एप्रिल १७
Jump to navigation
Jump to search
एप्रिल १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०७ वा किंवा लीप वर्षात १०८ वा दिवस असतो.
<< | एप्रिल २०१९ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
अनुक्रमणिका
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
पहिले शतक[संपादन]
पंधरावे शतक[संपादन]
- १४९२ - स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.
सोळावे शतक[संपादन]
- १५२१ - मार्टिन ल्युथरचे वर्मच्या डियेटसमोर भाषण. त्याने आपले तत्त्वज्ञान बदलण्यास नकार दिला.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - व्हर्जिनीया अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८९५ - माग्वानचा तह - जपानने पराभूत चीनला अपमानास्पद कलमे असलेला तह मंजूर करण्यास भाग पाडले.
विसावे शतक[संपादन]
- १९३५ - सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागति पत्करली.
- १९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.
- १९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
- १९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
- १९६१ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - क्युबाच्या फिदेल कास्त्रोची राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
- १९७० - चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
- १९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
- १९७३ : कुरियर कंपनी फेडेक्सची सुरुवात.
- १९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह जिंकली.
- १९८६ - सिसिली आणि नेदरलँड्समधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.
एकविसावे शतक[संपादन]
- २००२ - अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.
जन्म[संपादन]
- ५९३ - जोमेइ, जपानी सम्राट.
- १४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास
- १७३४ - तक्सिन, थायलंडचा राजा.
- १७५६-ब्रिटिशांविरोधात तमिळनाडू भागात उठाव करणारा धीरन चिन्नामलाई
- १८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते
- १८९४ - निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज
- १९१६: सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ’सिलोन’ हे नाव बदलून ’श्रीलंका’ केले. खाजगी शाळा, तेलमंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले.
- १९२७-माजी पंतप्रधान चंद्रशेखर
- १९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदू
- १९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी
- १९७२ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.
- १९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया
मृत्यू[संपादन]
- १०८० - हॅराल्ड तिसरा, डेन्मार्कचा राजा.
- १७११ - जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन
- १८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स
- १८९१ - अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९३६ - चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
- १९४४ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री
- १९७५ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.
- १९९०-राजा केळकर संग्रहालयाचे संचालक दिनकर गंगाधर केळकर
- १९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक
- १९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.
- २००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक
- २००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
- २०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा
- २०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.
- २०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा
- २०१७- 117 वर्षांच्या एमा मोरेनो या जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे इटलीमध्ये निधन झाले. एकोणिसाव्या शतकात जन्म झालेल्या बहुदा त्या शेवटच्या जिवंत व्यक्ती होत्या.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- जागतिक हेमोफिलिया दिवस
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - (एप्रिल महिना)