डिसेंबर २६
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६० वा किंवा लीप वर्षात ३६१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- १८९८ - मेरी क्यूरी आणि पिएर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
- १९७६ - कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (एकीकृत मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
- १९८२ - टाइम मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
- १९९७ - विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार देण्यात आला.
एकविसावे शतक
[संपादन]- २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
जन्म
[संपादन]- १८९९ - उधम सिंग, भारतीय क्रांतिकारी
- १९१४ -.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
- १९१४ - डॉ. सुशीला नायर, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या.
- १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.
- १९२५ - पं. कृष्णा गुंडोपंत तथा के.जी. गिंडे, भारतीय शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
- १९३४ - द.दि. पुंडे, मराठी समीक्षक.
- १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी).
- १९४१ - लालन सारंग, मराठी अभिनेत्री.
- १९४८ - डॉ. प्रकाश आमटे, मराठी समाजसेवक
मृत्यू
[संपादन]- १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष.
- १९८९ - केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक
- १९९९ - शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती.भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
- २००० - प्रा. शंकर गोविंद साठे, मराठी साहित्यिक.
- २००६ - कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर, मराठी अभिनेते
- २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- ग्राहक दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर २७ - डिसेंबर २८ - डिसेंबर महिना