंतप्रधान अहमद मेहेर पाशाची संसदेत कामकाज चालू असताना हत्या.
- १९४६ - हुआन पेरॉन आर्जेन्टिनाच्या अध्यक्षपदी निवडून आला.
- १९५२ - भारतात कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरुवात झाली.
- १९६१ - मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
- १९६८ - व्हियेतनाम युद्ध-टेटचा हल्ला - दक्षिण व्हियेतनामने ह्युए शहर जिंकले.
- १९७६ - क्युबाने नवीन संविधान अंगिकारले.
- १९८९ - रुहोल्ला खोमेनीने सलमान रश्दीला ठार करण्याबद्दल ३०,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.
- १९८९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ८११ या विमानास हवेत असताना भगदाड पडले. ९ प्रवासी खाली फेकले गेले.
- १९९९ - चायना सदर्न एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान चीनच्या वेन्झू विमानतळावर कोसळले. ६१ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००६ - फिलिपाईन्समध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणीबाणी लागू केली.
- २००८ - क्युबाच्या राष्ट्राध्यक्ष फिदेल कास्त्रोेने ३२वर्षांनी सत्ता सोडली.
- २००३ - चीनच्या जिजियांग प्रांतामध्ये तीव्र भूकंपात २५७ लोकांचा मृत्यू
- २०१० - एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू झाला.
जन्म
[संपादन]- ११०३ - टोबा, जपानी सम्राट.
- १३०४ - इब्न बतुता, मोरोक्कोचा शोधक.
- १४९३ - बाबर, मोगल सम्राट.
- १५०० - चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
- १५०० - पोप क्लेमेंट आठवा.
- १५५७ - मथियास, पवित्र रोमन सम्राट.
- १६७० - छत्रपती राजारामराजे भोसले, मराठा साम्राज्यचे तृतीय छत्रपती.
- १८८५ - चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग(ॲडमिरल).
- १९२४ - तलत महमूद, हिंदी चित्रपट अभिनेता आणि पार्श्वगायक.
- १९३४ - बेट्टिनो क्रॅक्सी, इटलीचा पंतप्रधान.
- १९३९ - जॉय मुखर्जी, हिंदी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक.
- १९४२ - जोसेफ लीबरमन, अमेरिकन राजकारणी.
- १९४८ - जे. जयललिता, तमिळनाडूची मुख्यमंत्री.
- १९५५ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक.
- १९७२ - पूजा भट्ट, हिंदी चित्रपट निर्माती, निर्देशक, अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- ६१६ - एथेलबर्ट, इंग्लंडचा राजा.
- १६७४ - प्रतापराव गुजर मराठा साम्राज्याचे तिसरे सरसेनापती
- १७७७ - जोसेफ पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७७९ - पॉल डॅनियल लॉॅंगोलियस, जर्मन ज्ञानकोशकार.
- १८१० - हेन्री कॅव्हेंडिश, इंग्लिश संशोधक.
- १९२५ - ह्यालमार ब्रॅंटिंग, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९३६ - लक्ष्मीबाई टिळक, मराठी लेखिका.
- १९६७ - मीर उस्मान अली खान, हैदराबादचे शेवटचे निझाम.
- १९७५ - निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८६ - रुक्मिणीदेवी अरुंडेल, भरतनाट्यम नर्तिका.
- १९९८ - ललिता पवार, हिंदी चित्रपट अभिनेत्री, निर्माता.
- २०११ - अनंत पै, अमर चित्र कथाचे जनक.
- २०१८ - श्रीदेवी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - एस्टोनिया.
- जागतिक मुद्रण दिन
- केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - (फेब्रुवारी महिना)